आज डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. म्हणजे “जय भीम” लोकांचा धुडगूस घालायचा दिवस.
आमची शाळा, शाळेतले शिक्षक आणि एकूणच शैक्षणिक अभ्यासक्रम हे अतिशय सुमार दर्जाचे असल्यामुळे कोणत्याही थोर, कर्तबगार व्यक्तींबद्दल यथोचित माहिती आम्हाला मिळाली नाही. जे काही होतं ते प्रचारकी आणि फक्त उदोउदो करणारे.
त्यामुळे अशा अनेक व्यक्तींची ओळख नंतर आणि शालाबाह्य माध्यमातून झाली. मला आठवतंय की माझे १० वीचे English च्या क्लासचे शिक्षक माझ्याकडून “My experiments with truth” ह्या गांधीजींच्या आत्मचरित्राचे रोज १ पान भाषांतर करायला द्यायचे. त्यातून त्यांची ओळख झाली आणि नंतरच्या वाचनातून अनेक चांगले-वाईट पैलू समजले. तीच गोष्ट सावरकरांबद्दल…किंवा टिळकांबद्दल.
पण आंबेडकर यांच्याबद्दल मात्र मी अगदी आत्ता आत्ता पर्यंत म्हणजे वयाच्या ३५-३८ वर्षापर्यंत अनभिज्ञ होतो. त्यानंतर गेल्या ५-८ वर्षांत त्यांच्याबद्दल खूप जास्त माहिती मिळवली, त्यांच्याबद्दल आणि त्यांनी स्वतः लिहीलेले असे बरेच वाचले. अजून खूप जास्त वाचायचे बाकी आहे. पण एक गोष्ट जाणवली ती म्हणजे त्यांची अफाट आणि अचाट बुद्धीमत्ता! विशेषतः मी economics चा अभ्यास केला तेव्हा आणि कुतूहलापोटी law चे जुजबी वाचन केले तेव्हा जाणवले की ह्या विषयांत त्यांचा अभ्यास किती उच्च होता! २-२ Ph D, कायद्याची पदवी, इतर अनेक महत्वाच्या विषयांचा व्यासंग…नंतर बुद्ध आणि हिंदू धर्माविषयीचे लेखन इत्याादी.
पण त्याचबरोबर त्यांचे अनूयायी इतके दुय्यम दर्जाचे का होत गेले हे कोडेही हळूहळू समजू लागले.
“Educate, agitate and organize” म्हणजे “शिका, लढा, एकत्र या” ही त्यांनी त्यांच्या अनुयायांना दिलेली त्रिसूत्री होती. पण त्यातले “शिका” सोडून नुसतेच लढा किंवा एकत्र या (कळप या अर्थी) एवढेच त्या अनूयायांनी केले. आणि त्यामुळेच आज त्यांची अवस्था दयनीय झाली आहे.
“In politics, Bhakti and hero-worship is a sure road to dictatorship” हा त्यांचा संदेश किती समर्पक होता हे आज मोदीभक्त आणि संघोटे यांच्याकडे बघितल्यावर जाणवते. किंवा आंबेडकरांच्या भक्तांनी त्यांचे केलेले दैवतीकरण हे त्याच प्रकारचे.
त्यांच्या घेण्यासारख्या गोष्टी बाजूला ठेऊन पाचकळ प्रकारांवर भर देण्यातच त्यांचे अनुयायी धन्यता मानतात. त्यातले असंख्य धिंगाणा, स्पीकरच्या भिंती, फ्लेक्स, bike rally एवढेच करतात. तर “जरा बरे” म्हणता येतील असे असा 👇 आचरटपणा करतात.

सलग १८ तास अभ्यास ही आंबेडकरांना मानवंदना असू शकते असे ज्या पामरांना वाटते त्यांच्यामुळेच आज त्यांची ही गत झाली आहे.
पण त्यांची बुद्धीची झेप तेवढीच. त्यामुळे आंबेडकरांसारख्या थोर व्यक्तीचीदेखील एक राजकीय उपयुक्तता एवढीच किंमत उरते.
त्यांचे समग्र लेखन येथे उपलब्ध आहे. तसेच त्यांचे काही video बघितले/ऐकले तरी ते किती स्वतंत्र आणि तल्लख होते हे समजेल.
छान!!
https://mazespandan.com
LikeLike