हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतप्रेमींसाठी Youtube चॅनेल

नुकतेच माझ्या पाहण्यात काही चांगले हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत विषयक Youtube चॅनेल आले. ते इथे share करत आहे. 

“सा” व “नी” Events – येथे शास्त्रीय संगीताच्या अनेक मैफिली ऐकायला मिळतील. जास्त करून नवीन पिढीतले गायक, वादक आणि अलीकडच्या काळातील मैफिलींचा साठा इथे उपलब्ध आहे. 

https://www.youtube.com/c/SavaniEvents

भीमसेन जोशी – हा पंडित भीमसेन जोशींना वाहिलेला Youtube चॅनेल आहे. 

https://www.youtube.com/channel/UCuJbI-cqIFD4b4HFXBtXmTQ/featured

अलुरकर म्युसिक हाऊस – पुण्यातल्या लोकांना (विशेषतः ९० च्या दशकात इथे राहात असलेल्यांना) अलुरकर म्युसिक नक्कीच परिचयाचे असेल. पुलं देशपांडे यांच्या कथाकथनाच्या कॅसेट्स ह्या “अलुरकर” नि प्रकाशित केलेल्या असत. त्याचबरोबर मराठी कथाकथन, मुलाखती, संगीत यांचा प्रचंड मोठा खजिना त्यांच्याकडे आहे. तो आता त्यांच्या Youtube चॅनेल वर खुला करण्यात आला आहे. हा फक्त शास्त्रीय संगीताला वाहिलेला चॅनेल नसला तरी काही दुर्मिळ संगीतविषय व्हिडीओ (मैफिली, मुलाखती) इथे पाहायला/ऐकायला मिळतील. त्याशिवाय कथाकथन, व्याख्यान इत्यादी चा ही खूप मोठा साठा इथे आहे. 

https://www.youtube.com/c/AlurkarMusicHouse

राजू अशोकन यांचा Youtube चॅनेल – ह्या चॅनेल बद्दल मला प्रसिद्ध लेखक रामचंद्र गुहा यांच्या मुलाखतीमध्ये माहिती मिळाली. काही मोजक्याच पण दुर्मिळ शास्त्रीय मैफिलीचा साठा ह्या चॅनेल वर आहे असे गुहा यांनी सांगितले होते. तसेच ते असेही म्हणाले की नेहेमीच्या परिचित (कुमार गंधर्व, भीमसेन जोशी इत्यादी) गायकांच्या पलीकडील अनेक चांगले आणि दुर्मिळ गायक ह्या चॅनेल वर ऐकायला मिळतील

https://www.youtube.com/user/vintageaudio54

Rare Indian Classical Music Programs – या Youtube चॅनेल च्या नावातच सगळं आलं

https://www.youtube.com/channel/UChVxGNzFD4-0j90p1CJNo8g

Musical Mania – हा चॅनेल देखील नावाप्रमाणे संगीताला समर्पित आहे. अनेक प्रसिद्ध आणि काही अप्रचलित गायक, वादक इथे ऐकायला मिळतील

https://www.youtube.com/channel/UCot2Nk_aPDTC4ISO212r05g

दरबार Festival – हा UK येथील एक मंच असून त्यांच्या Youtube चॅनेल वर अनेक प्रसिद्ध आणि अलीकडच्या काळातील लोकप्रिय गायक, वादक ऐकायला मिळतील 

https://www.youtube.com/c/darbarfestival

सूर-ताल – इथे अनेक जुने शास्त्रीय आणि चित्रपट संगीताचे , गझलचे इ. व्हिडीओ आहेत. 

https://www.youtube.com/user/clmusic888/videos

हिंदुस्थान एव्हरग्रीन – या चॅनेल वर नव्या जुन्या अशा अनेक चांगल्या गायकांचे व्हिडीओ उपलब्ध आहेत 

https://www.youtube.com/c/VintageGlory

स्वरालंकार – हा हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताला वाहिलेला एक चांगला Youtube चॅनेल आहे जिथे खूप जास्त प्रमाणात गायिकांचे व्हिडिओ आहेत. किशोरी आमोणकर, अश्विनी भिडे इ. अनेक उत्कृष्ट गायिका इथे ऐकायला मिळतील 

https://www.youtube.com/c/Swaralankar

कोमल निषाद Classical Music – इथे जास्त करून नवोदित कलाकारांचे व्हिडीओ आहेत 

https://www.youtube.com/c/KomalNishadClassicalMusic/videos

बाकी Music Today, सा रे गा मा वगैरे सारखे इतर अनेक Youtube चॅनेल आहेत जे म्युसिक कंपनी तर्फे चालवले जातात. ते मुद्दामच इथे देत नाहीये, कारण ते सर्वपरिचित असतातच, किंवा search केल्यावर लगेच सापडतात. 

याशिवाय अजून काही आवर्जून ऐकावेत असे चॅनेल असतील तर नक्की कळवा… 

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Blog at WordPress.com.

Up ↑

%d bloggers like this: