कवयित्री पद्मा गोळे यांची कविता…

चाफ्याच्या झाडा

वाचन: अभिनेत्री स्पृहा जोशी आणि सुनिताबाई देशपांडे

दोन पिढ्यांच्या सादरीकरणात किती फरक पडतो बघा.

असे ऐकलं की, हे सुनिताबाईंनी पुलं गेल्यानंतर केलेले पहिले कविता वाचन होते.

दोन्ही ऐकल्यावर नकळत असं वाटलं की वाचन (पठण या अर्थी) आणि अर्थपूर्ण सादरीकरण यातला फरक समजावून घेण्यासाठी हे उत्तम उदाहरण आहे.

स्पृहाने वाईट केले आहे असे अजिबात नाही; सुनिताबाईंचे वाचन उपलब्ध नसते तर स्पृहाचे कौतुकच झाले असते.

पण हे दोन्ही पाहिल्यावर असे वाटले की स्वत: त्या कवितेचा आशय जगणे किंवा कोणालातरी तसे जगताना पाहणे आणि ती कविता नुसती वाचून अर्थ लावणे याचा सादरीकरणावर नक्कीच फरक पडत असणार! दुसरा फरक वयाचा/अनुभवाचा/ज्येष्ठतेचा. ती समज, ती परिपक्वता, ती दृष्टी कशी आणणार? आणि हो, याचा वाढत्या वयाशी काही संबंध नसतो…नाहीतर, “तू कधी मोठा होणार?” हा प्रश्न ३५-३६ व्या वर्षी कोणला विचारावा लागला नसता.

असो.

तर आता तुम्ही हे दोन्ही कविता वाचन नक्की ऐका…

Advertisements