माझी रामरक्षा लहानपणापासूनच पाठ आहे…घरातल्या वडिलधारी मंडळींकडून सतत कानावर पडून पडून आपोआपच पाठ झाली, कधी वेगळे पाठांतर करावेच लागले नाही.

लहानपणी केलेल्या पाठांतराचे हे एक वैशिष्ट्य आहे…नकळतच पाठ होते आणि कायमचे लक्षात राहाते (आता काही पाठ करायचे/ नवीन शिकायचे म्हणजे फार मेहेनत करावी लागते)

पण तसेच त्यात एक धोका किंवा दोष पण आहे… तेव्हा जे चुकिचे किंवा सदोष/ अशुद्ध पाठांतर होते ते पण सुधारणे जड जाते. कारण तेव्हा अर्थ वगैरे काही माहितीच नसतो…नुसते कानावर पडते म्हणून लक्षात राहते.

माझे रामरक्षेबाबत तसेच काहीसे झाले आहे. काही जे चुकिचे किंवा अशुद्ध पाठ झाले आहे ते आता मला समजून सुद्धा दुरुस्त करता येत नाही.

म्हणूनच मी रामरक्षा सॉफ्ट कॉपी स्वरूपात शोधत होतो, म्हणजे सतत वाचून काही चुक दुरुस्त करता आली तर बघावे!

सुदैवाने मला नुकतीच ती सॉफ्ट कॉपी मिळाली (अर्थासकट!)…तुम्ही ती इथे डाऊनलोड करू शकता.

लवकरच रामनवमी आहे, तोपर्यंत जर जमले तर चुका सुधारायचा प्रयत्न आहे… बघु जमते का ते

ता. क. – मी रामरक्षा एम पी ३ इथे अपलोड केली आहे…आणि त्याचबरोबर ‘मुदाकरात‘ हे गणपती स्तोत्र (एम पी ३) पण अपलोड केले आहे…

~ कौस्तुभ

Advertisements