मागच्या वर्षी लॉकडाऊन च्या काळात “Scam 1992” ही वेबसिरीज आली आणि कमालीची लोकप्रिय ठरली. हर्षद मेहतांच्या १९९० च्या दशकातील गैरव्यवहारावर आधारीत ही मालिका “स्कॅम” ह्या सुचेता दलाल लिखित पुस्तकावर आधारीत आहे. सुचेता दलाल ह्यांनीच हर्षद मेहता प्रकरण बाहेर काढलं होतं आणि मोठ्या धडाडीने त्याचा पाठपुरावा केला होता. वेबसिरीज मध्ये त्यांचं पात्र मध्यवर्ती भूमिकेत दाखवलं होतंच.
सुचेता दलाल ह्या MoneyLife ह्या नियतकालिकाच्या संपादक आहेत आणि त्या अर्थसाक्षरतेवर आणि अर्थविषयक बाबींवर लिहीत असतात आणि सेमिनार घेत असतात. हर्षद मेहता नंतर काही वर्षांनी केतन पारेख गैरव्यवहार किंवा अगदी आत्ता आत्ता “NSE Co-location” प्रकरण पण त्यांनीच सर्वांसमोर आणलं.
मी त्यांचं स्कॅम हे पुस्तक वाचलेलं आहे. आणि त्याचा आवाका “Scam 1992” वेबसिरीज पेक्षा खूपच मोठा आहे.
नुकत्याच त्या ABP माझा वाहिनीच्या “माझा कट्टा” ह्या कार्यक्रमात आल्या होत्या. त्या इतक्या चांगल्या मराठी बोलू शकतात हे मला माहिती नव्हतं. माझ्या मते त्या बंगाली किंवा गुजराती होत्या (ह्याबद्दल त्यांनी स्वतः मुलाखतीत खुलासा केला आहे).
ज्यांना अर्थकारण आवडतं किंवा ज्यांना त्याची फारशी माहिती नाही परंतु स्टॉक मार्केट ची भुरळ पडते अशा सर्वांनी ही मुलाखत आवर्जून बघावी…
बरेच दिवसांनी “माझा कट्टा” मध्ये एक चांगली आणि वेगळ्या विषयावरील मुलाखत ऐकायला मिळाली.
Leave a Reply