
आज आषाढी एकादशी…महाराष्ट्र सोडून इतर भारतीयांसाठी एकशयनी एकादशी.

आमच्या घरी बऱ्यापैकी धार्मिक वातावरण असल्यामुळे लहानपणा पासून एकादशी, महाशिवरात्री आणि रामनवमी ह्या दिवशी सगळे जण उपास करतात. मला उपासाचे पदार्थ खूप आवडत असल्यामुळे “एकादशी दुप्पट खाशी” या न्यायाने मी देखील उपास करतो.
पण त्यापलीकडे जाऊन मला रामनवमी बद्दल खूप जास्त जिव्हाळा आहे, कारण आमच्या घरीच राममंदीर आहे. त्याखालोखाल मला आषाढीएकादशी आवडते. महाशिवरात्र मात्र फक्त उपासाचे पदार्थ खाण्यापुरतीच…
आषाढी एकादशी मला विविध कारणांसाठी आवडते…किंवा हळू हळू आवडायला लागली. एक तर “विठ्ठल” हा form मला चित्र या माध्यमासाठी खूप आवडतो…गणपती सारखाच तो विविध प्रकारे express, interpret करता येतो. दुसरी आवडणारी गोष्ट म्हणजे वारी, आणि संतांचे अभंग – विशेषतः तुकाराम आणि ज्ञानेश्वर… त्यातही तुकाराम जास्त, कारण त्यांची भाषाशैली (ज्ञानेश्वरांच्या भाषेपेक्षा) जास्त सोपी, सहज आहे. शक्य होईल तेव्हा मी त्यांच्या मला आवडलेल्या अभंगांचे संकलन करत असतो. त्यावर एक separate ब्लॉग कधीतरी लिहीन.

वारी ची प्रथा (काही उपद्रवी भाग वगळता) अलीकडच्या काळात जास्त आवडायला लागली…ती एक कल्पना म्हणून. पण आताच्या वारीत दिखावा जास्त, ब्रॅण्डिंग जास्त, social media वर दाखवण्यासाठी एक photo event जास्त असं स्वरूप झालंय असं वाटतं. मी MBA करत असताना HR च्या प्रोफेसरांनी महाराष्ट्रातली वारी यावर खूप चांगल्या प्रकारे, organisation culture आणि structure यावर खूपच चांगले lecture घेतले होते. ते स्वतः मल्याळी होते, पण तरीही (किंवा त्यामुळेच) ते एका अगदी वेगळ्या दृष्टिकोनातून “वारी” या विषयावर बोलले होते. त्यामुळे लहानपणापासून पाहत, वाचत, ऐकत असलेल्या वारीबद्दल काही नवीन पैलू समजले आणि भावले.
आषाढी एकादशी आवडण्याचे तिसरे कारण म्हणजे संगीत…भजनी ठेका हा महाराष्ट्रातल्या प्रत्येकाला माहिती असेलच. पण विठ्ठलाविषयीची किंवा ज्ञानेश्वर, तुकाराम यांचे अभंग अनेक नामवंत लोकांनी अजरामर करून ठेवले आहेत. आणि ते इतके सुंदर, सात्विक, अर्थपूर्ण आणि soulful आहेत की माझ्या परिचयाच्या अनेक अमराठी लोकांनाही अतिशय आवडतात. जरी ते वेळोवेळी कानावर पडत असले तरी एकादशीच्या आसपास जास्त mood, वातावरण असल्यामुळे ते आवर्जून आठवतात, ऐकले जातात.
अशीच काही मोजकी, मला आवडणारी आणि विविध गायकांनी गायलेली गाणी इथे share करतोय…
Leave a Reply