आजकालची तरुण पिढी पूर्वीसारखी राहीली नाही… अशी तक्रार आपण नेहेमीच ऐकतो. पण आजच्या म्हाताऱ्या पिढीचे काय? ती सुद्धा पूर्वीसारखी राहिली नाही…नाही का?


माझ्या लहानपणीच्या म्हाताऱ्या पिढीबद्दल माझी मते इतकी ठाम बनली आहेत, की हल्लीच्या म्हाताऱ्या पिढीमध्ये ’दम’ नाही असेच वाटते 🙂


म्हणजे ’आजोबा’ ही व्यक्ती साधारणपणे १९२० च्या आसपास जन्मलेली असते असे माझे ठाम मत होते.

पुढे मग १९३०, १९४० आणि हल्ली तर १९५० च्या दशकात जन्मलेले ’आजोबा’ पहायला मिळायला लागले…आणि वाटले हे काही खरे आजोबा नाही. म्हणजे शाळेतल्या स्नेह-संमेलनात जसे लहान मुलं खोट्या दाढी-मिश्या लावून म्हाताऱ्याची भूमिका करतात ना, तसे काहीसे वाटते ह्या नवीन आजोबांना बघून… ती भूमिका कितीही चांगली केली तरी हे खोटे खोटे चालले आहे असे सारखे वाटत राहाते.


माझ्या काळचे आजोबा हे ईंग्रजांचा काळ बघितलेले होते…आणि त्यातल्या बहुतेकांनी जरी प्रत्यक्ष काही केलेले नसले तरी ’स्वातंत्र्यलढा’ या विषयावर ‘convincing lecture’ देऊ शकत होते…आणि ते खरेही वाटत होते 🙂


हल्लीच्या आजोबांच्या नशीबी ते सुख नाही…तरिही काही जण ओढून-ताणून ’संयुक्त महाराष्ट्र लढा’ ह्या विषयावर बोलतात…असो. पण मला काळजी आहे ती ते नंतरच्या आजोबांची…ते कशावर बोलणार?


आजोबा ह्या विषयावरून एक गंमत आठवली…


माझ्या लहानपणी एक म्हातारे आजोबा आमच्याकडे यायचे…त्यांना फुशारक्या मारायची फार सवय होती (म्हणजे तशी सवय असलेले बरेच जण यायचे…पण हे जरा विशेष होते!)…तर नेहेमी ते त्यांच्या काळातल्या गोष्टी सांगायचे आणि त्या आत्ताच्या काळात ‘translate’ करुन सांगायचे…


म्हणजे…

मी बरंका, त्या काळचा म्याट्रीक…म्हणजे आत्ताचा post-graduate बरं का…

कोणी तरी…. ’का असे का?’ …

आजोबा: ’का म्हणजे? त्या काळी असे (आमच्या कडे हात दाखवत) ऊठ्सूठ कोणीही म्याट्रीक होत नव्हते…फक्त हुशार मुलेच तिथे पोचत’…ss
=”Apple-style-span” style=”font-size:medium;”>’मग तुम्ही पुढे का नाही शिकलात?’ …. ’कसा शिकणार? गरिबी ना…तरी त्या वेळेस ६२% मार्क मिळवले होते मी…म्हणजे आत्ताचे कमीत कमी ९२% धरुन चाला…तेव्हा काही आत्ता सारखे मार्क वाटत नव्हते, मनाला येइल तसे.’…


’तुम्ही काही लिहीतच नसाल तर देणार कसे तुम्हाला मार्क…’ मी पुटपुटलो…पण ते ऐकायच्या मन:स्थितीत नव्हते.


’…मग मी आयकर विभागात ३६ वर्षे नोकरी केली…त्या काळी माझ्या कडे १ कार होती…म्हणजे आत्ताच्या ३ समजा.’ (चांगलेच पैसे खाल्लेले दिसतात…’)


मग मात्र मला राहावेना…’आजोबा तुम्हाला मुलं किती?’, ’३ मुलगे आणि २ मुली’….

मी: ’वा:! त्या काळची ३ मुलगे आणि २ मुली…म्हणजे आजचे कमीत कमी १५ मुलगे आणि १० मुली असतील नाही का?’


त्या आजोबांचा चेहरा कसा झाला ते पाहणे माझ्या नशिबी नव्हते…कारण लगेच मला तिथून पळ काढावा लागला…पण परिणाम मात्र चांगलाच झाला असणार! कारण तेव्हा पासून ते आजोबा येणे बंद झाले….आणि घरीही मला कुणी रागावले नाही 🙂


स्वतःचे कौतुक तितके असेल किंवा नसेल, पण नातवंडांचे (फाजील) कौतुक हा गूण मात्र अजूनही तसाच आहे.


जरा नातू light bulb शी किंवा wire शी खेळताना दिसला, की आज्ज्या लगेच ’हा बहुतेक मोठा electric engineer च होणार बहुतेक…’ (’मोठा’ electric engineer बरं का…म्हणजे काय कुणास ठाऊक?)…


किंवा हल्लीचा उच्छाद म्हणजे सा रे ग म सारख्या स्पर्धा…


परवा ३-४ विविध वयाच्या ’ताज्या ताज्या’ आज्ज्या जमल्या होत्या आमच्याकडे (’ताज्या ताज्या’ म्हणजे नुकत्याच आजी झालेल्या…)… तर त्या आपापल्या नातवंडांचे कौतुक सांगत होत्या…


’आमचा XXX ५ च वर्षाचा आहे…पण सा रे ग म मधली सगळी गाणी बरोबर ओळखतो आणि हातानी तबला वाजवतो!’ …


’आमची XXX तर २ च वर्षाची आहे अजून…पण स्वर बरोबर ओळखते आणि लगेच गुणगुणायला लागते…आता १-२ वर्षानी गाण्याच्या class ला जायचे ना? असे विचारली कि लगेच हो, जाणार तर…नक्की! असे म्हणते (वय वर्षे २ बरं का…)’ … ’…तसा माझा आवाज ही चांगलाच आहे…तेच तिच्याकडे आले आहे बहुतेक’…


पण नातवंडांचे कौतुक हा ’साथीचा आजार’ आहे… लगेच आमच्या आजीला राहावेना…


’आमचा धाकटा नातू आहे ना…’ (म्हणजे मी नाही, माझा लहान भाऊ..आमचा नंबर तिथेही नाहीच…) ’…तो तर गाणे चालू झाले की स्वत: गाणे ओळखतो, गातो आणि हातानी ठेकाही धरतो.’


आ]
]>

Advertisements