नुकताच मी डॉ. मोहन आगाशे यांची “माझा कट्टा” वरील मुलाखत पाहिली. सुमारे एक वर्षापूर्वीदेखील त्यांची “माझा कट्टा” वरच मुलाखत झाली होती. पण ह्या वेळची मुलाखत मला विशेष आवडली. म्हणून इथे पोस्ट करत आहे.
त्यांचे “कासव” आणि ह्या मुलाखतीत सांगितलेला “दिठी” हे दोन्ही चित्रपट मी अजून पाहिले नाहीयेत. यानिमित्ताने त्यांची आठवण झाली…आता लवकरच ते शोधतो.
पण काही बाबतीत ही मुलाखत फारच अप्रतिम वाटली…विशेषतः त्यांचे audio-visual माध्यम आणि शिक्षण याबद्दलचे विचार असतील किंवा “physical time and space vs virtual time and space” याबद्दलचे विचार असतील…फारच छान पद्धतीने ते मांडले आणि विचार करण्यास प्रवृत्त केले.
अगदी आवर्जून बघा…
Leave a Reply