काल आमच्या movie club च्या मित्रांबरोबर चित्रपट बघायचं ठरलं. नेहेमी हिंदीच बघतो म्हणून यावेळेस मराठी बघूया असा प्रस्ताव मी मांडला, आणि त्याला बाकी दोघं चक्क “हो” म्हणाले.
रितेश देशमुखचा “वेड” सध्या जोरात चालू आहे. पण त्याची भाषा अगदीच आनी-पानी-लोनी आहे असं ऐकलं. त्यामुळे तो पर्याय एकमतानी नाकारला.
मग नुकताच प्रदर्शित झालेला परेश मोकाशी दिग्दर्शित “वाळवी” हा चित्रपट पाहू असं ठरलं. आम्ही असंख्य चित्रपट review न वाचता बघतो, आणि बहुसंख्य फसतात देखील. पण आमच्या “movie club” चा तो नियम आहे…त्यामुळे लगेच बुकींग केले. चित्रपटाला अगदी मोजकेच शो मिळाले आहेत.
परेश मोकाशीचा “हरिश्चंद्राची फॅक्टरी” मला आवडला होता. इतर दोन अजून बघितले नाहीत.
आता “वाळवी” विषयी…

एका वाक्यात सागायचं तर “अजिबात चुकवू नका…अत्यंत सुंदर चित्रपट आहे!”
चित्रपट फक्त १०५ मिनिटांचा (१ तास ४५ मिनिटांचा) आहे. एकंही गाणं नाही. “Dark comedy” genre चे चित्रपट मराठी मध्येच काय हिंदी किंवा इतर भाषांमध्येही दुर्मिळ असतात. मराठीत “गाभ्रीचा पाऊस” हा काही अंशी “dark comedy” होता. पण बाकी बराचसा अत्यंत गंभीर होता. मला तो चित्रपटही खूप आवडला होता. हिंदीमध्ये “अंधाधून” हा आयुष्मान खुराणा, राधिका आपटेचा चित्रपट किंवा जुना क्लासिक “जाने भी दो यारो” हे “dark comedy” पटकन आठवतील.
वाळवी हा चित्रपट पटकथा लेखन, संवाद, अभिनय, आणि संकलन याबाबतीत फारच सुंदर जमून आलाय!
कथेमध्ये दोन वळणे (twist ) आहेत. खरं तर दोन climax च! एक mini-climax मध्यांतरला (interval). जेव्हा तोपर्यंत चाललेल्या कथेला एकदम कलाटणी मिळते आणि अनेक नवीन शक्यता निर्माण होतात. आणि दुसरा climax चित्रपट संपताना, अगदी अचानक!
स्वप्नील जोशी, शिवानी सुर्वे, अनिता दाते यांचे काम पूर्वार्धात खूप छान रंगले आहे. मला शिवानीची संवादफेक जरा खटकली. कदाचित सई ताम्हणकर त्या भूमिकेत फीट बसली असती (सईताई माझ्या लाडक्या आहेत म्हणून…नाहीतर सुर्वेबाई पण उत्तम).
मध्यंतरानंतर सुबोध भावेची दमदार एंट्री आहे!
तोपर्यंत सस्पेन्स आणि काहीसा विनोदी असलेला चित्रपट त्यानंतर अधिक रंजक, वेगवान आणि पूर्णपणे विनोदी होतो. उत्तरार्धात सस्पेन्स अगदी शेवटच्या क्षणी परततो आणी ते धक्कातंत्रही मस्त जमून आले आहेत.
चित्रपटात अनेक व्यक्ती मरतात – जवळजवळ ८-१०…तरीही त्या संपूर्ण परिस्थितीची किळस न येता किंवा ते भीषण न वाटता त्यातही हसू येते यावरूनच black comedy हा प्रकार यशस्वी झाल्याचे लक्षात येते.
हा चित्रपट भाषेशी बांधील नाही. Subtitles वरून पण तितकाच enjoy करता येईल.
हिंदी किंवा इतर भाषंमध्ये remake झाल्यासही आश्चर्य वाटू नये!
थोडक्यात, हा चित्रपट नक्की बघा!
ता.कः मला ज्या व्यक्तीबरोबर हा चित्रपट बघायला आवडला असता तिची अनेकदा आठवण झाली…तोच त्यातला त्रासदायक भाग होता…😷
सुरेख परीक्षण.
LikeLiked by 1 person