Search

ekoshapu

Notes to Myself

Category

मनोरंजन/ माध्यमे

मराठी वेब सिरीज: “भाडीपा” चा “कास्टिंग काऊच”

वेब सिरीज हा प्रकार तसा नवा आहे, पण क्रिएटिव्ह लोकांसाठी तो खूप चांगला प्लॅटफॉर्म आहे… म्हणजे ज्यांना स्टुडिओ, प्रॉडक्शन हाऊस, टीआरपी वगैरे बंधनामुळे ज्या गोष्टी, जे प्रयोग टीव्ही वर करता येत नाहीत ते वेब सिरीज मध्ये करता येतात.
ऍमेझॉन, नेटफ्लिक्स हे आता खूप मोठ्या स्केलवर एक्सक्लुसिव वेब कन्टेन्ट मोठ्या प्रमाणावर बनवायला लागले आहेत. आपल्याकडे AIB वगैरे काही निवडक ग्रुपनी वेब सिरीज मध्ये जम बसवला आहे. पण मराठी मध्ये असे प्रयोग नसतील…असं आत्तापर्यंत वाटत होतं.
पण नुकतीच अमेय वाघ आणि निपुण धर्माधिकारी यांची “भारतीय डिजिटल पार्टी” उर्फ “भाडीपा” ह्या बॅनर खाली बनवलेल्या “कास्टिंग काऊच” ह्या वेब सिरीज चे काही भाग बघितले. २-३ भाग छान जमून आले आहेत, काही अगदीच ओढूनताणून केले आहेत किंवा फसले आहेत…पण एकूणच प्रयोग नाविन्यपूर्ण आणि स्तुत्य आहे!
मला आवडलेले २-३ एपिसोड इथे शेअर करत आहे
Ajay-Atul
Radhika Apte
Mithila Palkar
Advertisements

चहा स्तोत्र…

कॉफी मुक्त होण्यासाठी कॉफीच्या आधीन गेलेल्या (म्हणजे वाट चुकलेल्या) लोकांनी हे स्तोत्र रोज ३ वेळा म्हणून नंतर चहा-तीर्थ घेतल्यास १ महिन्यात ते बरे होतात आणि योग्य मार्गाला लागतात  🙂

amrut-tulya-detail.jpg

स्वयं Talks – Youtube Channel

मला TED Talks ऐकायला आवडते. अर्थात खूप कमी Talks खरंच दर्जेदार असतात. बरेचदा Talks सुमार किंवा यथातथा असतात. पण एक उपक्रम म्हणून TED Talks किंवा Google Talks ही खूप चांगली कल्पना आहे.

उगाचच भव्य-दिव्य किंवा जीवनरहस्य सांगायचा आव न आणता साधे पण प्रभावी वक्ते आणि त्यांच्याशी गप्पा अशा प्रकारचे कार्यक्रम मला चांगले वाटतात.

मराठीत असं काही का नाही असं मला वाटायचं…वाटायचं अशा साठी म्हणालो की आता ABP माझा चा “कट्टा” किंवा इतर काही मराठी चॅनेल वरील कार्यक्रम, किंवा पूर्वी झालेले “ग्रेट भेट” असे कार्यक्रम Youtube वर बघता येतात. पण तरीही TED Talk सदृश काही नाहीये असं वाटायचं.

पण नुकताच मी Youtube वर “स्वयं Talks” हा चॅनेल पाहिला. त्याचा format हा TED Talks सारखाच आहे…पण मराठी मधून. २-३ Talks ऐकले ते चांगले वाटले, म्हणून इथे शेअर करावं असं वाटलं… असे अजून काही कार्यक्रम तुम्हाला माहिती असतील तर नक्की सांगा…

First anniversary of Demonetisation

One year after “Mitron…” Day i.e. remembering (not celebrating) first anniversary (8-Nov-2016) of Demonetisation…

Will post throughout this week jokes and articles that showcase the blunder called Demonetization.

Here is a parody song to begin with:

बार बार फैंको, हजार बार फैंको…

एका नवीन नाटकाची जाहिरात…

आजच्या म.टा. मध्ये प्रसिद्ध झालेली एका नवीन नाटकाची जाहिरात…

राजश्री मराठी डॊट कॊम

राजश्री फिल्म्स या चित्रपट निर्मिती, वितरण करणाऱ्या कंपनीकडे अनेक चित्रपट, मालिका इ. चे वितरणाचे हक्क आहेत. केवळ हिंदीच नाही तर इतर भाषेतल्या कलाक्रुतींचे सुद्धा…

नुकतीच मी त्यांची वेबसाईट – राजश्री मराठी डॊट कॊम पाहिली आणि त्याचीच लिंक इथे शेअर करत आहे…

इथे तुम्हाला अनेक मराठी चित्रपट, मालिका इ. च्या चित्रफिती (संपूर्ण किंवा संक्षिप्त) पाहता येतील – तेदेखील विनामूल्य!

~ कौस्तुभ

मधुबाला ची काही दुर्मिळ छायाचित्रे

मधुबाला ची काही दुर्मिळ छायाचित्रे – नक्की कोणत्या वर्षीची आहेत ते माहिती नाही.

माधुरी दीक्षित आणि यांची तुलना, साम्य (ती आणि मधुबाला एका काळात असत्या तर कोण जास्त लोकप्रिय झाले असते ई.) ह्यावर अनेक लेख आणि चर्चा झाल्या आहेत किंवा होत रहातील.

पण माझ्या मते  –
१) अशी चर्चा करता येणे शक्य नाही – कारण काळानुसार कोणाचे करीअर कसे घडले असते याचा तर्क करणे अशक्य आहे
आणि त्याहून महत्वाचे…
२) अशी चर्चा करायची गरजच काय!!?? दोघीही (आणि इतर अनेक!) आपापल्या गुणावगुणांसकट चांगल्याच आहेत. उगाच ही भारी आणि ती ’लय्य भारी’ असल्या बाता कशाला?

असो. आता गप्प बसतो – तुम्ही छायाचित्रे पहा!

~ कौस्तुभ

सुखांत

आज संजय सूरकर दिग्दर्शित ’सुखांत’ हा इच्छामरण या विषयावरचा मराठी चित्रपट पाहीला…फारच चांगला आणि आशयपूर्ण चित्रपट आहे!

ह्याबद्दल सविस्तर लवकरच…पण शक्य झाल्यास नक्की पहा…चुकवू नका.

~ कौस्तुभ

वटवट वटवट…

वटवट वटवट…

मी आधी म्हटल्याप्रमाणे पुलंचे वटवट वटवट हा बहुरंगी-बहुढंगी कार्यक्रम माझ्या पॊडकास्ट वर अपलोड केला आहे…

Part2:

Part3:

Part4:

Part5:

<a href="http://www.gigyamailbutton.com/wildfire/gigyamailbutton.ashx?url=aHR*cDovL3dpbGRmaXJlLmdpZ3lhLmNvbS93aWxkZmlyZS93ZnBvcC5hc3B4P21vZHVsZT1lbWFpbCZ1cmw9aHR*cCUzYSUyZiUyZnd3dy5wb2RvbWF*aWMuY29tJTJmcG9kY2FzdCUyZmVtYmVkJTJmMTEwNzUyMSUyZjQzMjgyMA==&quot; target="_
bl
ank”>

Part6:

~ कौस्तुभ

Blog at WordPress.com.

Up ↑