लोकं देवाला नवस बोलतात – की अमुक झाले तर तुला तमुक अर्पण करीन, दान करीन, देईन…

मग देव त्यांच्या (सगळ्यांच्या नाही, काही पुण्यवान लोकांच्या) ईच्छा पूर्ण करतो. आणि लोकं देवाला बोललेला नवस फेडतात.

मी मला स्वतःलाच नवस बोलतो. उदा. कौस्तुभ…तु हे केलेस तर मी तुला घेईन, किंवा तु ते केले नाहीस तर मी तुला ते देइन. त्यामुळे तो पूर्ण करण्याची जबाबदारीसुद्धा माझ्यावरच येते…

लोकं देवाला नवस बोलून निर्धास्त होतात…कारण उरलेलं काम देव करतो…

माझं तसं नाही…माझा नवस मलाच पूर्ण करावा लागतो, त्यासाठी लागणारे कष्ट, मेहेनत ही मलाच करावी लागते.

कधी-कधी माझ्या कष्टाचे फळ मला मिळते आणि मग मी खुश होऊन मला बोललेला नवस फेडतो…

पण बऱ्याचदा ते साध्य पूर्ण होत नाही…मग मी स्वतःवरच चिडतो (लोक देवावर चिडू शकत नाही…हा एक फरक!) आणि मग त्यावेळेस नवस फेडायचा प्रश्नच येत नाही…

मग मी revised नवस बोलतो…स्वतःलाच…आणि ते achieve करायचा प्रयत्न करतो…

असाच एक नवस म्हणजे – iPhone घेणे. मला iPhone 3GS घ्यायचाय…पण काही गोष्टी पूर्ण झाल्या तरच.

दुर्दैवानी त्या गोष्टी ठरवलेल्या time frame मध्ये पूर्ण झाल्या नाहीयेत. त्यामुळे मी आत्ता किंवा नजीकच्या काळात iPhone घेऊ शकत नाहीये…जोवर मी ठरवलेले उद्दिष्ट पूर्ण करत नाही 😦

तो पर्यंत मी हाच माझा कॆमेरा फोन असेल 🙂

~ कौस्तुभ
Advertisements