आज लोकसत्ताच्या चतुरंग पुरवणीमध्ये नात्यांची उकल : दोघांत ‘तिसरी’ हा सुंदर लेख आहे. त्याच्या टॅगलाईनमुळेच उत्सुकता निर्माण झाली आणि मग पूर्ण लेख वाचून काढला.
टॅगलाईन होती: “दोन व्यक्तींमध्ये एखादी ‘तिसरी प्रेमाची’ व्यक्ती आली, की आपण त्याला सहजपणे नाव देऊन टाकतो, व्यभिचार“
संपूर्ण लेखच आवडला, कारण मी त्याच्याशी खूप जास्त रिलेट करू शकलो. पण त्यातल्या त्यात हा भाग आवडला:
आपण एक साधी बाब विसरतो, ती म्हणजे आपल्याला एकाच व्यक्तीसोबत सारे काही अनुभव घेण्यातही मजा येऊ शकते किंवा प्रत्येक अनुभव घेण्यासाठी अनेक व्यक्ती असेही समीकरण असू शकते. उदा. एखाद्या स्नेह्य़ासोबत कॉफीचा आस्वाद घेताना त्याच्यासोबत होणाऱ्या गप्पा हा केवळ त्याच्याचसोबतचा अनुभव असू शकतो किंवा आपल्याला चित्रपट एकटय़ालाच पाहायला आवडत असेल किंवा कोणी विशिष्ट व्यक्ती हीच आपली यासाठी निवड असू शकेल. तसेच अगदी सहलीला, प्रवासाला जाताना किंवा इतर कशाही बाबत.
सर्व अनुभव एकाच व्यक्तीसह घ्यावेसे वाटू लागले आणि त्यातून आयुष्यात अधिक आनंद निर्माण झाला तर ती व्यक्ती हाच आपला खरा जोडीदार नाही का..?
नक्की वाचा हा लेख…
https://www.loksatta.com/chaturang-news/third-love-person-dr-urjita-kulkarni-abn-97-2036178/
Leave a Reply