काही दिवसांपूर्वी मी “भाडीपा” (भारतीय डिजिटल पार्टी) ह्या वेब सिरीज बद्दल लिहिले. त्यानंतर त्यांचे आणि तशा प्रकारचे इतर अनेक चॅनेल/कार्यक्रम मी बघितले. त्यातलेच काही निवडक इथे द्यायचा विचार आहे.

काही चांगले आहेत, काही बरे तर काही सुमार आणि ओढून ताणून केलेले…पण तसे पाहिल्याशिवाय चांगल्याचं मोल कळत नाही…

 

 

तसाच खास टीव्ही वरचा निखिल वागळे यांची नक्कल करणारा “थेट भेट” चा हा भाग पण आवडला

 

अर्थात सगळे विनोदी च कार्यक्रम आहेत असं नाही. मराठी चित्रपटाविषयी चर्चा करणारे हे कार्यक्रम पण खूप चांगले आहेत. विशेष म्हणजे मराठी मध्ये सहसा चर्चा न होणारे “बिझनेस” बद्दलचे आकडे ही इथे एका भागात मोकळेपणाने मांडले आहेत.

 

 

एकूणच मराठी जगताला “डिजिटल” हे माध्यम हळू हळू समजायला लागलं आहे असं म्हणायला हरकत नाही…

Advertisements