तो आणि ती एका कॉफीशॉपमध्ये ब्लाइंड डेटवर भेटले. पण त्याला तिच्याबरोबर एक मिनिटही घालवणंही जड जात होतं. केमिस्ट्री जमत नव्हती.
अशी वेळ आलीच तर सुटका व्हावी, म्हणून त्यानं एका मित्राला मोबाइलवर फोन करायला सांगून ठेवलं होतं. अचानक त्याचा मोबाइल वाजला. ‘एक्स्क्यूज मी!’ म्हणून तो लांब गेला आणि अगदी पडेल चेहऱ्यानं तिच्यापाशी येऊन म्हणाला, ”व्हेरी सॉरी! पण, आत्ताच माझे आजोबा वारले आहेत.”
ती आनंदानं उसळून म्हणाली, ”थँक यू व्हेरी मच! तुझे वारले नसते तर माझ्या आजोबांना मरावं लागलं असतं!!!!
 
————————————————————————————————————————————–

एकदा दोन चोर बॅंकेत दरोडा टाकतात.]सर्व पैसे ते दोघ पोत्यमध्ये भरतात.एक जण दुस~याला विचारतो,”आपण एवढे पैसे मोजायचे कसे?”
तेव्हा दुसरा चोर म्हणतो,”आपल्याला पैसे मोजायची गरज नाही,आपण फ़क्त उद्याचा पेपर वाचायचा….”
 
————————————————————————————————————————————–

संताला आपल्या बायकोच्या वागण्यावर थोडा संशय होता. तो येता जाता आपल्या १० वर्षाच्या मुलाला सांगत असे माझ्या नंतर घरी कोणी आले-गेले तर मला सांगत जा. एकदा काही कामासाठी संता गावाबाहेर गेला तेथुन आपल्या घरी फोन केला तेव्हा त्याच्या मुलाने फोन उचलला…
 
“हलो…. :संता – “बेटा घरी कोण कोण् आहे ? “
 
मुलगा – “मी मम्मी व मम्मी चा दोस्त”
 
संता – “काय ?.. एक काम कर लवकर सांग ते काय करत आहेत..”
 
मुलगा – “ठीक आहे… थांबा दोन मीनीट”थोड्या वेळाने मुलगा- “ते दोघे… बेडरुम मध्ये आहेत.”
 
संता रागाने- “काय? बेटा एक काम कर….. पळत पळ्त जा व मोठ्याने बोल पापा आले.. पापा आले…. मग सांग काय झाले ते…..”

थोड्या वेळाने मुलगा परत फोन वर आला..” हलो.” संता-” बोल काय झालं”
 
मुलगा- “मी पप्पा आले… असं बोलल्यानंतर लगेचच मम्मी पळत किचन मध्ये केली व चाकू हातात घेऊन आपल्या पोटामध्ये मारला ती जागच्या जागी मेली.”
 
संता- ” बर झालं…. त्या मम्मी च्या दोस्ताचे काय झाले?”
 
मुलगा -” त्याने खिड्कीतून खाली स्विमीग फुल मध्ये ऊडी मारली..पण आज ड्राय-डे फुल मध्ये पाणीच नाही….तो पण मेला….”
 
संता – “हा हा हा…… क्या बात है दोनो खल्लास ……. अरे एक मीनीट माझ्या घराजवळ तर स्विमीग फुलच नाही आहे..एक मीनीट हे सरदार संताच्या घराचाच फोन नंबर आहे ना? “
 
<sp
an
class=”Apple-style-span” style=”font-size:13px;”>

————————————————————————————
१) एकदा मी एका मित्राला विचारलं’तुझा भुतांवर विश्वास आहे?’
तो म्हणाला ‘अजिबात नाही! ‘ आणि अदृश्य झाला.
 
२) एका बंगल्यात ‘भुते’ आहेत असे कळल्यावर एक भुतांवर विश्वास नसणाऱ्या माणसाने त्या बंगल्याचा दरवाजा ठोठावला.
दार उघडणाऱ्या नोकराला त्याने विचारले ‘काय रे, इथं भुतं राहतात म्हणे’ नोकर म्हणाला ‘ काय माहीत! मी मरून दहाच वर्षे झाली आहेत’.
 
————————————————————————————
 
” मिस्टर प्रधान, मृत्यूनंतरच्या अस्तित्त्वावर तुमचा विश्वास आहे का?” मॅनेजर मानकाम्यांनी थंड सुरात विचारलं.
” छ्या! बकवास आहे हो सगळी!” विन्या उत्तरला. ” माझंही मत अगदी तुमच्यासारखंच होतं आतापर्यंत.
पण, आता बसला. काल तुम्ही ज्या एकुलत्या एका काकांच्या अंत्ययात्रेसाठी हाफ डे टाकून गेलात ते आज चक्क ऑफिसात आले आहेत तुम्हाला भेटायला!!!!
 
————————————————————————————
 
“या दोन्ही औषधांच्या आता रोज दोन दोन पुड्या घ्या बरे वाटेल.
“डॉक्टरांनी पेशंटला सांगताच पेशंट म्हणाला,”
डॉक्टर दोन काय चार पुड्या घेईनपण पुड्यांचा कागद जरा पातळ वापरा मागच्या पुड्या गिळायला खुप त्रास झाला होता….”
 
————————————————————————————
कोर्टात गांधीजींचा फोटो कशाला लावतात..?….खिळ्याला !!!
 
————————————————————————————
 
प्र. : पुण्याच्या हॉटेलात हाफ चिकन मागवल्यावर ते यायला खूप वेळ का लागतो?
उ. : कारण, हॉटेलवाले हाफ चिकनची दुसरी ऑर्डर आल्याशिवाय कोंबडीला हातच लावत नाहीत!!!!
————————————————————————————
गुरुजी : राजु, सांग एका वर्गात २० मुले आणि १० बाकडे आहेत.
तर त्या समोरच्या पेरुच्या झाडाला किती आंबे आहेत?
राजु : चाळिस.
गुरुजी : ते कसे काय??
राजु : कारण मी आज डब्यात पोहे आणले आहेत
————————————————————————————

Advertisements