मराठी मधले काही मोजकेच लेखक मला आवडतात. एका प्रकारचे असं नाही तर विविध विषयांवर लिहिणारे. उदाहरणार्थ: पु. ल. देशपांडे, नरहर कुरुंदकर, य. दि. फडके., विजय तेंडुलकर, जयंत नारळीकर, जी. ए. कुलकर्णी. काही मर्यादीत प्रमाणात जयवंत दळवी आणि गिरीश कुबेर.
ऐतिहासिक कादंबरी लिहिणारे लेखक किंवा अजून “लोकप्रिय” प्रकार लिहिणारे लेखक मला अजिबात आवडत नाहीत. रणजित देसाई, शिवाजी सावंत, बाबासाहेब पुरंदरे किंवा सुहास शिरवळकर… आणि बऱ्याचश्या प्रमाणात व. पु. काळे.
ह्या सगळ्या यादीत लेखिकांचा उल्लेख मुद्दामच केला नाही. लेखिकांपैकी ज्या मला आवडतात त्यात इरावती कर्वे, दुर्गा भागवत आणि शांता शेळके!
शांता शेळके ह्या थोर कवयित्री म्हणून आपल्या सर्वांना माहिती आहेतच. पण त्या अतिशय प्रतिभावान गद्य लेखिका पण होत्या. मला तर त्या गद्य (ललित) लेखिका म्हणूनच जास्त आवडतात…त्याचं कारण म्हणजे मला कविता या विषयातलं फारसं काही कळत नाही.
त्यांचं संस्कृत भाषेचं ज्ञान पण खूप उच्च होतं. अनेक संस्कृत श्लोक, संस्कृत साहित्य त्यांना अवगत होतं. त्यांच्या गद्य लेखनात त्याचे संदर्भ अनेकदा आले आहेत.
एखाद्या ओळखीच्या व्यक्तीशी सहज गप्पा माराव्यात त्या प्रकारचे त्यांचे ललित लेखन आहे. खूपच छान!
नुकताच त्यांचा एक जुना सुधीर मोघे यांनी घेतलेला interview मी Youtube वर पाहिला. तो मुद्दाम इथे post करावा असं वाटलं. नक्की बघा…
संगीतकार डॉ सलील कुलकर्णी यांनी “कवितेचं गाणं होताना” नावाचा एक छान उपक्रम, मालिका केली होती…त्यात एक भाग शांता शेळके यांच्यावर होता. तो देखील आवर्जून बघा.
👌👌👌
LikeLiked by 1 person