आज भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरू होत आहे (जन्म: ४ फेब्रुवारी २०२२).
आज त्यांच्या पुरस्कारांची माहिती वाचताना एक विशेष गोष्ट जाणवली. ती अशी की त्यांना चारही पद्म पुरस्कार मिळाले आहेत — पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण आणि भारतरत्न!

हे वाचल्यावर मी उत्सुकतेने अजून थोडी माहिती घेतली. आजपर्यंत केवळ ४ जणांना चारही पद्म पुरस्कार मिळाले आहेत. ते म्हणजे: सत्यजित राय, उस्ताद बिसमिल्ला खां, पंडित भीमसेन जोशी आणि भूपेन हजारीका.
(लता मंगेशकर यांना पण चारही पद्म पुरस्कार मिळाले नाहीत. पद्मश्री सोडून इतर ३ मिळाले)
ही ४ नावे वाचून असे जाणवले की केवळ साहित्य/संगीत/कला या क्षेत्रातल्या लोकांनाच चारही पद्म पुरस्कार मिळण्याची शक्यता असते. कारण त्यांची कारकीर्द खूप लवकर सुरू होऊन खूप दीर्घकाळ चालते. वर उल्लेखलेल्या ४ जणांची कारकीर्द कदाचित ५-६ दशके एवढी दीर्घ असेल. त्यामानाने राजकारण, समाजसेवा, क्रीडा, विज्ञान/तंत्रज्ञान/आरोग्य, तत्वज्ञान इ. क्षेत्रात इतकी दीर्घ कारकीर्द नसते.
माझा आवडता विशवनाथन आनंद ह्याला भारत रत्न सोडून इतर तीन पद्म पुरस्कार मिळाले आहेत. खरं तर भारतरत्नदेखील आत्तापर्यंत मिळायला हवं होतं. पण यथावकाश ते मिळेल अशी आशा आहे. तसे झाल्यास चारही पद्म पुरस्कार मिळवणारा तो एकूण पाचवा आणि पहिला खेळाडू ठरेल.
असो…
आता आजचे उत्सवमूर्ती पं. भीमसेन जोशी यांचे माझे आवडते गायन येथे शेअर करतो.
Leave a Reply