स्वप्नावस्था – सत्य किती आणि कल्पित किती?

स्वप्न ह्या विषयाबद्दल मला बरेच कुतूहल आहे. त्याचा काही अभ्यास मी केला आहे किंवा तज्ज्ञ लोकांशी चर्चा केली आहे असे नाही. तसेही मला स्वप्नं फार क्वचित पडतात. एक नेहेमी पडणारे स्वप्न म्हणजे मी अंतराळात, ज्याला bottomless pit म्हणता येईल अशा पोकळीत खाली पडतो आहे…आणि तसे पडत असतानाच कधी तरी जाग येते. 


कधी कधी स्वप्न इतकी तपशीलवार असतात की ज्या ठिकाणी एकदाच गेलो असेन किंवा ज्यांना एकदाच भेटलो असेन ते ठिकाण किंवा व्यक्ती अगदी तपशीलवार स्वप्नात दिसते. 
एक दोनदा (“१०० डेज” चित्रपटासारखे आधी स्वप्नात दिसले आणि मग तसे प्रत्यक्ष घडले असे ही वाटले आहे. 


हे आत्ता आठवायचे कारण म्हणजे कालचे स्वप्न… 


मागच्या आठवड्यात मी चेन्नई एअरपोर्ट वरून येत होतो. पुण्याची फ्लाईट असल्यामुळे बऱ्यापैकी मराठी लोकं होते. त्यात एक व्यक्ती मला माझ्या पूर्वीच्या सर्वात आवडत्या व्यक्तीचे पती आहेत असे वाटले. प्रत्यक्ष एकदाच पहिले असले तरी फोटोवरून मला कसे दिसतात ते माहिती आहे. त्यावरून ती व्यक्ती तेच आहेत असं वाटलं. तेसुद्धा मला पाहून पूर्ण दुर्लक्ष केल्यासारखं करत असल्यामुळे माझी अजूनच खात्री झाली 🙂


पण नंतर नीट पाहिल्यावर जाणवलं की ते वेगळेच कुणीतरी आहेत. 


त्यानंतर ३-४ दिवस झाले असतील…काल मला अचानक असे स्वप्न पडले की मी, माझे आई-वडील त्यांच्या घरी गेलो आहोत. माझी प्रिय व्यक्ती घरी नसल्यामुळे आम्ही इकडच्या तिकडच्या जुजबी गप्पा मारल्या. त्यांनी (मध्ये बराच काळ होऊन गेलेला असल्यामुळे) माझी विचारपूस केली. मी देखील त्यांच्या मुलाला बऱ्याच वर्षांनी पाहात असल्यामुळे त्याच्याशी गप्पा मारल्या. त्याला अर्थातच माझ्याबद्दल विशेष काही आठवत नव्हते. 

बराच वेळ झाला तरी माझी प्रिय व्यक्ती न आल्यामुळे मी आणि माझे आई-वडील घरी परतलो. जाताना तिच्या पतीने मला “मी तिला तुम्ही येऊन गेलात असे सांगतो, आणि फोन करायला सांगतो” असे म्हणल्यावर मला प्रचंड आनंद झाला. त्यांच्या घराचे आणि आजू बाजूचे सगळे तपशील अगदी जसेच्या तसे स्वप्नांत दिसले…

तिथून घरी निघालो आणि स्वप्न संपले. अचानक जाग आली.. तेव्हा जाणवले की पहाटेचे ४:३० वाजले होते. त्यानंतर बराच वेळ विचार करत जागा होतो. चेन्नई एरपोर्टच्या प्रसंगामुळे त्या व्यक्तीचा विचार, त्या आठवणी कुठे तरी अंतर्मनात चालू असणार…त्यामुळेच असे स्वप्न पडले. 

मग वाटले – संपूर्ण कल्पित असे काही असते का? की त्यात कुठे तरी सत्याचा एक पदर असतोच? तसेच ज्या गोष्टी आपल्या अंतर्मनात घट्ट रुतलेल्या असतात त्याच पुढे स्वप्न म्हणून आकार घेतात का?
असं म्हणतात कि बरेचदा स्वप्नातल्या व्यक्तींना देखील त्याच प्रकारचे किंवा त्या व्यक्तींबद्दलचे स्वप्न पडते. असं भविष्यात करणे शक्य आहे का? 

Inception चित्रपटात multi-layered स्वप्न दाखवली आहेत. म्हणजे २-३ लेव्हल ची स्वप्ने… स्वप्नात स्वप्ने. तसेच त्यातला एक मुख्य विचार किंवा थिम म्हणजे: “An idea is like a virus, resilient, highly contagious. The smallest seed of an idea can grow. It can grow to define or destroy you.”

म्हणजे कल्पना किंवा विचार दुसऱ्याच्या मनात तुम्ही पेरू शकता… आणि नंतर तो विचार आपोआप तिथे रुजतो, वाढतो…आणि मग तुम्ही त्यांना पूर्णपणे नियंत्रित करू शकता – त्यांना आबाद किंवा बरबाद करू शकता. 
खरंच जर असं घडलं तर काय काय घडू शकेल…चांगले आणि वाईट. 

हा प्रयोग स्वतः वर करून बघायचा माझा विचार आहे. म्हणजे एखादा विचार reinforce करून, वारंवार स्वतःशी करून तो अंतर्मनात  रुजवता येईल का? तो स्वप्नात आणता येईल का? असं करायचा विचार आहे. बघू…खरंच तसे घडले आणि तसे स्वप्न manage करता आले तर नक्की त्याबद्दल लिहीन… 

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Blog at WordPress.com.

Up ↑

%d bloggers like this: