संदीप खरे ची अजून एक कविता… पावसाळ्याचे निमित्त साधून…खरं तर ’पावसाळा’ म्हणावा असा पाऊस अजून पुण्यात झालाच नाहीये… उगाच आकाशातून कोणीतरी थुंकल्यासारखे चार थेंब पडलेत आत्तापर्यंत…आणि अनेक बेडकांची लग्नं लावूनही काहिही फरक पडला नाही…आता म्हणे बेडूक ही संपले…
म्हणजे पुढच्या वर्षी हीच परिस्थिती आली तर बहुतेक आधी लग्न झालेल्य बेडकांना घटस्फोट घ्यायला लावून त्यांचे परत लग्न लावावे लागेल…असो.
तर आता ही कविता –
——————————————————————————-
काय रे देवा…
आता पुन्हा पाऊस येणार….
आता पुन्हा पाऊस येणार , मग आकाश काळं नीळं होणार,
मग मातीला गंध फुटणार , मग मधेच वीज पडणार,
मग तूझी आठवण येणार, काय रे देवा…..
मग ती आठवण कुणाला दाखवता नाही येणार,
मग मी ती लपवणार,मग लपवुनही ती कुणाला तरी कळावस वाटणार,
मग ते कोणितरी ओळखणार,
मग मित्र असतील तर रडणार , नातेवाईक असतील तर चिडणार,
मग नसतच कळल तर बर, असं वाटणार…
आणि ह्या सगळ्याशी तुला काहीच देण घेण नसणार..
काय रे देवा…..
मग त्याच वेळी दूर रेडियो चालू असणार, मग त्यात एखाद जुन गाणं लागलेल असणार्,
मग त्याला एस. डी. बर्मननी चाल दिलेली असणार्,मग साहिल ते नी लिहिलेल असणार्,
मग ते लतानी गायलेल असणार्…,
मग तूही नेमक आत्ता हेच गाणं ऐकत असशील का? असा प्रश्न पडणार्,
मग उगाच छातीत काहीतरी हुरहुरणार, मग ना घेणं ना देणं पण फुकाचे कंदील लागणार्….
काय रे देवा…..
मग खिडक्यांचे गज थंडगार होत जाणार्.., मग त्याला आकाशाची आसवं लगडणार्..,
मग खिडकीत घट्ट बांधून ठेवलेल्या आपल्या पालथ्या मूठीवर ते टपटपणार्….,
मग पाच फूट पाच इंच देह अपूरा अपूरा वाटणार , मग ऊरी फुटुन जावसं वाटणार, छाताडातून ह्रुदय काढून त्या शूभ्र धारेखाली धरावासा वाटणार्…,
मग सारं कसं मूर्खासारखं उत्कटं उत्कटं होत जाणार्,
पण तरीही श्वासाची लय फक्त कमी जास्त होत राहाणार, पण बंद नाही पडणार्,
काय रे देवा…..
<span class="Apple-style-span" style="font-s
iz
e:medium;”>
iz
e:medium;”>
पाउस पडणार्.. मग हवा हिरवी होणार..मग पाना पानात हिरवा दाटणार्,
मग आपल्या मनाच पिवळ पान देठं मोडून हिरव्यात शीरू पहाणार, पण त्याला ते नाही जमणार्,
मग त्याला एकदम खर काय ते कळणार्, मग ते ओशाळणार्,
मग पून्हा शरीराशी परत येणार, सर्दी होउ नये म्हणून देहाला वाफ घ्यायला सांगणार, चहाच्या पाण्यासाठी फ्रीजमध्ये कुडमुडलेलं आलं शोधंणार्,
एस. डी. चं गाणही तोपर्यंत संपलेलं असणार्,रेडियोचा स्लॉट भरलेला असणार्,
मग तीच्या जागी ती असणार, माझ्या जागी मी असणार्, कपातल वादळं गवती चहाच्या चवीने पोटात निपचीत झालेलं असणार…..
काय रे देवा…..
पाउस गेल्यावर्षी पडला,पाउस यंदाही पडतो.. पाउस पूढच्या वर्षीही पडणार्….
काय रे देवा…..
Kay re deva kuthun suchte tumhalahi kavita, pan kharach khup chan ahe , tumachya pudhil kavitechi waat pahtey.ALL THE BEST………… Gargi sawant.
LikeLike
Kay re deva kuthun suchte tumhalahi kavita, pan kharach khup chan ahe , tumachya pudhil kavitechi waat pahtey.ALL THE BEST………… Gargi sawant.
LikeLike
same condition here… thanks for sharing nice poem
LikeLike
same condition here… thanks for sharing nice poem
LikeLike