पुणेकरांबद्दल आणि पुण्यातल्या विक्षिप्त, आगाऊ, विचित्र दुकानदारांबद्दल अनेक विनोद तुम्ही ऐकले, वाचले (किंवा रचले?) असतील…

आणि त्यात बऱ्याच प्रमाणात तथ्यदेखील असते. आता आजचेच उदाहरण पहा ना…

आजच्या “सकाळ” मध्ये “चितळे बंधू” यांची ही जाहिरात आली आहे. चितळे डेअरी यांनी दुधाच्या दारात वाढ केली. आता यात विशेष काही नाही. पण जर तुम्ही त्याखालचा मजकूर वाचलात तर समजेल की अशा आगाऊपणामुळे पुणेकरांचे नाव कसे बदनाम होते…

chitale-bandhu

 

म्हणजे ह्यांच्या जुन्या पिशव्या (जुने दर छापलेले असलेल्या) वाया जाऊ नयेत म्हणून ग्राहकांनी समजावून घ्यायचे आणि रु. २ जास्त देऊन “सहकार्य” करायचे?!

तरी नशीब शेवटी “…ही विनंती” असं लिहिलंय… “हुकुमावरून” असं नाही.

साधारण ३.८% किंमत वाढवल्यावर (५२–>५४) पिशव्यांवर नवीन किंमत छापायचा खर्चही ह्यांना नकोसा वाटतो? ह्यावर “अशी ही बनवाबनवी” मधला सुधीर जोशी यांचा हा डायलॉग आठवला…

“हा हलकट हलकटपणा आहे माने… हे जे काही तुम्ही चालवलं आहे ना, तो हलकटपणा आहे!”



असो.

 

 

 

Advertisements