नुकताच मी Youtube वर १५ वर्षांचा जय शंकरपुरे यांच्या शेअर मार्केट मधील प्रवासाबद्दल एक मुलाखत बघितली. अवघ्या ५-६ दिवसात त्याला तीन-सव्वा तीन लाख views मिळाले आहेत. फायनान्स, स्टॉक मार्केट यात रुची, गती असणारे मराठी लोक तसे कमीच आहेत. त्यात इतक्या कमी वयाचे तर जवळजवळ नाहीतच. त्यामुळे जय चे कौतुक केले पाहिजे. त्याची मुलाखत तुम्ही इथे पाहू शकता.
मुलाखत पाहिल्यावर २-३ गोष्टी प्रकर्षाने जाणवल्या.
जय शंकरपुरे हा त्याच्या वयाच्या मानाने नक्कीच प्रगल्भ आहे. समंजस देखील वाटला. त्यानी त्याच्यावर प्रभाव टाकणारे लोक, ब्लॉग्स सांगितले ते अगदीच पाचकळ आहेत. पण त्याच्या वयाच्या मुलांना शेअर मार्केटचा अजिबातच गंध नसतो त्यामानाने जयला खूपच माहिती आहे.
संपूर्ण मुलाखतीत त्याला शेअरमार्केटचे कितपत याबद्दल काहीच समजले नाही. पण इतर असंख्य भारतीयांच्या मानाने अगदी कमी वयात तो फायनान्स, शेअर मार्केट सारख्या विषयांत रुची दाखवतोय हे विशेष.
पण मुलाखत बघितल्यावर असेही जाणवले की सोशल मीडियाच्या मृगजळापासून त्याला जपण्याची गरज आहे. अजून तो केवळ १० वी मध्ये आहे, अजून बरेच शैक्षणिक टप्पे पार करायचे आहेत. पण त्याच्या बोलण्यावरून असे वाटले की शैक्षणिक बाबतीतला त्याचा ओढा कमी आहे आणि केवळ स्टॉक मार्केट हेच त्याच्या ध्यानीमनी आहे…जी माझ्या मते फारशी चांगली गोष्ट नाही.
अजून एक गोष्ट म्हणजे Youtube streaming किंवा Twitter याकडे त्याचा कल जास्त आहे. नुकतेच त्याचे Twitter वर १०,००० followers झाले. त्याला IIT गोहाटीच्या एका परिसंवादात भाग घ्यायलाही बोलावले होते. १५ व्या वर्षी ह्या चांगल्या achievements आहेत. पण त्यामुळेच त्या धोकादायकही आहेत.
वॉरेन बफे याने ११ व्या वर्षीच शेअर मार्केट मध्ये invest करायला सुरुवात केली. पण तो थोर investor बनला ते त्यामुळे नाही, तर त्याच्या अतिशय चांगल्या सर्वांगीण शिक्षणामुळे आणि सतत शिकण्याच्या हातोटीमुळे. त्याउलट जय हा आत्ताच शिक्षक, स्टॉक गुरु बनायचा प्रयत्न करतोय… किंवा त्याला तसं बनवायचा घाट सोशल मीडिया नी घातलाय. आणि म्हणूनच मी त्याला मृगजळ म्हणालो.
जयने त्याचा अनुभव इतरांना (विशेषतः youngsters आणि फायनान्स मध्ये रुची न घेणारे बहुतांश मराठी लोकं) प्रेरणा द्यायला वापरण्यात काहीच गैर नाही. पण ते करत असताना स्वतः चा focus, शिकण्याची तळमळ कमी होऊ देता कामा नाही. आत्ता पासूनच वडिलांचा portfolio manage करणं हे जरा धाडसी आहे. चांगले झाल्यास ते स्वतःच्या हुशारीमुळे असे समजून एक प्रकारचा अहंभाव निर्माण होऊ शकतो. आणि वाईट झाल्यास वयाचा दाखला देत त्याच्या चुकांवर पांघरूण घातले जाऊ शकते.
विविध क्षेत्रातले अनेक child prodigy मी आत्ता पर्यंत बघितले आहेत. त्यातले बरेचसे पुढे ढेपाळतात त्याचे कारण talent हे नसून temperament हे असते. कमी वयातले यश, आणि त्यापेक्षा जास्त प्रसिद्धी, वलय हे पचवायला, आणि पाय जमिनीवर ठेवायला मनाचा निग्रह लागतो. आजकालच्या social media च्या जमान्यात तर ते फारच अवघड आहे. आणि त्यामुळेच त्याच्या पालकांची भूमिका इथे फार महत्वाची आहे. मीडिया त्याला डोक्यावर घ्यायला तत्पर असेल. त्यांना रोज वेगळा गणपती डोक्यावर घेऊन नाचायची सवय आणि गरज असते…त्यामुळे ते (सध्या) तसं करणारच. पण पालकांनी आपल्या मुलासाठी काय चांगले आहे याचे भान ठेवले पाहिजे.
जयने त्याचे आदर्श कोण असे विचारल्यावर जी नावे सांगितली ती माझ्यामते धोक्याचा इशारा देणारी आहेत. ती माणसे वाईट आहेत असं नाही, पण ती आदर्श असावीत का हा प्रश्न आहे. Good is the enemy of Great. And you must always be in the search of greatness/excellence. तुमचे आदर्श जर तितक्या दर्जाचे नसतील आणि त्यात तुम्हाला मीडिया डोक्यावर घेत असेल तर it’s a perfect recipe for disaster.
जय कुठल्या दिशेने वाटचाल करतो हे येत्या ८-१० वर्षांत समजेलच. पण ह्या लेखातला “जय” हा प्रतीकात्मक आहे. प्रत्येक लहान मुलगा ज्याच्यात potential आहे त्याच्यासाठी हे लागू आहे.
“When you wish to lead an orchestra you must be willing to turn your back on the crowd.”
आणि त्यासाठी सोशल मीडियाच्या मृगजळापासून स्वतःला दूर करता यायला पाहिजे.
Leave a Reply