विनोद

अगदी रमतगमत चालत असलेल्या सुभेदार बंताला पाहून मेजर संता कडाडला, ”सुभेदार बंता, हा युद्धसराव सुरू आहे. काल्पनिक शत्रू समोरून अतिशय वेगानं आपल्या दिशेनं सरकतोय. प्रचंड काल्पनिक गोळीबार सुरू आहे. दोन्ही बाजूंनी सुरू असलेल्या काल्पनिक धुमश्चक्रीत तू अडकला आहेस
.”बंतानं ताबडतोब जमिनीवर लोळण घेतली, दोन गिरक्या घेऊन तो एका जागी तो उठून बसला.
ते पाहून चक्रावलेल्या संतानं विचारलं, ”सुभेदार संता, हे तू काय केलंस?” ”
सर, मी एका काल्पनिक झाडाच्या आडोशाला दडलोय!!!!”
 
————————————————————————————
गुरुजी: बंड्या तू सांग, समाज तुझ्या कडे 10 गोळ्या आहेत.
बंड्या: पण गुरुजी माझ्या कडे 10 गोळ्या नाही आहेत.
गुरुजी: समाज की तुझ्या बपाचे काय जाते, बर तू बस परश्या तू सांग, समाज तुझ्या कडे 10 गोळ्या आहेत.
परश्या: पण गुरुजी खरच माझ्या कडे पण 10 गोळ्या नाही आहेत.
गुरुजी: समाज की तुझ्या बपाचे काय जाते, बर तू बस नार्‍या तू सांग, समाज तुझ्या कडे 10 गोळ्या आहेत.
नार्‍या: ठीक आहे गुरुजी पुढे ? गुरुजी: शब्बास !! तर समाज तुझ्या कडे 10 गोळ्या आहेत, त्यातल्या तू 3 मिनेला दिल्यास, मग तुज़या कडे किती गोळ्या राहिल्या?
नार्‍या: 20 गुतुजी. गुरुजी: आरे 10-3 वीस होतात काय रे.
नार्‍या: आहो समजा की गुरुजी तुमच्या बपाचे काय जाते.
————————————————————————————
” डॉक्टर मला दीर्घायुष्य हवं आहे. खूप खूप जगायचं आहे. मी काय करू?” ”
लग्न करा.” ” लग्नामुळे आयुष्य वाढेल?” ”
नाही. पण, खूप खूप जगायची इच्छाही पुन्हा होणार नाही!!!”
 
————————————————————————————
”आज आपल्या लग्नाचा वाढदिवस आहे. काय करायचं आपण?” बायकोनं विचारल.
 
नवरा उत्तरला, ”दोन मिनिटे उभे राहून शांतता पाळूयात!!!”
————————————————————————————
  
विन्या प्रधान एक्स्प्रेसवेवरून सुसाट कार चालवत होता. ‘वाँव वाँव वाँव’ करत मागून आलेल्या पोलिसाने विन्याला अडवला. ”ऐंशी किलोमीटरची स्पीड लिमिट आहे आणि तुम्ही १२०च्या स्पीडनी गाडी हाणताय? चला, लायसन काढा.”

विन्या म्हणाला, ”लायसन्स नाहीये माझ्याकडे. पोलिसांनीच जप्त केलंय काल. एका सायकलवाल्याला उडवला म्हणून.”
<span class="Apple-style-s
pa
n” style=”font-size:medium;”>
” भले शाब्बास! गाडीची कागदपत्रं आहेत का?”

” आहेत ना आहेत. या साइडच्या कप्प्यातच आहेत. माझी गन आहे ना तिच्याखाली. पण, गनला हात लावू नका. नाहीतर तुमच्या बोटांचे ठसे उमटतील तिच्यावर आणि गोत्यात याल.”

पोलिस जरासा चपापला. ”गननी काय खूनबिन केलात की काय?”

” खून करायची इच्छा नव्हती हवालदारसाहेब माझी! पण, त्या बाईनं फारच झटापट केली. मग घातली गोळी तिला. मागे डिक्कीत पडलीये तिची डेड बॉडी!”

पोलिसानं गाडीची चावी काढून घेतली. वायरलेसवरून वरिष्ठांना संदेश पाठवला. व्हॅन आली. इन्स्पेक्टरसाहेबांनी विन्याला विचारलं, ”तुमच्याकडे गन आहे?”

” छ्या हो! माझ्यासारख्या माणसाकडे गन असेल, असं वाटतं तुम्हाला?”

साहेबानं कप्पा चेक केला. त्यात गन नव्हती. साहेब म्हणाले, ”लायसन्स बघू.”

विन्यानं तात्काळ लायसन्स आणि गाडीची कागदपत्रं काढून दाखवली.

