विनोद

एकदा एक मनुष्य एका टॅक्सीमध्ये मागच्या सिटावर बसतो. याला ज्या भागात जायचे असते त्या भागाची टॅक्सी चालकाला माहिती नसल्याने वाट दाखवण्याचे काम याच्यावरच येते. एका वळणावर वळण्यासाठीची खूण करताना हा मनुष्य चालकाच्या खांद्यावर नकळत हलकेच हात ठेवतो. त्यासरशी चालक एवढा दचकतो की त्याला काहीच सुचत नाही, त्याला घाम सुटतो… त्याचा गाडीवरचा ताबा जातो… गाडी शेजारच्या एका दुकानात घुसणारच असते एवढ्यात तो कसा बसा ब्रेक लावतो व हश्श-हुश्श करू लागतो…

त्याचे घाम पुसणे चालू असते. त्यावर गोंधळलेला-घाबरलेला बिचारा प्रवासी त्याला म्हणतो, “मित्रा मला क्षमा कर. मला वाटले नाही तू माझ्या हाताला असा धरशील आणि आपली अशी फजिती होईल.”

त्यावर तो टॅक्सी चालक उत्तरतो, “साहेब, त्यात तुमची काही चूक नाही हो. माझा आज टॅक्सी चालवण्याचा पहिला दिवस आहे. या अगोदर मी मागील ३० वर्षे प्रेतवाहिनीचा चालक म्हणून काम केले आहे”….

————————————————————————–
दोन मित्र जंगलात शिकारी साठी जंगलात गेले होते. तेव्हा तेथे एका अस्वलाने त्यांच्यावर हल्ला केला. पहिला मित्र चपळाईने झाडीत पळाला पण दुसरा मात्र त्या अस्वलाच्या तावडीत सापडला.

थोड्या वेळाने झाडीत लपलेला मित्र बाहेर येउन पाहतो तर दुसरा जमिनीवर निपचित पडलेला.

झालं, घाबरून त्याला धाम सुटला. आता काय करावे अश्या विचारात असतानाच त्याला मदतीसाठीचा नंबर आठवला.

त्या मदत कक्षात उत्तर द्यायला एक तरुणी बसलेली. त्यांचा संवाद सुरु झाला.

तो -मित्रावर माझ्या एका अस्वलाने हल्ला केला आहे! मी काय करू.. मेला तर नसेल ना??

ती – असे आधिच घाबरून जाऊ नका. आधी तो मेला आहे याची खात्री करून घ्या..

(ठो‌ऽऽ…. पलीकडून गोळी चालवल्याचा आवाज येतो)

तो – आता??

————————————————————————–
एकदा दोघे जण एका रानातून जात असतात. तेव्हढ्यात त्यांना दुरून एक अस्वल त्यांच्या रोखाने येताना दिसते. एक माणूस लगेच आपल्या पिशवीमधून त्याचे जोडे काढून घालू लागतो. त्याचा सहप्रवासी म्हणतो , ” अरे, तू चांगले जोडे घातलेस तरी तू त्या अस्वलापेक्षा काही जास्त वेगाने पळू शकणार नाहीस.” दुसरा त्याला म्हणाला की ” “अरे त्या अस्वलापेक्षा नाही, पण तुझ्या पेक्षा तरी मी जास्त वेगाने पळीन की नाही”? असे म्हणून तो तडक अस्वलापासून दूर पळू लागला.

————————————————————————–
गेल्या प्रेमदिवसाच्या (व्हॅलेन्टाइन डे) सुमारास मी पोस्टात गेलो. तिथे एक पन्नाशीचा, डोक्यावर टक्कल पडलेला माणूस बऱ्याचशा व्हॅलेन्टाइन डे भेटकार्डांवर गुलाबी रंगाची हृदयाच्या आकाराची स्टिकर्स लावीत होता. नंतर त्याने खिशातून सुगंधी फवारा काढला आणि त्या शेकडो भेटकार्डांवर ते अत्तर फवारले. हा प्रकार बघून मला उत्सुकता वाटली. मी जवळ जाऊन त्याला विचारले, “काय हो, तुम्ही ह्या वयात इतकी सारी प्रेमदिवसाची भेटकार्डे कुणाला पाठवताय?”

माझ्याकडे एक कटाक्ष टाकून तो पुन्हा आपल्या कामात गढला. त्या साऱ्या भेटकार्डांवर ‘I Love You, Guess Who!’ चे ठप्पे मारत त्याने स्पष्टीकरण दिले, “अशी एक हजार भेटकार्डे मी प्रेमदिवसाला दर वर्षी पाठवत असतो.”

“पण कुणाला?”

“टेलिफोन डायरेक्टरीमधून कुठलेही पत्ते निवडतो.” ठप्पे मारत तो म्हणाला.

“पण कां” ह्या माझ्या प्रश्नावर तो म्हणाला “अहो मी वकील आहे, आणि घटस्फोटाचे खटले चालवणे हा माझा पोटापाण्याचा उद्योग आहे.”
————————————————————————–

2 thoughts on “विनोद

Add yours

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Create a free website or blog at WordPress.com.

Up ↑

%d bloggers like this: