मला पर्यटन याविषयाबद्दल विशेष आवड, आस्था नाही. प्रवास हा काही तरी कामकरताच करावा असं माझं मत आहे. गंमत म्हणजे माझ्या ह्या मताच्या एकदम विरुद्ध मताची लोकं माझ्या आयुष्यात होती आणि आहेत.
Six Sigma मध्ये 7 types of waste सांगितली आहेत (which are known by acronym TIM WOOD). त्यातलं एक म्हणजे M-motion. म्हणजे गरज नसताना वस्तू हलवू नका. Parts ची अनावश्यक movement, motion शक्यतो टाळा. तेच principle मी स्वतःला ही लागू करतो 🙂
त्यामुळे काहीतरी purpose शिवाय प्रवास करणे मी टाळतो.
पण काही लोकं पर्यटनप्रेमी असतात. त्यांना नुसतं भटकायला, वेगा वेगळ्या ठिकाणांना भेट द्यायला आवडतं. त्यांच्यासाठी एक चांगला मार्ग म्हणजे vlog (video blog). मला बिनकामाचे पर्यटन आवडत नसले तरी काही vlog बघायला आवडतात.
असाच एक vlog नुकताच माझ्या पाहण्यात आला. कवयित्री, अभिनेत्री, निवेदिका स्पृहा जोशी हिच्या vlog मधला पहिलाच भाग हा पुण्याजवळच्या “ढेपे वाडा” बद्दल आहे.
जुन्या काळातला “वाडा” ढेपे कुटुंबीयांनी पुन्हा निर्माण केला आहे, आणि आता ते लग्न,मुंज समारंभ वगैरे साठी भाड्याने देतात असे ऐकले.
मी वाडा हा वास्तुप्रकार खूप जवळून पाहिला आहे. वयाच्या १६ वर्षापर्यंत आम्ही देखील वाड्यातच राहायचो. मला स्वतःला वाडा ही वास्तुशैली जास्त आवडते. त्यामुळे हा vlog मी आवर्जून पाहिला आणि मला आवडला देखील.
अशा वास्तुशैलीवर आधारीत अनेक वाडे जर develop केले तर destination events साठी एक चांगला पर्याय होऊ शकतो. फक्त त्या ठिकाणी सर्व सुविधा असाव्यात आणि connectivity चांगली असावी (जी ढेपे वाड्याच्या बाबतीत नाहीये असं एका मित्राकडून ऐकलं).
मी इंग्लंड मध्ये अनेक जुन्या properties चांगल्या प्रकारे maintain/renovate करून commercialise केलेल्या पाहिल्या आहेत. मला ते model खूप आवडले होते. तशाच प्रकारे वाडा किंवा इतर जुन्या वास्तुशैलींना पुनरुज्जीवित करून त्या commercialise करता येतील.
कामत हॉटेल्स ग्रुप ने फोर्ट जाधवगड आणि महोदधी पॅलेस (पुरी, ओरिसा) येथे असाच प्रयोग केला आहे. राजस्थान मधील राजवाडे जे आता हॉटेल्स बनली आहेत तेही आहेतच. पण ते फार lavish झाले. जाधवगड किंवा ढेपे वाडा हे बऱ्यापैकी सर्वसाधारण लोकांना परवडेल अशा प्रकारचे options आहेत.
Leave a Reply