‪#‎धचामा_2015‬

मूळ मेसेज असा होता –
बाजीराव मस्तानी
“चित्रपट पाहू नये”

आनंदीबाईनी तो असा फॉरवर्ड केला

“चित्रपट पाहून ये”

… चित्रपट हिट झाला 😎😎😎


शास्त्रज्ञांनी हे सिद्ध केलेय

की जगात……..

.
.
१५७२३४४८९३ लोकं
.
.
,
,
,
,
,
,
,
,
एवढे आळशी आहेत की
त्यांनी आतासुद्धा वर दिलेली
संख्या वाचली नसणार.


एकदा निखिल वागळे आजचा सवाल संपवुन घरी येतात. घरातले वातावरण गरम दिसते.

श्रीमती रागावलेल्या असतात.

श्रीमती : रोज रात्री 12 , 1 वाजतात यायला तुम्हाला, घराची तर काही काळजीच नाही. जेव्हा बघावं तेव्हा हातवारे करत बातम्या देता. रात्री झोपेत सुद्धा भाई एक मिनिट थांबा, चांदोरकर पूर्ण करा, अण्णा बोला बोला, मेधा ताई याच उत्तर द्या अशी नावं घेता.
स्वतः झोपत नाहीच, मलाही झोपु देत नाही.

वागळे(हातवारे करत) – काय मागण्या आहेत आपल्या? यावर आपणाला शांततेच्या मार्गाने
उपाय काढता येणार नाही का ?

श्रीमती – मलाही वाटतं,
तुम्ही कधी तरी प्रेमाचे 2 शब्द बोलावे माझ्याशी,
एखादी छानशी चारोळी लिहावी माझ्यासाठी,
पण तुमचं आपलं फक्त आँफिस आणि बातम्या हं हं हअअअअअअ

वागळे – ठीके, अहो तुम्ही रडु नका. यावर उपाय आहे. मला उत्तर देऊ द्या. हे माझं घर आहे मला बोलु द्या. उत्तर देण्यापूर्वी आपण घेउया एक ब्रेक.
ब्रेकवर जाण्यापुर्वी माझा प्रश्न पहा..
“घरातील लोकांना मि वेळ देत नाही हा आरोप योग्य आहे का ?”

होय म्हणतात 99 टक्के लोक…

जनता श्रीमतीच्या बाजुने आहे.

ब्रेकवर जाण्यापूर्वी माझे उत्तर देखील ऐका,

श्रीमतीजींसाठी एक चारोळी –
“तेरे प्यार में लिखे मैने हजारो खत,
तेरे प्यार में लिखे मैने हजारो खत,
अचूक बातमी ठाम मत,
पहा फक्त आयबीएन लोकमत.!!”


 

 

Advertisements