तुम्ही जर ब्राह्मण असाल किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ किंवा भाजप यांच्याशी संबंधित असाल तर पुढे न वाचता इथेच थांबा!
…
…
…
…
…
…
जर तुम्ही पुढे वाचण्याचे धाडस केले असेल तर काही धक्के खायची तयारी ठेवा.
मी स्वतः ब्राह्मण (अगदी कोब्रा) असलो तरी मी RSS द्वेष्टा आहे. असे आम्ही मोजकेच लोक असू…पण आम्ही अस्तित्वात आहोत!
आपल्यासारख्या (किंवा आमच्यासारख्या) लोकांना ब्राह्मणेतर थोर लोकांबद्दल अगदीच कमी माहिती असते. म्हणजे शाहू-फुले-आंबेडकर वगैरे यांबद्दल जुजबी शाळेत शिकलेले धडे सोडले तर कोणी जास्त वाचायचा प्रयत्न करत नाहीत. वाचलेच तर संघाच्या किंवा तत्सम प्रचारकी लिखाणाच्या माध्यमातूनच. पण तुम्हाला जर खऱ्या अर्थानी त्यांच्याबद्दल माहिती हवी असेल तर ब्राह्मणेतर विचारवंतांचे लेखन वाचावे, त्यांच्या मुलाखती ऐकाव्यात.
अशीच एक स्फोटक मुलाखत मी नुकतीच ऐकली. डॉ. हरी नरके यांची ही मुलाखत पत्रकार राजू परुळेकर यानी घेतली आहे. राजू परुळेकर आणि निखिल वागळे हे ब्राह्मण असून वैचारिकदृष्ट्या ब्राह्मणविरोधी…किंवा ब्राह्मण्यविरोधी असं म्हणूया. याच “बहुजनवाद वि. ब्राह्मणवाद” या विषयावर नरके यांनी सविस्तर चर्चा केली आहे. जर अवघड विचार पचत असतील (पटत नाही), तर बघा…
Leave a Reply