एक मनाने चांगला पण आता वय झालेला न्हावी होता. शहराच्या मध्याभागी त्याचे दुकान होते.

फुलांचे दुकान चालवणारा एक माणूस एकदा त्या दुकानात गेला. केस कापून झाल्यावर तो न्हाव्याला पैसे देऊ लागला.
त्यावर न्हावी म्हणाला “नको. मी पैसे घेणार नाही. आता केवळ समाजसेवा म्हणून मी हे करतो आहे.”
तो माणूस आनंदाने परतला.
दुसऱ्या दिवशी जेंव्हा न्हावी आपले दुकान उघडण्यास गेला तेंव्हा दारावर फुलांचे एक डझन गुच्छ आणि “धन्यवाद!” असे लिहिलेले शुभेच्छापत्र होते.

पुढे एके दिवशी एक मिठाईवाला त्या दुकानात गेला. पुन्हा तसाच प्रसंग घडला.
दुसऱ्या दिवशी जेंव्हा न्हावी आपले दुकान उघडण्यास गेला तेंव्हा दारावर मिठाईचे एक डझन पुडे आणि “धन्यवाद!” असे लिहिलेले शुभेच्छापत्र होते.

पुढे एके दिवशी एक संगणक अभियंता त्या दुकानात गेला. पुन्हा तसाच प्रसंग घडला.
दुसऱ्या दिवशी जेंव्हा न्हावी आपले दुकान उघडण्यास गेला तेंव्हा …….
:
:
:
:
:
:
एक डझन संगणक अभियंते, हातात “फुकट केस कापून घ्या” अशा इ-संदेशाच्या मुद्रित प्रती घेऊन उभे होते.

Advertisements