निशाणी डावा अंगठा

नुकताच मी ’निशाणी डावा अंगठा’ हा चित्रपट पाहिला…सुंदर चित्रपट आहे! बरेच दिवसांनी एक चांगला आणि आशयपूर्ण चित्रपट पाहिल्याचे समधान मिळाले. (याआधी डोंबिवली फास्ट आणि वळू हे चित्रपट मला आवडले होते….आणि चेकमेट हा आणखी एक वेगळा मराठी चित्रपट आठवतोय. तसे मधले काही चर्चित चित्रपट पहायचे राहून गेले आहे. उदा. गाभ्रीचा पाऊस)

बुलढाण्यातल्या रमेश इंगळे-उत्रादकर या प्राथमिक शिक्षकाने ’निशाणी डावा अंगठा’ नावाची एक कादंबरी लिहीली. १९९७ ते २००० या काळात ’प्रौढ साक्षरता अभियान’
हा उपक्रम सरकारने खेडोपाडी राबवला. करोडो रुपये खर्चून केलेले हे अभियान लोकांपर्यंत पोचले – पण ते कसे, यावर नर्मविनोदी आणि उपहासगर्भ पद्धतीने लिहिलेली ही कादंबरी आहे…कागदोपत्री यशस्वी झालेली योजना आणि प्रत्यक्षात तिचा उडालेला बोजवारा ह्यावरच ही कादंबरी बेतलेली आहे. त्यातल्याच निवडक प्रसंगांचे चित्ररुपांतर म्हणजे हा चित्रपट.

अशोक सराफ, मकरंद अनासपुरे, निर्मिती सावंत, मोहन आगाशे, दिलीप प्रभावळकर ह्या कसलेल्या अभिनेत्यांचा सहजसुंदर अभिनय आणि इतर कलाकारांची तितकीच दमदार साथ – वर बोनस म्हणून संदीप खरे यांची गीते आणि सलील कुलकर्णी यांचे संगीत.

ह्याच्या आसपासच ’झी मराठी’ चा ’गल्लीत गोंधळ…’ रिलीज झाल्या मुळे ह्या चित्रपटाला म्हणावी तशी प्रसिद्धी मिळू शकली नाही… पण तरिही ज्यांनी तो पाहिला त्या सर्वांना तो आवडला.

अगदी काहीच उणीवा नाहीत असे नाही – म्हणजे भरत जाधव आनि संजय नार्वेकर या ’स्टार्स’ ना उगाचच ओढून ताणून एक सीन दिला आहे ज्याची काहिही गरज नव्हती…पण असे १-२ किरकोळ मुद्दे सोडले तर चित्रपट चांगला आहे. जरूर पहा.


4 thoughts on “निशाणी डावा अंगठा

Add yours

 1. ha movie/pustak chhan ahe asa aikun ahe.. nakki baghin.. :)maza blog, blog roll madhe taklyabaddal thanks !! :)http://www.bhagyashree.co.cc/

  Like

 2. ha movie/pustak chhan ahe asa aikun ahe.. nakki baghin.. :)maza blog, blog roll madhe taklyabaddal thanks !! :)http://www.bhagyashree.co.cc/

  Like

 3. ??????? ??? ?????? ????? ????????? ??? ???????? ???????? ?? ????? ???. ?? ??????? ??? ?????? ??? ???…??????? ?? ???? ??? …

  Like

 4. ??????? ??? ?????? ????? ????????? ??? ???????? ???????? ?? ????? ???. ?? ??????? ??? ?????? ??? ???…??????? ?? ???? ??? …

  Like

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Create a free website or blog at WordPress.com.

Up ↑

%d bloggers like this: