Youtube वरील थिंक टॅंक या मुलाखतींच्या कार्यक्रमात नुकतीच डॅा. श्रीराम गीत यांची “भारतीतल्या वैद्यकीय शिक्षणाचं नग्नसत्य” अशी थोडीशी प्रक्षोभक शीर्षक असलेली मुलाखत पाहिली. डॅा. गीत यांचे Career Counselling बद्दलचे अनेक लेख मी वृत्तपत्रात वाचले आहेत. पण ते मेडिकल डॅाक्टर देखील आहेत हे मला माहिती नव्हते.
उत्सुकतेनी मी पूर्ण मुलाखत ऐकली आणि मला ती फारच आवडली. त्यांचे मुद्दे मांडायची पद्घत आणि unbiased views आवडले. काही प्रमाणात रोखठोकही वाटले.
थिंक टॅंकचा ॲंकर अगदीच सुमार आहे. पण डॅा. गीत यांच्यासारखे दर्जेदार पाहुणे असतील तर कार्यक्रम नक्कीच श्रवणीय होतो.
Leave a Reply