Search

ekoshapu

Notes to Myself

Category

कविता

अशोक नायगावकर – कविता आणि बरंच काही

अशोक नायगावकर – कविता आणि बरंच काही

Advertisements

कोंकणस्थांची श्लोकबध्द आडनांवे

कोंकणस्थांची श्लोकबध्द आडनांवे

जाणा जे आठवले, चिपळुणकरही चित्तले आणी मोने
चांपे वांचोळ ऐसे करसह वदति युक्त जे याभिधाने
फट्केंही भाडभोंके परिमीत असती वाडदेकर कांही
या सर्वा गोत्र अत्री दशसहा परिसा जोगळेकर तेही ||

कुंटे आणी पेंडसे भागवत्त | वन्हि संख्या जामदग्नि सुगोत्र बाभ्रव्याचे बेहेरे बाळ जाणा | दोंही गोत्री जाणिजे मानबाणां ||2||

वैशंपायन भाडभोंक हि भिडे | सहस्त्रबुध्ये तथा
जाणा पांच संयुक्त पिंपळखरे नित्य॔दुनि सर्वथा
आचारी पटवर्धनानि फणसे हे वन्हि संख्या पुरे
जाणा निश्चय चित्तपावन असे कौंडिण्यगोत्री बरें ||3||

उकिडवे तथा गांगलेकार जे का| तसे मालशें आणि जोशी हे ऐका गोरे सोवनी युक्त कालेस जाणा रुषिभेद हे वत्सगोत्रासी जाणा || 4 ||

नेने आणिक मंडलिक परिसां पाराज्यपे (ते)तथा
तैसे मेहदळे तथा किणमिडे कां देवही सर्वथा
तैसे ओळकरांसहित अवघें हे सप्तसंख्या पुरे
जाणा निश्चयरूप सर्व समते हे विष्णुवृध्दी बरें ||5||

काळे विद्वांस करंदीकर लिमये आणी जे कां मराठे
खांबेटे माईंदेवा सहित परिशिजे आणि सान्ये रटाटे
बांठे जाईल जे का तदुपरि परिसां भागवत्ताभिधानें
संख्या जाणा दलाला सह रविसमये यूक्त गोत्रा कपिने || 6 ||

गोळे वैद्य मनोहरांदिक तथा घांघाळ घैसासही
दर्वे सोहनी रानड्यें तदुपरी टेणें कण्याचेसहि
जोशी घांगरडे व आंचवलहि जे आंखवे हो तथा
भारद्वाज कुळिस ळांहळकरां संख्या तिथी सर्वथा ||7||

जोशी थोराथ घाणेकरसह करवे खंगले केतकार
गोरे लोंढे वझेहि सहित भुसकुटे आणी माटे सुतार
ऐसे हे वैद्य बेडेकर भट परिसां दाबके भागवत
ऐसे हे युक्त गाडगिळ म्हसकरही यांशी गार्ग्यगोत्र ||8||

गद्रे बर्वे बापये भावयेच| आगाशेही गोडबोले तथा च
तैसे जे का पाळद्ये वाड साचे |जाणा ऐसे भेद हे कौशीकाचे ||9||

जाणां देवधर तथा सटकारां कानेटकरांसहि
तैसे देवल वर्तकांसह खरे जे आपुटे बामहि
शेंडे कोलटकार फाटक खुळे कां लावण्येकार जे
ऐसे कौशिक गोत्रिं जे विसवधु श्लोकद्वयी जाणिजें ||10||

दातार कर्मकरांसह भट छिंत्र्यें | जोशीसह वेलणकरांसह भानु छत्रे
खाडिलकारसह कावतरणेहि साचे |पालेकरांदिक तथा अजि काश्यपाचे || 11 ||

गानु ठोसर गोखलेसह तथा जे ओगुले जोगहि
तैसे बिवलकार आणि बडयें लेले लवाटेंसहि
कान्हेरेसह भेंटकार सुकुले दामोदरां फाळुके
जाणा पंच्विस काश्यपी परिसिजे श्लोकद्वयी सर्वथा ||12||

