नुकतीच सा रे ग म प ची मेगाफायनल झाली – ह्या वेळच्या पर्वाबाबत निर्णयाची उत्सुकता मला कमी होती…कारण सगळेच professional singers होते. ह्या वेळच्या पर्वाचे मुख्य आकर्षण हे स्पर्धक नसून परिक्षक होते…पण एकूणच त्यांचे ’विवेचन’ आणि ’प्रवचन’ आणि सल्ले ऐकल्यावर त्यापेक्षा देवकी पंडीत बरी असे वाटायला लागले…


गाण्यापेक्षा सुरेश वाडकर आणि ह्रुदयनाथ मंगेशकर यांचा mutual admiration club आणि त्यांच्या आठवणी ह्यावरच जास्त वेळ खर्च झाला – अर्थात त्या आठवणी आणि गाण्याचे मूल्यमापन चांगले असायचे ह्यात शंका नाही…पण हळूहळू त्याचा अतिरेक होतो आहे का अशी शंका यायला लागली होती…


प्रत्येकाची वेगळी तऱ्हा!


ह्रुदयनाथ हे सारखे सारखे फ़्लश बच्क मध्ये जात असतात…ते पण १५-२० वर्षे मागे नाही, एकदम ५०-६० वर्षे मागे – एकदम black and white आठवणी असतात… बर नुसत्या आठवणी असतील तरी ठीक…पण तसे नाही…त्या काही तरी करून ह्यांच्याशी जोडलेल्या असतात…म्हणजे बऱ्याच लोकांनी (कवी, संगीतकार, साहित्यीक ई.) मरण्यापूर्वी शेवटचा फोन त्यांना केलेला असतो. किंवा त्यांनी किंवा त्यांच्या कुटुंबियांनी chorus गायलेला असतो किंव ते recording च्या वेळेस तिथे हजर असतात ई. ई. म्हणजे इकडे गायकाचे गाणे सुरू झाले की तिकडे ते आठवणींचे गाठोडे सोडून बसतात…की आता ह्यावेळेस माझे आणि XYZ चे नाते किती जवळचे होते किंवा माझा ह्या विषयावरचा अभ्यास किती थोर आहे हे सांगतो!


हिंदी फिल्म इंडस्ट्री मध्ये जसे कंपू असतात – तसे मराठीत उघड पणे तरी दिसत नाहीत. पण बारकाईने पाहिले तर तसे ते असावेत असे जाणवते. ह्या पर्वातील बहुतेक गाणी ही मंगेशकर किंवा त्यांचा कंपू ह्यांच्याशी संबंधितच होती – जणू काही ती कार्यक्रमाची मुख्य थीम होती. आणि जेव्हा जेव्हा इतर गाणी सादर झाली तेव्हा परिक्षकांनी (किंवा ह्रुदयनाथ यांनी) त्यांच्या वर जास्त मत देणे टाळले…नुसतेच ’आपण छान गायलात’ वगैरे बोलून विषय संपवला.


सी. रामचंद्र, सुधीर फडके, सुमन कल्याणपूर, जितेंद्र अभिषेकी, श्रीधर फडके यांच्या बद्दल त्यांच्या गाण्याबद्दल बोलयाचे कटाक्षाने टाळले – किंवा इतरांची (शांता शेळके, खळेकाका, लता मंगेशकर ई.ची) जेवढी तोंड भरुन स्तुती केली तितकी बाकिच्यांची केली नाही.


एक तर आठवणींचा मारा किंवा कवितेच्या अर्थाचे ’निरुपण’ असायचे…


ते पाहून मला ’अंदाज अपना अपना’ मधल सीन आठवला. ज्यात तेजा (व्हीलन परेश रावल) आपल भाऊ राम गोपाल बजाज (बिझनेसमन परेश रावल) याला मारायचा (गेम बजाने का) प्लान बनवतो पण चुकून त्याचा मुनीम हरिशंकर मरतो.. ते सांगतान तेजा म्हणतो – ’लेकिन अच्छा हुआ. वो स्साला बहोत धरम करम की बाते करता था…बहोत बोअर करता था वो’ …परिक्षकांची टिप्पणी ऐकून तसे काहीसे वाटायचे मला 🙂


मला असे एकदा तरी ऐकायचे होते की – XYZ यांनी मला मरण्यापूर्वी फोने ही केला नाही, किंवा मी ह्या गाण्याशी कुठल्याही प्रकारे संबंधीत नव्हतो (उदा. chorus किंवा recording चा साक्षीदार ई) आणि (तरिही) हे गाणे अतिशय चा

Advertisements