काल (१४ जानेवारी) भोगी होती. आज मकरसंक्रांत…म्हणून आज परत एकदा शुभेच्छा!
तिलवत् स्निग्धं मनोऽस्तु वाण्यां गुडवन्माधुर्यम् ।
तिलगुडलड्डुकवत् सम्बन्धेऽस्तु सुवृत्तत्त्वम् ॥
अर्थ – आजपासून तिळासारखी सगळ्यांच्या मनामध्ये स्निग्ध स्नेहभाव निर्माण होवो. सगळ्यांची वाणी गुळासारखी मधुर आणि गोड होवो आणि जसे तीळ आणि गूळ एकत्र येऊन घट्ट लाडू बनतात तशीच आपली नाती घट्ट होवोत.
भास्करस्य यथा तेजो मकरस्थस्य वर्धते ।
तथैव भवतां तेजो वर्धतामिति कामये ॥
अर्थ – ज्याप्रमाणे सूर्याचे तेज मकर राशीत प्रवेश केल्यापासून वाढत वाढत जाते, त्याचप्रमाणे तुमचे तेज, स्वास्थ्य, आरोग्य आणि समृद्धी वाढत जावो.
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!

Leave a Reply