काय तो सुवर्ण काळ होता…
दिवसभराची कामं आटोपली की एक एक करून लोकं बार मध्ये जमायचे.
तो गाडी पार्क करण्यासाठी सरसावलेला सिक्युरिटी गार्ड
आत जातांना सलाम करणारा तो वेटर
तो मंद लाईट
लोकांचा चाललेला किलबिलाट,
गल्ल्यावर बसलेला आणि भारदस्त पर्सनालीटी वाला तो बार मालक आण्णा.
अण्णा हसतमुखाने स्वागत करायचा प्रत्येकाचे.
येणाऱ्या प्रत्येकाला बसण्यास जागा मिळवून देण्यास अण्णा आणि त्याचे सहकारी तत्पर असायचे.
एक पाट दहा ठिकाणी करणे यालाच म्हणत असावे
टेबलवर ते टिप्पीकल बेडशीट टाईप्स चेक्सचे टेबल क्लॉथ.
टेबलच्या सेंटरला उलटे ठेवलेले ते चार ग्लास,
शेजारी टिश्यूबॉक्स आणि त्या बाजूला ते सिगारेट साठीचे धगधगतं अग्निकुंड.
न मागता समोरच्याला, सिगरेट शेअर करणं, यातूनच त्यागाची भुमिका जन्म घेते.
…… जगानं तुम्हाला कितीही झिडकारलं असलं तरी,
तात्पुरते का होईना तुम्हीच बिल गेट्स असल्याचा मान तुम्हाला देणारा तो कॕप्टन व त्याचा वेटर चा लवाजमा
ऑर्डर देताना वधुपित्याप्रमाणे येणारी तुमची ती जबाबदारी.
बहुदा यातूनच जाबाबदार नागरिक जन्म घेत असावा.
पीकविमा परताव्यापेक्षा तत्पर येणारी तुमची ऑर्डर,
सोबत साखर कारखान्याने सभासदांना अत्यल्प दरात साखर द्यावी,
अगदी तश्याचं येणाऱ्या त्या कॉम्प्लिमेंट्री चकणा प्लेट्स.
किती अद्भूत अणि मनाला आनंद देणार हा क्षण….वाह!!!!
अहा.
अहाहा..
अहाहा हा हा… काय तो नवाबी थाट
पेग समोर येताच मधल्या बोटाने शिंपडलेला तो एक थेंब.
जणु संपुर्ण वातवरण खऱ्या अर्थाने पवित्र केल्याचा तो आभास.
पेग बाय पेग सुरू,
मग होणारं ते संभाषण.
हवेत धुकं पसरावं,
तसा पसणारा तो धूर.
चारदोन घोट पोटात गेल्यावर आपल्यातला जागणारा तो आंतरराष्ट्रीय लेव्हलचा सल्लागार.
जगात तुमचं स्थान काहीही असू द्या, खऱ्या अर्थाने इथे सर्वधर्म समभाव दिसून येतो.
राजा असो वा रंक, इथे सर्वच सम्राट.
म्हणूनच जो तो मद्य सम्राट बिरुदावली चा मान मिरवतो.
लोक गीते वर हात ठेऊन खोटं बोलतांना मी पहिलंय.
पण ग्लास हातात घेऊन कुणी खोटं बोललेलं कधीच दिसणार नाही.
प्रत्येक जण जणु सुसंस्कृत असल्या प्रमाणे बार चे प्रोटोकॉल न चुकता पाळतो.
राजकारण,समाजकारण,याचे गाढे अभ्यासक यातूनच जन्म घेतात
मध्येच उठून पावलं सरळ टाकल्याचा अभिनय करीत टॉयलेटला जाऊन येणे…
आणि सगळे सोपस्कार
आवरल्यावर खाल्लं जाणारं ते कलकत्ताचं बेळगाव चटणी पान………..
आणि पुढल्या दिवशी चा नियोजित कार्यक्रम ठरवून विसर्जित झालेली ती बैठक…!
आता कसलं काय…?
डोळ्यातुन सारखं पाणी येतंय!!
गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी
जणु लेक सासुरी जाये मागे परतुनी पाहे…..अशी होणारी जिवाची दोलायमान अवस्था.
अणि अस्वस्थता.
🤨😜🍻
Leave a Reply