साठे बोडस कारलेकर तथा दातार दांडेकर
पेठ्ये घारपुरें तसे परवत्यें बागूल अभ्य॔कर
दात्ये मोडक सांवरेकर तथा जे भातखंड्ये तसे
जाणा दोणकरां व कोपरकरां वसिष्ठ गोत्री असे ||13||

भामे वैद्य वीनोद बापट तथा जे गोवड्ये ओकही
धारु आणि दिवेकरांसह खरे विंझे नातूसहि
तैसे पोंकशिये महाबळ तथा जे गोगटे साठ्ये
वसिष्ठाप्रती भेद तीस परिसा श्लोकद्वयी निश्चये ||14||

थथ्ये तांबनकार आणि टकल्यें का आंबडेकार जे
तैसे धामणकार ही तुळपूळे तिव्रेकरां जाणिजे
माटें पाऊक डोंगरे तदुपरि कां केळकारां तसे
जाणा निश्चय भेद हे सकळहों शांडिलयगोत्री असे ||15||

जोशी सोमण दामले परचुरे आणीक विद्वांस हि
काळे जाईल भोगले सह तथा साहस्त्रबुध्येसहि
काणे टिळक कानड्ये निजसुरे जे कां गोडिसे
ऐसे पाटणकर युक्त परिसां शांडिल्य गोत्री असे || 16||

जाणा जे व्यास छिंत्र्ये घणवटकरही लावणेकार पद्ये
मर्ये वा बेहेरे जे रिसबुड शिधये आणी जे का ऊपाध्ये
तैसे होकां राजवाडकर शिधोरें सहित गणपुले कोझेरकार साचे
तिश्लोकी सर्व संख्या तिसनव द्वितीयो भेद हे शांडिलाचे || 17 ||

गोत्रे चर्तुदश कुळें मुळि साठ होती | त्याचेचि संततिमुळें बहु भेद होती /
नेत्रां अधीक सकळही शत दोन साचे | यांते अधीक असती तरी भेद याचे || 18 ||

– कवी अज्ञात

#WhatsApp #Forward

शब्द-तुकडे: खातंय कोण – तोंड की मन?

शब्द-तुकडे: खातंय कोण – तोंड की मन?

भेळ खाऊ का खाऊ पाणी-पुरी
सुरुवात कुठे करु…अं, आधी पाव-भाजीच बरी

एकच पोट, एकच तोंड
भूक कमी खा-खा प्रचंड

भेळच बरी पाव-भाजी ला वेळच फार
इतका वेळ खाल्ल्याशिवाय नाही थांबवणार

आ..आ..आली भेळ…पहिला घास – वा वा…!!!
दुसऱ्या घासापूर्वीच… मला पिझ्झा वाटतोय खावा

असं का झालं, असं का होतं
जे खातोय ते सोडून, दुसऱ्याचीच चटक लागते…हल्ली

खातंय कोण – तोंड की मन?
बहुतेक मनच
कारण

खाण्यात नाही सगळ्यातच असं होतं…हल्ली

—————————————————————————————————

ह्याला आम्ही कायकू अस नाव दिल आहे…हायकू च्या धर्तीवर…

हे गद्य किंवा पद्य दोन्ही प्रकारात मोडत नाही (वाकतही नाहीच…कारण आमचा बाणा – ’मोडेन पण वाकणार नाही’)
गद्य किंवा पद्य दोन्ही नसलेले लेखन बरेचदा ’मद्य’ ह्य प्रकरात मोडते…कारण मद्याचा त्या लेखक (किंवा कवी किंवा तत्सम) प्राण्यावर प्रभाव असतो. इथे ती शक्यताही नाही, कारण आम्ही दारु पीतच काय उडवत पण नाही.

आमचे हे शब्द-तुकडे ’कालातीत’ आहे असे आम्हला वाटते, त्यामुळे त्याला ’सद्य’ म्हणणे ही बरोबर नाही.
खाण्याशी संबंधीत असल्याने आणि जरी मन या शब्दाचा पुसटसा उल्लेख आला असला तरी हे शब्द-तुकडे ’ह्रुद्य’ ही नाहीत.

अशा प्रकारे हे गद्य, पद्य, मद्य, सद्य किन्वा ह्रुद्य काहीच नाही…आणि अजून ’द्य’-कारान्त शब्द आत्ता सुचत नाहीत. असो.

