लोकराज्य हे मासिक महाराष्ट्र राज्य सरकारच्या “माहिती व जनसंपर्क महासंचालनालय” विभागातर्फे चालवले जाते.
सरकारी असूनही त्याचा दर्जा खूपच चांगला असते, आणि किंमत अतिशय वाजवी (रू १० फक्त).
विविध विषयांवरचे विशेषांक आणि भरगच्च मजकूर हे या मासिकाचे आणखी एक वैशिष्ट्य…जाहिराती अगदी मोजक्या असतात (विशेषांकामध्ये…इतर वेळेसही कमी प्रमाणात असतात).
ह्या वेळचा विशेषांक “महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव” ह्या नावाने आहे.
महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि साहित्यिक/सांगितिक इतिहासातले तीन थोर व्यक्तिमत्व: पु. ल. देशपांडे, सुधीर फडके आणि ग. दि. माडगूळकर – ह्या तिघांचेही २०१९ हे जन्मशताब्दी वर्ष आहे. त्या तिघांबद्दलचा हा विशेषांक आहे.
एकाच क्षेत्रातल्या तीन सुप्रसिद्ध व्यक्तींचा जन्म एकाच वर्षी होणे ही तशी दुर्मिळ गोष्ट आहे.
सलमान खान, आमीर खान आणि शाहरूख खान या तिघांचा जन्म १९६५ चा आहे…पण ते क्वचितच घडतं…तसेच ह्या तिघांचं मराठी साहित्य, कला यातले योगदान फार जास्त आहे, म्हणून ह्या विशेषांकाचं महत्व थोडं जास्तच आहे.
तर हा विशेषांक नक्की वाचा.
Leave a Reply