संत तुकाराम – काही अभंग

Tukaram

गाढव शृंगारिले कोडे, काही केल्या न हो घोडे
त्याचे भुंकणे न राहे, स्वभावाशी करील काये,
श्वान शिबिके बैसविले,भुंकता, न राहे उगले
तुका म्हणे स्वभावकर्म, काही केल्या न सुटे धर्म

-संत तुकाराम
कोडे = कौतुकाने
शिबिके = पालखीत
उगले = स्तब्ध , निवांत
————————————————
४३४३
म्हणे विठ्ठल पाषाण । त्याच्या तोंडावरि वाहाण॥१॥
नको नको दर्शन त्याचें । गलितकुष्ट भरो वाचे ॥ध्रु.॥
शाळिग्रामासि म्हणे धोंडा । कोड पडो त्याच्या तोंडा ॥२॥
भावी सद्ग‍ु मनुष्य । त्याचें खंडो का आयुष्य ॥३॥
हरिभक्ताच्या करी चेष्टा । त्याचे तोंडीं पडो विष्ठा ॥४॥
तुका म्हणे किती ऐकों । कोठवरी मर्यादा राखों ॥५॥
——————————————————–
नाही निर्मळ जीवन । काय करील साबण ॥ १ ॥
तैसे चित्तशुद्धी नाही । तेथे बोध करील काई ॥ २ ॥
वृक्ष न धरी पुष्पफळ । काय करील वसंत काळ ॥ ३ ॥
वांजे न होती लेकुरे । काय करावे भ्रतारे ॥ ४ ॥
नपुंसका पुरुषासी । काय करील बाईल त्यासी ॥ ५ ॥
प्राण गेलिया शरीर । काय करील वेव्हार ॥ ६ ॥
तुका म्हणे जीवने विण । पिक नव्हे नव्हे जाण ॥ ७ ॥
 ——————————————————–

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Create a free website or blog at WordPress.com.

Up ↑

%d bloggers like this: