श्रुती भावे – the violin player

सध्या मी नियमित पणे evening walk ला जातोय...sugar नियंत्रणात ठेवण्यासाठी जे काही उपाय सुचवले त्यातला "चालणे" हा मला जास्त आवडला. बरेचदा माझे मित्र पण बरोबर येतात. त्यातल्या एकाने मला नवीन shoes घ्यायला लावले; त्यावरून मी त्याला बरंच टोचून बोललो, म्हणून तो आता कर्तव्यबुद्धीने माझ्याबरोबर चालायला येतो. त्या मित्राला संगीत, वादन वगैरे ची आवड आहे. तो थोडाफार... Continue Reading →

पं भीमसेन जोशी @ १०१

आज ४ फेब्रुवारी २०२३ हा पं. भीमसेन जोशी यांचा १०१ वा जन्मदिवस. मी अगदी कमी थोर लोकांना (म्हणजे जे मला थोर वाटतात ते) प्रत्यक्ष पाहिलं आहे. पु. ल. देशपांडे यांना प्रत्यक्ष कधी पाहिलं नाही. पण ज्या काहींना पाहिलं त्यातले एक म्हणजे पं. भीमसेन जोशी. त्यांची गाणी, त्यांचा आवाज अजूनही मी जवळजवळ रोज ऐकतो. तर आज... Continue Reading →

लुटे दिल में दिया जलता नही, हम क्या करे…

राहुल देशपांडे च्या Youtube चॅनेल बद्दल मी यापूर्वीही लिहिले आहे. कालच त्याचे प्रियांका बर्वे बरोबरचे "ये दिल तुम बिन कही लगता नही, हम क्या करे" हे गाणे Youtube वर प्रसिद्ध झाले आणि योगायोगाने मी काही मिनिटांमध्येच ते ऐकले.  याआधीही अनेकदा हे गाणे ऐकले असूनही काल ऐकताना त्याचे शब्द प्रथमच लक्ष पूर्वक ऐकले. किंबहुना त्यांनी ते ज्या प्रकारे... Continue Reading →

संगीतमय विठ्ठल

आज आषाढी एकादशी...महाराष्ट्र सोडून इतर भारतीयांसाठी एकशयनी एकादशी. आमच्या घरी बऱ्यापैकी धार्मिक वातावरण असल्यामुळे लहानपणा पासून एकादशी, महाशिवरात्री आणि रामनवमी ह्या दिवशी सगळे जण उपास करतात. मला उपासाचे पदार्थ खूप आवडत असल्यामुळे "एकादशी दुप्पट खाशी" या न्यायाने मी देखील उपास करतो. पण त्यापलीकडे जाऊन मला रामनवमी बद्दल खूप जास्त जिव्हाळा आहे, कारण आमच्या घरीच राममंदीर... Continue Reading →

” मी वसंतराव” विषयी…

काल मी (अखेरीस) "मी वसंतराव" हा चित्रपट पाहिला आणि मला तो खूपच आवडला! मी ह्यापूर्वी एका ब्लॉग मध्ये लिहिले त्याप्रमाणे माझ्या या चित्रपटाकडून माफक अपेक्षा होत्या. दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी हा एक विचारी आणि तल्लख माणूस आहे. त्याचे याआधीचे २ चित्रपट मी अजून पाहिले नाहीत. पण त्याचे TV आणि सोशल मीडिया यांवरील मुलाखती, skits यावरून तो... Continue Reading →

हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतप्रेमींसाठी Youtube चॅनेल

नुकतेच माझ्या पाहण्यात काही चांगले हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत विषयक Youtube चॅनेल आले. ते इथे share करत आहे.  "सा" व "नी" Events - येथे शास्त्रीय संगीताच्या अनेक मैफिली ऐकायला मिळतील. जास्त करून नवीन पिढीतले गायक, वादक आणि अलीकडच्या काळातील मैफिलींचा साठा इथे उपलब्ध आहे.  https://www.youtube.com/c/SavaniEvents भीमसेन जोशी - हा पंडित भीमसेन जोशींना वाहिलेला Youtube चॅनेल आहे. ... Continue Reading →

लता मंगेशकर यांच्या काही दुर्मिळ आणि चांगल्या मुलाखती

लता मंगेशकर यांना जाऊन उद्या एक आठवडा होईल. गेल्या ६-७ दिवसात त्यांना श्रद्धांजली वाहणारे, आठवणी जागवणारे अनेक लेख मी वाचले. पण कशानेही समाधान झाले नाही. कारण ते लेख लिहिणारी मंडळी बेताची, सुमार किंवा आत्मप्रौढी मिरवणारी होती. बऱ्याचशा लेखांत स्वतःची टिमकी वाजवणे, किंवा भाराभर गाण्यांची यादी आणि सनावळी देणे किंवा उगाच आचरट उपमा, रूपक, कृत्रिम आणि तकलादू शब्दप्रयोग... Continue Reading →

लता मंगेशकर, पुलं आणि खोगीरभरती

आज सकाळी लोकसत्ता मध्ये नुकत्याच निधन झालेल्या अनिल अवचट यांच्यावरील दोन सुंदर लेख आहेत - एक त्यांचे लहान भाऊ आणि चित्रकार सुभाष अवचट यांचा तर दुसरा डॅा. आनंद नाडकर्णी यांचा. ते वाचून होत असतानाच गानकोकिळा भारतरत्न लता मंगेशकर यांचे निधन झाल्याची बातमी समजली. तशा त्या गेल्या १ महिन्यापासून आजारी होत्या, वयही ९२ वर्षे होते. काल... Continue Reading →

पंडित भीमसेन जोशी @ १००

आज भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांची जन्म शताब्दी. (जन्मः ४ फेब्रुवारी १९२२). भारतीय शास्त्रीय संगीतातील ज्येष्ठ आणि श्रेष्ठ गायक भीमसेन यांना प्रत्यक्ष पाहण्याचा आणि ऐकण्याचा योग मला लहानपणी अनेकदा आला. त्याकाळी (म्हणजे १९०-१९९५) आमच्या शाळेच्या मैदानावर सवाई गंधर्व महोत्सव होत असे. २ वर्ष माझ्या बाबांबरोबर मी गेल्याचं आठवतं. इतर वेळेस शाळेतल्या आतल्या बाजूला थांबून त्या... Continue Reading →

भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांची जन्मशताब्दी

आज भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरू होत आहे (जन्म: ४ फेब्रुवारी २०२२). आज त्यांच्या पुरस्कारांची माहिती वाचताना एक विशेष गोष्ट जाणवली. ती अशी की त्यांना चारही पद्म पुरस्कार मिळाले आहेत — पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण आणि भारतरत्न! हे वाचल्यावर मी उत्सुकतेने अजून थोडी माहिती घेतली. आजपर्यंत केवळ ४ जणांना चारही पद्म पुरस्कार मिळाले... Continue Reading →

Create a free website or blog at WordPress.com.

Up ↑