मी शाळेत असताना संस्कृत ३ वर्ष शिकलो – ८ वी ते १० वी. त्याआधी मला अनेक संस्कृत श्लोक किंवा स्तोत्र पाठ झालेली होती…पण अर्थ किंवा व्याकरण काहीही समजत नव्हते.
शाळेत देखील संस्कृत हे जुजबीच शिकवले होते. म्हणजे अगदी प्राथमिक स्वरूपाचे…व्याकरण वगैरेची तोंड ओळख. स्वतः वाक्य तयार करणे किंवा अर्थ लावणे यावर भर नव्हताच. कारण संस्कृत हा 3rd language आणि हमखास मार्क मिळवून देणारा विषय म्हणून मानला जायचा. आणि तसेच झाले. मला १० वी ला संस्कृत मध्ये ९५ गुण मिळाले, पण भाषा ह्या दृष्टीने काहीच प्रगती झाली नाही.
संस्कृत भाषा शिकायला मला आवडले असते…तसेच आणखी एखादी भाषा – जर्मन किंवा चायनीज सुद्धा.
त्यानंतर संस्कृत किंवा अशा अन्य जुन्या भाषा (लॅटिन , पाली ई . ) याबद्दलचे माझे विचार बदलत गेले. विशेषतः संस्कृत बद्दलचे. आणि त्याला कारण म्हणजे अंधभक्त आणि नवभारतातील चड्डी ब्रिगेडचे (म्हणजे संघाचे) ट्रोल्स.
संस्कृत बद्दल पसरवला जाणारा खोटा प्रचार आणि अहंगंड हा ह्या लोंकांचा मोठा गुन्हा आहे. उदाहरणार्थ संस्कृत ही जगातली सर्वात थोर भाषा आहे आणि NASA ने देखील संस्कृत ही Computers साठी सगळ्यात उपयुक्त भाषा आहे असे मान्य केले आहे.
Nonsense! नासा ने असं काही म्हटलेलं नाही. संस्कृत ही बाकी भाषांपेक्षा शास्त्रशुद्ध आहे हे खरंय पण त्याचा अर्थ ती सगळ्याच बाबतीत सर्वोत्तम आहे असा अट्टाहास केलाच पाहिजे असे नाही. पण ज्यांना कुठल्याही गोष्टीचा उगाचच अभिमान असतो (आणि नुसता नाही जाज्वल्य अभिमान!) त्यांना ही गोष्ट कशी पचणार? अगदी क्षणभर असं मान्य केलं की संस्कृत ही भाषा थोर होती, तरी त्याचा ह्या टोणग्यांना अभिमान का असावा? त्यांना तर संस्कृत मधला “ओ: किं ठो:” येत नाही (हे “ओ की ठो” या मराठी वाक्प्रचाराचे संस्कृत version होते. सगळ्याला विसर्ग किंवा अं जोडले की संस्कृत होते… असा: आम्हास: वाटतिष्यामि… असो!)
त्यामुळे मला संस्कृत च्या नावाने नक्राश्रू गाळणाऱ्या संघी भामट्यांचा प्रचंड राग आहे. पण त्याच बरोबर जे खरोखरी संस्कृत शिकतात आणि त्यासाठी अनेक वर्षे, काही वेळेस संपूर्ण आयुष्य खर्च करतात त्यांचे खूप कौतुक आहे, आणि त्यांच्याबद्दल आदर आहे. (नीट समजून घ्या…त्यांचा मला अभिमान आहे असं मी म्हटलेलं नाही…कारण मला फुकटचा अभिमान वाटायचं काही कारण नाही. पण आदर नक्कीच आहे, आणि कौतुकही).
हे सगळं आठवायचं कारण म्हणजे अश्याच एका संस्कृत पंडितांना मी फॉललॉव करायचो ते गुलाम बिराजदार. त्यांचे वैष्टिष्ट्य असे की ते मुस्लीम असूनही संस्कृतचे पंडित होते आणि अस्खलित संस्कृत बोलू शकायचे.
आता खरं तर मुस्लीम असणाऱ्याने संस्कृत शिकू किंवा बोलू नये असे नाही…पण आपल्या देशात त्यांचे मुस्लीम असणे ही बाब पण फार महत्वाची आहे. दोन गोष्टींसाठी… एक तर संघी ठोंब्यांना उदाहरण म्हणून… की ज्यांना संस्कृत बद्दल आस्था, तळमळ आहे ते शिकतात…नुसताच फुकटचा “अभिमान” बाळगून WhatsApp फॉरवर्ड करत बसत नाहीत. दुसरे…संघोट्यांना पण हे उदाहरण त्यांच्या कोत्या हिंदुत्वासाठी वापरता येते. म्हणजे “आम्हाला अशा प्रकारचे मुस्लीम हवे आहेत…जे हिंदुस्थानात राहून इथल्या संस्कृतीशी जुळवून घेतात”…थोडक्यात हे त्यांचं मुस्लिमपण दाखवत नाहीत आणि हिंदू संस्कृती किंवा संस्कृत यांची थोरवी मान्य करतात.
पण बिराजदार यांच्या सारखे खरे खुरे संस्कृत पंडित ह्या सगळ्याच्या पलीकडे होते. म्हणूनच ते राजकारणाच्या बाहेर राहिले…आणि म्हणूनच प्रसिद्ध होऊ शकले नाहीत. ते जर नागपूरला संघाच्या शिबिराला गेले असते तर आज भारतभर त्यांचा उदोउदो करायचा वसा संघी भामट्यांनी घेतला असता. असो.
तर अशा संस्कृतपंडित गुलाम बिराजदार यांचे काल वयाच्या ८७ व्या वर्षी निधन झाले. भारत देश एका खऱ्या खुऱ्या संस्कृत पंडिताला मुकला.
ज्यांनी त्यांच्याबद्दल कधीच ऐकले नाही त्यांनी Youtube वर त्यांच्या काही मुलाखती बघाव्यात. माहितीसाठी म्हणून इथे काही संस्कृत मुलाखती देत आहे.
Leave a Reply