तर थोडक्यात यावर जास्त चर्चा न करता आम्ही हे इथेच संपवून पुन्हा नवीन ’कायकू’ चे शब्द-तुकडे जुळवायच्या मागे लागतो!

हरकत नाही…संदीप खरे ची कविता

संदीप खरे ची अजून एक ’हळूवार’ कविता…
मला असल्या कविता अजिबात आवडत नाहीत…पण काही जणांना मात्र असल्या ’भावनेनी बरबटलेल्या’ (बरं.. तुमच्या भाषेत ’ओथंबलेल्या’) कविता आवडतात…आणि काहिंना ह्या असल्या कविता हव्या होत्या.
मी म्हणालो मी ईमेल नी पाठवतो…पण माझ्या ब्लॊग वर नाही टाकणार…पण हळू हळू असल्या कवितांची मागणी वाढू लागली, त्यामुळे शेवटी मी ही कविता इथेच पोस्ट करत आहे…पण असे असले तरी मी आधीच सांगितल्याप्रमाणे – ही माझ्या टाईप ची कविता नाही…असो!
————————————————————————————————————–
हरकत नाही…
अक्षर छान आलंय यात !”
 माझी कविता वाचताना
मान तिरकी करत ती एवढंच म्हणते…
डोळ्यांत तुडुंब भरलेली झोप,
कपाळावर पेंगत बसलेले काही भुरटे केस,
निसटून गेलेली एक चुकार जांभई,
आणि नंतर…
वाचता वाचता मध्येच
आपसूक मिटलेले तुझे डोळे,
 कलंडलेली मान,
आणि हातातून अशीच कधीतरी निसटलेली,
जमिनीवर पडलेली माझी कवितांची वही…
हरकत नाही, हरकत नाही;
कविता म्हणजे तरी आणखी काय असतं !!
–संदीप खरे
——————————————————-
~ कौस्तुभ

शेतकरी


शेतकरी

माझा मित्र तेजस गोखले ह्यानी केलेली ही कविता…तो स्वतः ही प्रसिद्ध करायला फारसा उत्सुक नव्हता…पण मीच आग्रह करुन इथे प्रसिद्ध करत आहे…

तुमच्या प्रतिक्रिया त्याला जरूर कळवा:

~ कौस्तुभ

काय रे देवा… संदीप खरेची कविता.

संदीप खरे ची अजून एक कविता… पावसाळ्याचे निमित्त साधून…खरं तर ’पावसाळा’ म्हणावा असा पाऊस अजून पुण्यात झालाच नाहीये… उगाच आकाशातून कोणीतरी थुंकल्यासारखे चार थेंब पडलेत आत्तापर्यंत…आणि अनेक बेडकांची लग्नं लावूनही काहिही फरक पडला नाही…आता म्हणे बेडूक ही संपले…

म्हणजे पुढच्या वर्षी हीच परिस्थिती आली तर बहुतेक आधी लग्न झालेल्य बेडकांना घटस्फोट घ्यायला लावून त्यांचे परत लग्न लावावे लागेल…असो.

तर आता ही कविता –

——————————————————————————-

काय रे देवा…

आता पुन्हा पाऊस येणार….

आता पुन्हा पाऊस येणार , मग आकाश काळं नीळं होणार,
मग मातीला गंध फुटणार , मग मधेच वीज पडणार,
मग तूझी आठवण येणार, काय रे देवा…..

मग ती आठवण कुणाला दाखवता नाही येणार,
मग मी ती लपवणार,मग लपवुनही ती कुणाला तरी कळावस वाटणार,
मग ते कोणितरी ओळखणार,
मग मित्र असतील तर रडणार , नातेवाईक असतील तर चिडणार,
मग नसतच कळल तर बर, असं वाटणार…
आणि ह्या सगळ्याशी तुला काहीच देण घेण नसणार..
काय रे देवा…..

मग त्याच वेळी दूर रेडियो चालू असणार, मग त्यात एखाद जुन गाणं लागलेल असणार्,
मग त्याला एस. डी. बर्मननी चाल दिलेली असणार्,मग साहिल ते नी लिहिलेल असणार्,
मग ते लतानी गायलेल असणार्…,
मग तूही नेमक आत्ता हेच गाणं ऐकत असशील का? असा प्रश्न पडणार्,
मग उगाच छातीत काहीतरी हुरहुरणार, मग ना घेणं ना देणं पण फुकाचे कंदील लागणार्….
काय रे देवा…..

