राहुल देशपांडे च्या Youtube चॅनेल बद्दल मी यापूर्वीही लिहिले आहे. कालच त्याचे प्रियांका बर्वे बरोबरचे “ये दिल तुम बिन कही लगता नही, हम क्या करे” हे गाणे Youtube वर प्रसिद्ध झाले आणि योगायोगाने मी काही मिनिटांमध्येच ते ऐकले.
याआधीही अनेकदा हे गाणे ऐकले असूनही काल ऐकताना त्याचे शब्द प्रथमच लक्ष पूर्वक ऐकले. किंबहुना त्यांनी ते ज्या प्रकारे गायले त्यामुळे शब्दाचा आशय मला पहिल्यांदाच “ऐकू” आला आणि अतिशय भावला.
बरेचदा चांगली/गोड चाल आणि सुमधुर आवाज यामुळे शब्दाकडे दुर्लक्ष होते…निदान माझे तरी होते. तशीही मला कविता, काव्य, गज़ल वगैरे जास्त समजत नाही. पण कधी कधी अचानक शब्दाचा अर्थ लागतो…आणि माझ्या एखाद्या अनुभवाशी मिळताजुळता असेल तर अचानक काहीतरी क्लिक झाल्याचं फीलिंग येतं. नेमकं तेच “लुटे दिल में दिया जलता नही, हम क्या करे” या ओळीमुळे झालं.
त्यानंतर मग एकेक ओळ ऐकत गेलो आणि किती सुंदर लिहिलंय हे गाणं त्याची प्रचिती आली.
“किसिकें दिल मे बसके दिलको तडपाना नही अच्छा”…”हमें तुम बिन कोई जचता ही नही हम क्या करे?”
अगदी सहज सोप्या भाषेत पण मनापासून लिहिलंय…आणि तितकीच हळुवार चाल आणि गायकी!
नक्की ऐका!
Leave a Reply