पी.जे.

अर्नोल्ड आणि अलक कुबल यांनी एका चित्रपटात एकत्र काम केले तर त्याचे नाव काय असेल?

– माहेरचा टर्मिनेटर
एकदा सगळे प्राणी आषाढी एकादशीला वारीला चालत जातात. पण फक्त कोंबडी टॆक्सी घेऊन जाते. का?
– कारण आषाढी एकादशीला कोंबडी चालत नाही.
संटा: मेरे पास आज गाडी है, बंगला है…तुम्हारे पास क्या है?
बंटा: मेरे पास भी गाडी है, बंगला है.
संटा: ओये तेरे की… फिर मां किधर गयी?

तुम्ही जर एक बी पेरले आणि त्याला अंकुर फुटत नसेल तर तुम्ही त्या बी ला काय म्हणाल?
वेक अप सीड

फोन वाजतो…
नवरा: माझ्याबद्दल विचारले तर सांग मी घरी नाहिये.
बायको फोन उचलते “हो, ते घरीच आहेत”
नवरा: मी तुला काय सांगायला सांगितले होते?
बायको: लक्षात आहे…फोन माझ्यासाठी होता

What is the Height of Flirting? When your love letter starts with: “TO WHOMSOEVER IT MAY CONCERN”

समजा नील आर्मस्ट्रॊंग  १९६९ च्या ऐवजी २००९ मध्ये चंद्रावर पोहोचला असता तर?
नील आर्मस्ट्रॊंग चन्द्रावर पाऊल टाकताच त्याला २ जण दिसले…”कोण तुम्ही?”
“कॆमेरामन मयंक के साथ दीपक चौरासिया, आज तक”

पुरुष शक्यतो उजव्या मनगटावर आणि बायका डाव्या मनगटावर घड्याळ का घालतात?
सोप्पे आहे… किती वाजले ते बघायला!

पहिला चोर: पोलीस इथे पोचले आहेत…पट्कन खिडकीतून उडी मार
दुसरा: पण आपण १३ व्या मजल्यावर आहोत
पहिला: बावळटा…अंधविश्वास दाखवायची ही वेळ नाही

इन्सानियत को ब्रेड पे लगा के खा जाओ…आखिर इन्सानियत भी कोई ’चीज’ है

दोन भिकारी आणि दोन सॊफ्टवेअर ईंजिनिअर एकमेकांना भेटले तर काय म्हणतील?
तू कुठल्या ’प्लॆटफॊर्म’ वर काम करतोस?

पप्पू: बाबा, उद्या आपण खूप श्रीमंत होणार्र
ते कसे?
पप्पू: उद्या शिक्षक आम्हाला ’पैशाचे रुपये कसे करायचे’ ते शिकवणार आहेत

what happens after the lion roars… ?? “tom and jerry” starts…

राहुल गांधींना अजून सुयोग्य वधू का मिळत नाहिये?
कारण कॊंग्रेस चा स्लोगन – “सोनिया को बहु-मत दो!!”

पिंट्यासमोर ३ कोक च्या बाटल्या ठेवलेल्या असतात. २ फुलऽऽ, १ रिकामी…
तर तो रिकामी बाटली का उचलतो?
– कारण त्याल रॊकेट उडवायचे असते

एका माणसाला शिरा खुप आवडत असतो. तर तो सैन्यात जातो. क?
कारण एका जाहिरातीत लिहिलेले असते : “सैन्यात शिरा”

एक जुना विनोद सांगू?
– विनोद खन्ना

एक मुलग रु. ३००० चा रिचार्ज करतो. तो १ पण फोन किंवा एसएमएस करत नाही. तरी त्याच बॆलंस जात असतो. का?
– कारण तो एका पायावर उभा असतो

एकदा एक मुलग एका मुलीची छेड काढतो. तर ती त्याला चिडून विचारते.”ए मुला काय करतोस??!!”.
तो म्हणतो “एफ. वाय. बी. कॊम.”

यूपी मधले भैय्या आणि बिहारी लोक यांना फूटबॊल टीम मधे का घेत नहीत ?
कारण त्यांना कॊर्नर मिळाला की ते लगेच तिथे दुकान टाकतात.

पहिला: माझे बाबा इतके उंच आहेत की ते उडत्या हेलीकॊप्टरला हात लावू शकतात
दुसर: माझे बाबा पण उंच आहेत, पण ते असले आचरट चाळे करत नाहीत

तुम्ही शर्ट कुठे शिवता?
– फाटेल तिथे!

एका मुलाला त्याचे मित्र ’तेलकट’ म्हणत असतात. तो चिडतो आणि बिल्डिंगवरुन उडी मारतो, पण तो मरत नाही. क?
कारण त्यानी ’पॆरॆशूट’ लावलेले असते.

अलीबाबा गुहा शोधायला चालत निघतो. चालून चालून खूप दमतो. शेवटी एकदाची गुहा येते. तर तो काय म्हणेल ?
– आलि बाबा

एक मुलगा: माझी आई सर्विस करते.
दुसरा मुलगा: पण माझी आई टेनिस नाही खेळत

जर अजित आगरकर नी नो बॊल टाकला तर अंपायर काय म्हणेल?
– मराठी पाऊल पडते पुढे

एक सिग्नल दुसऱ्या सिग्नल ला काय म्हणेल?
इकडे बघू नकोस, मी बदलतोय!

खरा संगीत प्रेमी कोण?
एखादी तरुणी आंघोळ करत असताना गाणे गुणगुणत असेल तर

Advertisements