मग खिडक्यांचे गज थंडगार होत जाणार्.., मग त्याला आकाशाची आसवं लगडणार्..,
मग खिडकीत घट्ट बांधून ठेवलेल्या आपल्या पालथ्या मूठीवर ते टपटपणार्….,
मग पाच फूट पाच इंच देह अपूरा अपूरा वाटणार , मग ऊरी फुटुन जावसं वाटणार, छाताडातून ह्रुदय काढून त्या शूभ्र धारेखाली धरावासा वाटणार्…,
मग सारं कसं मूर्खासारखं उत्कटं उत्कटं होत जाणार्,
पण तरीही श्वासाची लय फक्त कमी जास्त होत राहाणार, पण बंद नाही पडणार्,
काय रे देवा…..
<span class="Apple-style-span" style="font-s
iz
e:medium;”>
पाउस पडणार्.. मग हवा हिरवी होणार..मग पाना पानात हिरवा दाटणार्,
मग आपल्या मनाच पिवळ पान देठं मोडून हिरव्यात शीरू पहाणार, पण त्याला ते नाही जमणार्,
मग त्याला एकदम खर काय ते कळणार्, मग ते ओशाळणार्,
मग पून्हा शरीराशी परत येणार, सर्दी होउ नये म्हणून देहाला वाफ घ्यायला सांगणार, चहाच्या पाण्यासाठी फ्रीजमध्ये कुडमुडलेलं आलं शोधंणार्,
एस. डी. चं गाणही तोपर्यंत संपलेलं असणार्,रेडियोचा स्लॉट भरलेला असणार्,
मग तीच्या जागी ती असणार, माझ्या जागी मी असणार्, कपातल वादळं गवती चहाच्या चवीने पोटात निपचीत झालेलं असणार…..
काय रे देवा…..


पाउस गेल्यावर्षी पडला,पाउस यंदाही पडतो.. पाउस पूढच्या वर्षीही पडणार्….
काय रे देवा…..

उत्कट-बित्कट होऊ नये — संदीप खरे


मी आधी म्हटल्याप्रमाणे अधूनमधून मला आवडलेल्या कविता इथे पोस्ट करत जाईन… नुकतेच मला संदीप खरे ह्याच्या कवितांचे कलेक्शन एकाने फॊरवर्ड केले…त्यातलीच ही एक कविता.

बरेच दिवसात ’आयूष्यावर बोलू काही’ ला गेलो नाही, त्यामुळे मला तरी ही कविता नवीनच आहे…

==========================================


उत्कट-बित्कट होऊ नये, भांडू नये, तंडू नये..
असे वाटते आज-काल, नवे काही मांडू नये

नको कुठला नवा भार, जुनेच गुंते शिल्लक फार..
सूर गाठ-नीर गाठ, राहून द्याव्यात, ओढू नये…
असे वाटते आज-काल, नवे काही मांडू नये

असे वाटते बसून घ्यावे, उरले श्वास मोजत रहावे..
जन्मा-बिन्मा आलो त्याचे, पांग सुद्धा फेडू नये…
असे वाटते आज-काल, नवे काही मांडू नये

शिंकांसारखे सोपस्कार, मला झालीये गर्दी फार..
असल्या गळक्या जगण्यासाठी, रूमालसुद्धा काढू नये…
असे वाटते आज-काल, नवे काही मांडू नये

कुठे कधी रमला जीव, खरंच फार दमला जीव..
वजन, ज्ञान, ओळख, पित्त काही-काही वाढू नये…
असे वाटते आज-काल, नवे काही मांडू नये

कसले प्रहर, कसला काळ, मनात कायम संध्याकाळ..
तिच्या कुशीत मांडली कविता, तेवढी मात्र मोडू नये…
असे वाटते आज-काल, नवे काही मांडू नये ॥ ७ ॥

~ संदीप खरे

“झाड”: एक कविता


कविता आणि मी – हे समीकरण फारसं कधी जुळंल नाही (कविता म्हणजे – काव्य…कविता नावाचा इतर कुठलाही पदार्थ आमच्या अवतीभवती नाही)…तर मी कवितेत फारसा रमलो नाही कारण मला त्यातले फारसे कधी कळलेच नाही…  (’आपल्याला एखाद्या गोष्टीतले कळंत नाही’ हेच बऱ्याच लोकांना कळंत नाही…मला ते कळते आणि ते मी मान्य करतो हे काय कमी आहे?). 

