मला माझ्या लहानपणी (१९८०-१९८६) मराठी बालगीतं वगैरे फारसं कधी ऐकल्याचं आठवतच नाही. अगदी आठवत असल्यापासूनच्या वयात मला फक्त चित्रपट संगीत किंवा शास्त्रीय संगीतच ऐकल्याचं आठवतंय.
म्हणजे बालगीतं माहिती नव्हती असं नाही, पण खास लहान मुलांची गाणी म्हणून त्यात रमल्याचं आठवत नाही.
चांदोबा चांदोबा भागलास का…
कोणास ठाऊक कसा?
नाच रे मोरा आंब्याच्या वनात
शेपटीवाल्या प्राण्यांची
मामाच्या गावाला जाऊया
सांग सांग भोलानाथ
चल रे भोपळ्या टुणूक टुणूक
गोरी गोरी पान…
ही त्या काळची बालगीतं म्हणून माहिती होती. “गोरी गोरी पान…” हे एक चावट/अश्लील गाणं आहे असं ८ वी-९वी मध्ये असताना समजलं जायचं. म्हणजे “दादा मला एक वहिनी आण…” अशी खुलेआम मागणी होती म्हणून. पण ते म्हणजे उगाच…साधारण चावट/अश्लील बोलणे जेव्हा सुरु होतं आणि त्यातसुद्धा काही “पुढारलेले” इतरांना “तुम्हाला नाही समजणार…तुम्ही अजून सुधारलेले नाहीत” असं दाखवत एकमेकांत कुजबुजत किंवा सांकेतिक भाषेत बोलत जितका पांचटपणा करतात त्या लेव्हलचा तो प्रकार होता.
त्यानंतर अनेक वर्ष मराठी बालगीतं अशी ऐकायची वेळ आली नाही. माझी इतर चुलत, मामे, आत्ते भावंडं (जी माझ्यापेक्षा खूप लहान होती) मोठी होत असताना काही गाणी ऐकली जायची… पण तीच तीच गाणी.
बहुदा अग्गोबाई ढग्गोबाई हे सलील-कुलकर्णी-संदीप खरे यांचं गाणं हे “फ्रेश” बालगीत म्हणून ऐकलं.
अग्गोबाई ढग्गोबाई हे माझ्या लहानपणी (१९८०-१९८६) मध्ये नव्हतं. ते गाणं खूपच उशिराचं म्हणजे १९९९ चं आहे.
त्यानंतर परत बऱ्याच वर्षांची गॅप पडली. नवीन मराठी बालगीतं कानावर पडली नाहीत. म्हणजे निघाली असतील ही… पण मी ऐकली नाहीत.
आता अगदी अलीकडे म्हणजे २०१५-१६ नंतर माझ्या पुतण्यामुळे परत बालगीतं हा प्रकार पुन्हा सुरु झाला. पण त्याच्या वेळेस बहुतांश वेळा इंग्लिश किंवा हिंदी बालगीतं चालायची…म्हणजे ओल्ड मॅक-डोनाल्ड, जॉनी जॉनी, व्हील्स ऑन द बस, फाइव्ह लिटिल डक्स, डॅडी फिंगर… नानी ‘तेरी मोरानी को…आलू का चालू…. इत्यादी.
मराठी बालगीतं तीच ती नेहेमीची.
पण आता गेल्या वर्षभरात माझ्या मुलीमुळे मी नवीन मराठी बालगीतं खूप शोधली. नवीन म्हणजे, माझ्यासाठी नवीन. खरी किती सालची आहेत ते माहिती नाही…बहुदा गेल्या १० वर्षामधीलच असतील.
पण मला ही नवीन गाणी फारच आवडली. एकतर फ्रेश वाटली, आणि दुसरं म्हणजे गाणारी लहान मुलं, त्यांचा निरागस आवाज, ठेका, संगीत, शब्द…अगदी बाळबोध आणि साधे वाटले.
सध्या मुलीपेक्षा मीच ही गाणी जास्त ऐकतोय 🙂
बघा, तुम्हाला कशी वाटतात…
आला फेरीवाला आला… हे थोडंसं “इचक दाना बिचक दाना…” ची आठवण करून देणारं वाटतं?
ही झाली श्रवणीय गाणी. पण काही बालगीते प्रेक्षणीय पण आहेत… मुलांच्या बाबांसाठी 🙂
पटत नसेल तर स्वतः बघा… पण फारच ओव्हर ऍक्टिंग आहे…
फक्त ही एकच नाही तर अजून एक दोन असे प्रेक्षणीय (?) ऑप्शन्स आहेत
पण मला माझ्या मुलीमुळे ह्या नवीन बालगीतांची ओळख झाली. आणि सध्याच्या (बहुतांशी) सुमार मराठी संगीतापासून वेगळं काही तरी ऐकायची संधी मिळाली.
त्यामुळे, मी पुन्हा एकदा मराठी बालगीतं ऐकतोय!
Leave a Reply