बुचकळ्यात पडलेल्या साहेबानं डिकी उघडायला लावली. ती रिकामी. साहेब म्हणाले, ”कमाल आहे! आमचा हवालदार तर म्हणत होता की तुमच्याकडे लायसन्स नाही, गन आहे, तुम्ही एक खून केलाय, बॉडी गाडीतच आहे म्हणून!”

” माय गॉड!” विन्या चित्कारला, ”आणि त्याचा असाही दावा असणार की, मी गाडी फार फास्ट चालवत होतो म्हणून त्यानं मला थांबवलं!!!!”
 
————————————————————————————
 
साधूवेशातील रावण : माई भिक्षा दे!

पर्णकुटीतली स्त्री : साधू महाराज, ही घ्या भिक्षा!

रावण : माई, या रेषेच्या थोडं पुढे येऊन वाढ. मी जाम थकलोय. (स्त्री पुढे येताच तिला उचलून घेतो आणि विकट हास्य करतो) हा हा हा, मी साधू नाही, रावण आहे.

स्त्री (तेवढेच विकट हसून) : हा हा हा! मीही सीता नाही, कामवाली आहे!!!!
————————————————————————————

सर :- राजु पाण्यात राहणारया प्राण्याचे नाव सांग
राजु :- बेडूक
सर :- गुड , अजुन दोन प्रण्यांची नावे सांग
राजु :- बेडकाचे बाबा आणि बेडकाची आई
 
<div style="text-align

:justify;”>————————————————————————————

तुझी ताई कशी आहे?
बरी आहे.
भाऊ?
बरा आहे.
आई?
बरीच आहे की!
मग, बाबाही बरेच असतील..
छे छे! बाबा एकच आहेत.
————————————————————————————
पहिला हातात वाळू घेऊन विचारतो,
‘सांग बरं माझ्या हातात काय आहे?’

दुसरा लांब समुद्रात पाहून सांगतो,
‘जहाज!’

पहिला वाळू फेकून देत म्हणतो,
‘जा बाबा, तू पाहून सांगतो.’
————————————————————————————
२ चिमण्या असतात
.
.
.
.
.
.
.
.

त्यातली एक म्हणते “चिऊ”
.
.
.
.
.
.
.
दुसरी काहीच म्हणत नाही!
.
.
.
.
.
.
का?
.
.
.
.
.
.
कारण दुसरी चिमणी Factory ची असते.
————————————————————————————
बाबा लग्नाला किती खर्च येतो..?
सांगता येत नाही.. माझा अजुनही चालु आहे..
————————————————————<span class="Apple-style

-span” style=”font-size:medium;”>————————

माझ्या काकाला तो केंव्हा मरणार याची नक्कि तारीख, वेळ,व स्थळ माहीत आहे…
कमाल आहे..हे कस काय बुवा?…
त्याला न्यायाधीशांनी सांगितल आहे….
————————————————————————————
रविवार चा दिवस होता, एका मोठ्या उद्यानात, संता एक खड्डा, खणायचा, ५ मिनिटानी, बंटा येवुन
तो खड्डा मातिन बुजवायचा, झारिन पाणी शिंपायचा. परत संता दुसरा खड्डा, खणायचा, ५ मिनिटानी, बंटा येवुन तो खड्डा मातिन बुजवायचा, झारिन पाणी शिंपायचा…
असा त्यांचा उद्योग चालु होता. बाजुला बसलेल्या माणसाला खुप कुतुहल होत, शेवटी न रहावुन त्यान संताला विचारल कि ते नेमक काय करत आहेत.
संता म्हणाला ” हा आमचा वृक्षा रोपणाचा कार्यक्रम आहे.
आमचा फंटा नावाचा आणखी एक मित्र होता.मी खड्डा खोदायचो, फंटा त्यात झाड लावायचा, अन बंटा,माति टाकुन
खड्डा बुजवुन पाणी घालायचा, पण फंटा आता या जगांत नाहि…..”
————————————————————————————
संता-मला धमकीच पत्र आल आहे की मा्झ्या बायकोचा नाद सोड नाहीतर खुन करीन.
बंटा-मग नाद सोड,
संता-अरे निनावि पत्र आहे. मी कस ओळखु की याची बायको कोण आहे?
————————————————————————————
 