आमचे मास्तर, किंवा काही कविता कळते असे समजणारे लोक एकाच कवितेतून नाही नाही ते अर्थ काढतात – की जे खुद्द कविलापण अभिप्रेत नसतील. 

“Censor is a person who finds 3 meanings of a joke – when there are actually only 2!” … तसे काहीसे….असो.

पण तरीही मी कविता वाचत राहतो – कधी तरी मलाही कविता कळेल (निदान एक अर्थ तरी!) ह्या सद्भावनेने.

आणि परवाच एक अशी कविता वाचण्यात आली जी मला चक्क कळली! (मी जर मराठीचा प्राध्यापक असतो तर ’कविता भावली’ असे म्हणालो असतो, आणि स्वतः कवी असतो तर ’कविता उमगली’ असे!)

कविता कळली त्याचे कारण ति ज्या विषयावर आहे त्या मंदीचा फटका मलाही बसला आहे… (आमच्या एका नातेवाईकाचे नाव ’मंदा’ आहे – तिला लाडानी लोक ’मंदी’ म्हणतात…आणि ती लाडानी आम्हाला कायम फटके द्यायची…पण ते ’मंदीचे फटके’ वेगळे…)

तर ती कविता कोण्या एका ’स्वामी’ नावाच्या कवीची आहे…आता स्वामी हे त्याचे (किंवा तीचे) “टोपणनाव” आहे, की “रिफील-नाव” की “संपूर्ण पेन-नाव” ते काही मला माहीती नाही (शीः विनोदाचा किती गरीब आणि सुमार प्रयत्न होता). पण कविता चांगली आहे…वाचा. बाकी सध्या मला बऱ्यापैकी कविता ’भावायला’ लागल्या आहेत…त्यामुले आता अधुनमधून असाच (दुसऱ्याच्या) कवितांचा मारा होत रहाणार…फक्त अशी प्रार्थना करा की मला कविता करायची दुर्बुद्धी व्हायला नको…

—————————————-
“झाड”

मी लावलं होतं एक स्थावर मालमत्तेचं झाड
त्याला कर्जाचं पाणी टाकून,
वाढवत होतो हळूहळू.

खूप निघत होता व्याजाचा घाम
चालू होतं हप्त्याचं ठिबक सिंचन
आणी रिकामी होत होती सेविंगची टाकी

वाट बघत होतो अशा एका पावसाची
ज्याने ओसंडून वा

आई…

दिवसभर कितीही दंगा केला
तरी मला थोपटल्याशिवाय आई कधी झोपली नाही
घरापासुन दूर आता म्हणूनच कदाचित
शांत झोप कधी लागली नाही

कुणी विचारतं ..
“तुला घरी जावसं वाटत नाही?”
कसं सांगू त्यांना, घरातून निघताना
आईला मारलेली मिठी सोडवत नाही

आई, तू सांगायची गरज नाही
तुला माझी आठवण येते
आता माझ्यासाठि डबा करायचा नसतो
तरीहि तू सहा वाजताच उठतेस

तुझ्या हातचा चहा
तुझ्या हातची पोळी
तुझ्या हातची माझी नावडती भाजीही खायला
आता जीभ आसुसली

घरापासून दूर …
आई जग खूप वेगळं आहे
तुझ्या सावलीत अगदी बिंनधास्त होते
आता रणरणंत ऊन आहे

तू आपल्या पिलांसाठी
सगळं केलंस …
एक दिवस पिलं म्हणाली, “आई आता आम्हाला जायचंय” …
आणि तू त्यांना जाऊ दिलंस

आई, तू इथे नाहीस
बाकी माझ्याकडे सगळं आहे
घरापासून दूर
जग खूप वेगळं आहे