डॉ. अनिल लांबा हे एक सुप्रसिद्ध अर्थतज्ज्ञ आहेत. त्यांचे Romancing The Balance Sheet हे पुस्तक मी खूप पूर्वी, म्हणजे साधारण २००२-२००४ या काळात वाचले होते. त्याच नावाचा त्यांचा एक workshop/seminar ही आहे, पण तो अतिशय महाग आहे (रुपये ५०,००० ते रुपये १ लाख). त्यामानाने रुपये ५००-७०० चे पुस्तक जास्त चांगले असे वाटेल. पण ते पूर्णपणे बरोबर नाही. एखाद्याने त्या मूलभूत गोष्टी समजावून सांगणे, चर्चा करत शिकवणे (interactive learning) आणि पुस्तकातून वाचून समजावून घेणे या खूप वेगळ्या गोष्टी आहेत. पण त्यामुळेच दोन्हीच्या किंमतीत इतका फरक आहे.
पण आजकाल Youtube किंवा तत्सम माध्यमातून अनेक चांगले, थोर, विचारवंत अगदी फुकट ऐकता येतात – फक्त कान आणि डोळे उघडे ठेवले पाहिजेत.
अशीच एक संधी डॉ. अनिल लांबा यांच्या Think Bank या चॅनेल वरील मुलाखतींमुळे मिळाली. हा मुलाखत घेणारा अगदीच मंद आहे, माझ्या डोक्यात जातो. पण असा प्लॅटफॉर्म नसल्यामुळे वासरात लंगडी गाय अशी अवस्था आहे. असो.
डॉ. अनिल लांबा हे इतके चांगले मराठी बोलतात हे मला माहिती नव्हते. मुलाखत घेणारा अगदीच ठोंब्या असल्यामुळे चर्चा विस्कळीत आहे, पण लांबा यांची विषय सोपा करून आणि समजावून सांगायची पद्धत ठळकपणे जाणवते.
एवढ्या कमी अवधीत सगळे समजावून सांगणे अवघड आहे, पण हे ३-४ छोटे व्हिडीओ नक्की बघा… Personal Finance बद्दल उदासिनता आपल्याकडे खूपच जास्त आहे, त्यामुळे असे व्हिडीओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचले पाहिजेत…
Leave a Reply