राग धनखलास 

संगीत प्रेमींसाठी नवीन राग – मोदी घराण्याकडून

 

हा राग आम्हाला सातवाहन कालीन “पैशाची” भाषेतल्या एका कागदपत्रात सापडला. त्यानंतर “मोडी” लिपीत त्याचे भाषांतर झाले असावे. आणि शेवटी आजच्या लोकप्रिय “मोदी” घराण्याने त्याला राजमान्यता दिली

 

रागाची मांडणी 

“म-नी” वर्ज्य स्वर

आरोह – सा रे ग प्प

अवरोह – ग प्प सा रे

 

वैशिष्ट्ये: हा राग दिवसातल्या कोणत्याही समयी गायला जाऊ शकतो. याला वेळकाळाचे बंधन नाही. या रागाची रचनाच अशी आहे की आधी तारसप्तकात असलेल्या धनदांडग्याचें सूर नंतर मध्य आणि त्यानंतर मंद्र सप्तकात लोप पावतात. लक्ष्मीपुत्र धनिकांनी हा राग ऐकल्यास त्यांच्या अंगाची लाही लाही होते. अशी या रागाची ख्याती पूर्वापार आहे. राग दीपकासारखा. याची चाल ओळखून बरेच जण राग “धन”श्री मधून राग “माल”कंस आणि मग अखेरीस कृष्णधन गंगाजलात फेकून ऐश्वर्याची “भैरवी” केव्हा गायला लागलात, हे त्यांचे त्यांनासुद्धा समाजात नाही. राग “धनखलास” असा हा वैराग्यप्राय आणि विरक्तीयुक्त राग आहे. राग “कृष्णधनखलास” हा त्याचा तीव्र अविष्कार आहे.

 

 

 

 

Advertisements