गणेश उत्सव हा माझ्या आयुष्यातला एक त्रासदायक विषय आहे.
१९९०-९१ पासून गणेश उत्सव हा काही ना काही कारणांमुळे वादग्रस्त, वेदनादायक ठरला आहे. दर वर्षी नाही, पण ४-५ वेळा. आणि इतर वेळा काही विशेष आनंददायक नव्हता. म्हणजे एकूणांत हा उत्सव कटू आठवणींचाच ठरला आहे. असो.
पण त्यामुळे गणेश उत्सवाबद्दल माझ्या मनात नकारात्मक भावना नाहीत. फक्त इतर कुठल्याही उत्सवासारखेच मला “सार्वजनिक” गणेशोत्सव आवडत नाहीत.
पण मला “गणपती” आवडतो…लहानपणी जेव्हा माझी चित्रकला वयाच्या मानानी बरी होती आणि काही बक्षिसं मिळायची तेव्हा त्यातली बरीचशी “गणेशोत्सव स्पर्धां” साठी आणि गणपतीच्या चित्रांसाठी होती! मला गणपतीचा “form” खूप आवडतो!
ह्यावर्षी माझी मुलगी जरा मोठी झाल्यामुळे आणि तिच्या शाळेत काही ना काही उपक्रम असतात त्या निमित्ताने आता परत काही तरी चित्रं, clay work वगैरे केलं जातं.
ह्या वेळेस मी आणि मुलीनी मिळून अशीच एक दोन चित्रं काढली/रंगवली आणि तिनी आईबरोबर एक मातीचा गणपती बनवला!



गेले १-२ वर्षं गणेश उत्सव शांततेत गेले. Hopefully, आता कटू आठवणींचे गणेश उत्सव परत आयुष्यात येणार नाहीत! 🙏
आपणां सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दीक शुभेच्छा! गणपती बाप्पा मोरया!

Leave a Reply