एका माणसाची बायको हरवते. तो प्रभु रामाच्या ्मंदिरात जातो, व प्रर्थना करतो ” हे प्रभु माझी बायको हरवली आहे,”
राम म्हणाला ” बाजुच्या हनुमानाच्या मंदिरात जा,माझी बायको पण त्यानेंच शोधली होति.”
————————————————————————————
पहिला : मला असा माणूस माहीत आहे की ज्याच्या लग्नाला तीस वर्षे झाली आणि तो आपली प्रत्येक संध्याकाळ घरातच बायकोच्या सहवासात घालवतो.
दुसरा : वा!…याला म्हणतात प्रेम.
पहिला : पण डॉक्टर म्हणतात पॅरॅलिसिस…..
————————————————————————————
५० सरदार गाडिखाली चिरडुन मेले होते, फक्त बंटा वाचला होता. टी वी चॅनेल वाले त्याचा इंटरव्ह्यु घेत होते..
चॅनल रीपोर्टर= ये सब कैसा हुआ.
संटा= ये सब गलत अनाउसमेंट का नतिजा है.
चॅनल रीपोर्टर= मै समजी नहि..
संटा= वोह ऎसा हुआ. ५० सरदार प्लॅटफॉर्म पे गाडि कि राह देख रहे थे इतनेमे अनाउंसमेंट हो गयी कि ” लुधीयाना जानेवालि गा

डि प्लॅटफॉर्म पर पधार रहि है.” ये सुनकर सारे सरदार डर गये और ट्रॅक पर कुदकर खडे हो गाये. मगर अनाउसमेंट के मुताबिक गाडि प्लॅट फॉर्म नहि आइ ट्रॅक पर आ गयी.. और ये हादसा हो गया.

चॅनल रीपोर्टर= मगर आप कैसे बच गये?
संटा= मै सुसाईड करनेके लिये ट्रॅक पर खडा था.. मैने जैसे हि अनाउंसमेंट सुनि वैसा मै वापस प्लॅट फॉर्म पर चढ गया और बच गया..सब उसकी लिला है.. जिनको बचना चाहिये वोह चले गये. जिनको जाना था वोह आपके सामने है.. 
————————————————————————————
व्यक्ती : डॉक्टर साहेब मला “फ” ला “फ” नाही म्हणता येत हो
डॉक्टर : अहो छानच तर म्हणताय की हो तुम्ही “फ”
व्यक्ती : नाही हो, डॉक्टर साहेब मला “फ” ला “फ” नाही म्हणता येत.
डॉक्टर : पुन्हा तेच, अहो म्हणताय की तुम्ही “फ”
व्यक्ती : डॉक्टर फाहेब, तुम्हाला फमजलेच नाही, मला काय म्हणायचे आहे ते!
————————————————————————————
स्त्रियांच्या मैत्रीपेक्षा पुरुषांची मैत्री अधिक घट्ट असते. 
एक बायको एकदा संपूर्ण रात्रभर घरीच येत नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी नवरा विचारतो, तेव्हा ती सांगते, ”अरे, मी एका मैत्रिणीच्या घरी राहिले होते.” 

नवऱ्याचा तिच्या शब्दांवर विश्वास बसत नाही. तो तिच्या सर्वात जवळच्या १० मैत्रिणींना फोन करतो. त्याची बायको आपल्याकडे आली नव्हती, असंच दहाहीजणी सांगतात. 

आता जेव्हा एक नवरा संपूर्ण रात्रभर घरीच येत नाही, तेव्हा काय होते पाहा. दुसऱ्या दिवशी सकाळी बायको विचारते, तेव्हा तो सांगतो, ”अगं मी माझ्या एका मित्राच्या घरी राहिलो होतो.” 

बायकोचा नवऱ्यावर विश्वास बसत नाही. ती त्याच्या सर्वात जवळच्या १० मित्रांना फोन करते. त्यांतले पाचजण छातीठोकपणे सांगतात की काल रात्री तो त्याच्याच घरी होता. उरलेले पाचजण तर, आत्ताही तो आपल्या घरातच आहे असंही सांगून टाकतात
————————————————————————————
संता-बंता जंगलात गेले होते. समोरून अचानक वाघ आला. संतानं प्रसंगावधान राखून गुरकावणाऱ्या वाघाच्या डोळ्यांत चपळाईनं माती फेकली आणि तो बंताला म्हणाला, ”पळ पळ बंता!” 

बंता हसत उत्तरला, ”मी का पळू? माती तू फेकलीयेस त्याच्या डोळ्यांत!!!!”
————————————————————————————
एक व्यक्‍ती अचानक विमानात ओरडतो “HIJACK “.
सर्व जण आपले हात वर करतात.
त्याच वेळी दुसऱ्याबाजुने एक व्यक्‍ती उठतो.
</spa

n>

आणि ओरडतो. “HIJOHN “.

2 thoughts on “विनोद

Add yours

  1. ??? ???!'' ?????? ?????????, ''??? ?????? ????? ???? ????? ??, ?? ???? ??? ????? ????? ???? ?????? ?????? ??? ???????!!!!'' ha ha ha … !!!

    Like

  2. ??? ???!'' ?????? ?????????, ''??? ?????? ????? ???? ????? ??, ?? ???? ??? ????? ????? ???? ?????? ?????? ??? ???????!!!!'' ha ha ha … !!!

    Like

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Create a free website or blog at WordPress.com.

Up ↑

%d bloggers like this: