दूरदर्शन चा सह्याद्री चॅनेल हा तसा दुर्लक्षितच आहे. आणि तेही योग्यच म्हणायला पाहिजे. कारण निर्मितीमूल्य, कल्पकता, कलात्मकता वगैरे चा जराही लवलेश नसलेले कार्यक्रम बघायचे असतील तर हमखास दूरदर्शन बघा.
अर्थात ही आत्ताची अवस्था आहे. पूर्वी म्हणजे प्रायव्हेट चॅनेल यायच्या आधी (१९९० पूर्वी) दूरदर्शन वर अनेक उत्तमोत्तम कार्यक्रम व्हायचे.
आता सगळे चांगले कलाकार, कलाकृती प्रायव्हेट चॅनेलकडे वळले. पण तरीही सध्या दूरदर्शन वर काही मोजकेच पण उत्तम कार्यक्रम असतात.
त्यातलाच एक कार्यक्रम म्हणजे मुलाखतींचा कार्यक्रम “दुसरी बाजू”. आता त्याचे नाव “दुसरी बाजू” का हे एक कोडंच आहे. असो.
कार्यक्रमाचे शीर्षक गीत अत्यंत सुमार आहे.. सेट अत्यंत टुकार आहेत. प्रकाशयोजना शाळेतल्या गॅदरिंग सारखं आहे. कार्यक्रमाचे सूत्रधार विक्रम गोखले आहेत. अत्यंत युद्धात, उर्मट, आगाऊ – थोडक्यात सांगायचं तर “संघी” माणूस. नट म्हणून उत्तम…पण माज अफाट. म्हणजे इतके सगळे निगेटिव्ह पॉईंट्स असूनही हा कार्यक्रम खरंच खूप चांगला आहे…आणि त्याचं कारण म्हणजे येणारे पाहुणे, आणि कार्यक्रमाचा फॉरमॅट.
म्हणजे मुलाखतींच्या कार्यक्रमात मला काय आवडते तर त्या व्यक्तीची अगदी खरी, वेगळी माहिती जी आजवर अनुभवलेली नसते. म्हणूनच मला कॉफी विथ करण किंवा खुपते तिथे गुप्ते वगैरे तकलादू आणि चकचकीत शो आवडत नाहीत.
अर्थात ते अँकर इतकेच गेस्ट वर देखील अवलंबून असते. म्हणूनच मला राज्य सभा टीव्ही वरील गुफ्तगू हा कार्यक्रम खूप आवडतो. जर तो आपण पाहिला नसेल तर नक्की बघावा. ज्या शांत आणि सध्या पद्धतीने मुलाखतकार इरफान हे मुलाखत घेतात त्यामुळे ह्या कार्यक्रमाचा दर्जा फारच वरच्या पातळीवर नेऊन ठेवतात. थिल्लरपणा, पांचटपणा वगैरे ला अजिबात वाव नसतो.
तशाच प्रकारचा दुसरी बाजू हा कार्यक्रम आहे. अर्थात विक्रम गोखले मुलाखतकार म्हणून इरफान च्या जवळपासही नाही. परंतु सुधीर गाडगीळ वगैरे सारख्या उगाचच चढवलेल्या माणसापेक्षा विक्रम गोखले जरा सोबर आहे.
ह्या दुसरी बाजू कार्यक्रमातलेच काही निवडक एपिसोड इथे देत आहे.
अतुल कुलकर्णी
राहुल देशपांडे
मोहन जोशी
Leave a Reply