एक सुंदर अभिनेत्री बोटीने लांबची समुद्रसफ़र करण्यास निघाली. तिने बोटीवर असताना लिहीलेल्या दैनंदिनीतील काही भाग –
दि. ०७ ऒक्टोंबर – प्रवासास आरंभ झाला. बोटीत १५०० प्रवासी आहेत. डेकवर फिरताना जहाजाच्या कप्तानाशी ओळख झाली.
दि. ०८ ऒक्टोंबर – आज मी आणि कप्तान डेकवर खूप वेळ एकत्र फिरलो. आम्ही खूप गप्पा मारल्या.
दि. ०९ ऒक्टोंबर – कप्तानाशी दोस्ती खूपच वाढली.
दि. १० ऒक्टोंबर – कप्तानाने मला त्याच्या केबिनमध्ये रात्री झोपायला बोलावले.
दि. ११ ऒक्टोंबर – मी कप्तानाच्या सूचनेला स्पष्ट नकार दिला.
दि. १२ ऒक्टोंबर – कप्तान म्हणाला,”तू आज रात्री आली नाहीस तर मी सारी बोट बुडवून टाकीन.”

दि. १३ ऒक्टोंबर – काल रात्री मी १५०० प्रवाशांचे प्राण वाचविले.
 
————————————————————————————————————————————–

स्त्रियांच्या मैत्रीपेक्षा पुरुषांची मैत्री अधिक घट्ट असते. 
एक बायको एकदा संपूर्ण रात्रभर घरीच येत नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी नवरा विचारतो, तेव्हा ती सांगते, ”अरे, मी एका मैत्रिणीच्या घरी राहिले होते.” 

नवऱ्याचा तिच्या शब्दांवर विश्वास बसत नाही. तो तिच्या सर्वात जवळच्या १० मैत्रिणींना फोन करतो. त्याची बायको आपल्याकडे आली नव्हती, असंच दहाहीजणी सांगतात. 

आता जेव्हा एक नवरा संपूर्ण रात्रभर घरीच येत नाही, तेव्हा काय होते पाहा. दुसऱ्या दिवशी सकाळी बायको विचारते, तेव्हा तो सांगतो, ”अगं मी माझ्या एका मित्राच्या घरी राहिलो होतो.” 

बायकोचा नवऱ्यावर विश्वास बसत नाही. ती त्याच्या सर्वात जवळच्या १० मित्रांना फोन करते. त्यांतले पाचजण छातीठोकपणे सांगतात की काल रात्री तो त्याच्याच घरी होता. उरलेले पाचजण तर, आत्ताही तो आपल्या घरातच आहे असंही सांगून टाकतात

————————————————————————————————————————————–

पहिला : मला असा माणूस माहीत आहे की ज्याच्या लग्नाला तीस वर्षे झाली आणि तो आपली प्रत्येक संध्याकाळ घरातच बायकोच्या सहवासात घालवतो.
दुसरा : वा!…याला म्हणतात प्रेम.
पहिला : पण डॉक्टर म्हणतात पॅरॅलिसिस…..
 
————————————————————————————————————————————–
 
”आज आपल्या लग्नाचा वाढदिवस आहे. काय करायचं आपण?” बायकोनं विचारल.
नवरा उत्तरला, ”दोन मिनिटे उभे राहून शांतता पाळूयात!!!”
 
————————————————————————————————————————————–

Advertisements