कोजागरपूर्णिमायाः शुभे अवसरे चन्द्रमसः पञ्चाशदधिकानि नामानि।
ओ३म् श्रीमहालक्ष्म्यै नमः।
ओ३म् नमश्चन्द्रमसे ।
In Sanskrit language there are more than 50 names of the #Chandra Deva ( The #Moon). The following list is not exclusive.
आज कोजागिरी पौर्णिमा. “ज्येष्ठापत्यम् निरांजनम्”…असं माझी आजी म्हणायची.
म्हणजे घरातल्या ज्येष्ठ अपत्याला आोवाळायचा दिवस. ही प्रथा का आहे किंवा कधी सुरू झाली ते माहिती नाही, पण आमच्याकडे मात्र पाळली जाते. आज दरवर्षीप्रमाणे आईनी मला ओवाळले. मला अशा प्रसंगी फार awkward होते. काहीही कर्तृत्व नसताना उगाचच ज्येष्ठ मुलगा म्हणून कौतुक. पण आई मात्र माझं काही ऐकून घेत नाही.
हल्ली बहुतेकांकडे एकेकच मूल असते, त्यामुळे तेच ज्येष्ठ आणि तेच कनिष्ठ.
त्यामुळे आईनी आज मला आणि माझ्या मुलीला पण ओवाळले!
आज मनीमाऊची (आणि तिच्या बाळाची) खूप आठवण झाली 🙂
Leave a Reply