परवाच ’महराष्ट्र दिन’ झाला (खरे तर सद्यस्थिती पाहाता ’महाराष्ट्र दीन’ असे म्हटले पाहिजे)… त्यानिमित्त ’सकाळ’ मध्ये माधव गाडगीळ यांचा मराठी भाषेबद्दल एक लेख आला आहे. माधव गाडगीळ हे जुन्या काळातील सुप्रसिद्ध अर्थतज्ज्ञ धनंजय गाडगीळ यांचे सुपुत्र – आणि ते स्वतःदेखील शास्त्रज्ञ आहेत. मराठीत साधे आणि सोपे शब्द प्रचलीत करण्यापेक्षा क्लिष्ट आणि दुर्बोध शब्द वापरण्याकडेच तथाकथित विद्वानांचा कल असतो आणि त्यामुळेच मराठी भाषा व्यवहारात मागे पडते आहे – ह्या मुख्य संकल्पनेवर हा लेख आहे.


त्यात दिलेली काही सरकारी भाषेचे (खरं तर ’शासकीय परिभाषा’ असे म्हटले पाहिजे!) ’नमुने’ खरच गमतीदार आहेत. उदा. वनवासी लोकांचे हक्क आणि पुनर्वसन ह्याबद्दलचे हे सरकारी उपकलम पहा:


“बाधिक व्यक्ती व समूह यांच्याकरिता सुरक्षित उपजीविका पुरवण्यासाठी आणि प्रस्तुत विधि व केंद्र सरकारच्या धोरणात दिलेल्या , अशा बाधित व्यक्ती व समूह यांच्या आवश्यकतांची पूर्तता करण्यासाठी पुनःस्थापना करणे किंवा पर्यायी योजना तयार करणे व संसूचित करणे. प्रस्तावित पुनःस्थापनेसाठी व योजना लेखी स्वरूपात मिळवण्यासाठी संबंधित क्षेत्रातील गामसभेची संमती मोफत मिळवणे…” इत्यादी इत्यादी.


मराठी ही माझी मातृभाषा असल्याचा माझा अभिमान हे ’शासकीय मराठी’ वाचून गळून पडला 😦

४-४ वेळा त्याच ओळी वाचूनही मला त्याचा अर्थ समजला नाही. असे ’शब्दबंबाळ’ मराठी हे लोक का लिहितात आणि त्यातून काय सिद्ध करायचा त्यांचा प्रयत्न असतो काय माहित?


ते वाचून मला ’मुघल-ए-आझम’ ह्या चित्रपटाची आणि त्यातल्या ’शब्दबंबाळ’ उर्दूची आठवण झाली. नुकताच २-३ वर्षांपूर्वी हा चित्रपट रंगीत स्वरुपात परत प्रदर्शित झाला, तेव्हा माझ्या एका मित्रा बरोबर सीडी वर परत पाहिला. हसून हसून पुरेवाट झाली आमची. डायलॊग तर रिवाईंड कर-करुन ऐकले!


“’शहेजादे-ए-आलम’ का पैगाम ’आवाज-ए-बुलंद’ पढा जाए” असे झिल्ले-ए-इलाही शहेनशाह-ए-आलम महाबली मोहम्मद जलालुद्दिन अकबर म्हणतो (खरं तर किंचाळतो)…म्हणजे थोडक्यात सांगायचे तर …”सलीम चे पत्र वाच” बस्स, ईतकेच!


त्यात शेवटी एके ठिकाणी सलीम (म्हणजे आपला तेलकट-तूपट चेहेऱ्याचा आणि जास्त तळलेल्या साबुदाणा वड्यासारखा दिसणारा दिलीप कुमार) म्हणतो: “मै अभी अभी शहेनशाह की आखोंमे शोले देख के आ रहा हू” …त्यावर माझ्या मित्राने त्याचे सामान्यज्ञान पाजळले… “हा चित्रपट रंगीत बनवला ना तेव्हा ही लाईन टाकली बंरं का’… मी: “कशावरून?”  ….तो: “अरे म्हणजे काय…’मुघल-ए-आझम’ १९६० चा…शोले १९७५ चा…मग सलीम तो आधीच कसा पहाणार? आत्ता रंगीत केला तेव्हा शोले येऊन गेला होता…”


बाकी त्यातली सगळीच पात्र विनोदी आहेत. पृथ्विराज कपूर हा त्याचा ’center of gravity’ त्याच्या पोटात असल्यासारखा सतत हलत-डुलत असतो… आणि सुप्रसिद्ध व्हीलन अजीत हा त्यात सलीमचा मित्र आणि एक राजपूत राजा झाला आहे…मला सारखे मध्येच एकदा तरी तो ’रॊबर्ट, व्हेरी स्मार्ट!’ असे म्हणेल अ

Advertisements