कॉफी मुक्त होण्यासाठी कॉफीच्या आधीन गेलेल्या (म्हणजे वाट चुकलेल्या) लोकांनी हे स्तोत्र रोज ३ वेळा म्हणून नंतर चहा-तीर्थ घेतल्यास १ महिन्यात ते बरे होतात आणि योग्य मार्गाला लागतात 🙂 https://soundcloud.com/user-981722748/chaha-stotra/s-HqBkm
सहज सुचलं म्हणून… कृष्ण आणि कृष्णावतार (नमो) !
माझी आजी महाभारतातल्या गोष्टी सांगायची... त्यातली एक कृष्ण-सत्यभामा यांची होती. कृष्णाला रुक्मिणी आणि सत्यभामा अशा दोन बायका होत्या. तशा १६,००० होत्या म्हणे, पण त्यातल्या प्रमुख ह्या दोन.होत्या. रुक्मिणी प्रेमळ आणि समंजस (थोडक्यात "आदर्श" बायकोसारखी ) होती. तर सत्यभामा प्रेमळ पण खाष्ट, चीडचीड करणारी, भांडकुदळ, संशयी, मत्सरी अशी होती (थोडक्यात "खऱ्या" बायकोसारखी ) मी लहानपणी वाचलेल्या सगळ्या गोष्टींमध्ये राजांना दोन बायका असायच्या - एक आवडती आणि एक नावडती. हल्ली महागाई इतकी वाढली आहे की २ बायका परवडणे अवघड आहे. म्हणून त्यांना एकच बायको असते - नावडती हे विषयांतर झाले. असो. तर कृष्ण आणि सत्यभामा यांचे सतत भांडण व्हायचे. सत्यभामा आणि रुक्मिणी यांची घरं शेजारी-शेजारी च होती. आणि सत्यभामाला तिच्या संशयी स्वभावाप्रमाणे कृष्ण रुक्मिणीवर जास्त प्रेम करतो, जास्त वेळ देतो... असं वाटायचं. हे आपल्याकडे कविवर्य ग. दि. माडगूळकर यांनी अतिशय काव्यात्म आणि समर्पक रितीने एका गीतात मांडले आहे. सत्यभामा कृष्णाला विचारते: "बहरला पारिजात दारी, फुले का पडती शेजारी". पारिजातकाचे झाड स्वर्गातून कृष्णाने पृथ्वीवर आणले. हे झाड कोठे लावावे यावरून सत्यभामा आणि रूक्मिणी यांच्यात वाद झाला. कृष्णाने ते झाड सत्यभामाच्या अंगणी अशा ठिकाणी लावले की फुले उमलल्यावर रुक्मिणीच्या अंगणात पडावे. ह्यात पारिजातकाचे झाड हे प्रेमाचे रूपक म्हणून वापरले आहे. संपूर्ण गीत हे असे आहे: ======================== बहरला पारिजात दारी फुले का पडती शेजारी माझ्यावरती त्यांची प्रीती पट्टराणी जन तिजसी म्हणती दुःख हे भरल्या संसारी। असेल का हे नाटक यांचे मज वेडीला फसवायाचे? कपट का करिती चक्रधारी। का वारा ही जगासारखा तिचाच झाला पाठीराखा वाहतो दौलत तिज सारी। ... फुले का पडती शेजारी।। ======================== म्हणजे कृष्ण पण असा चतुर आणि खोडकर होता की त्याने झाड लावले सत्यभामेच्या अंगणात पण ते अशा प्रकारे लावले की त्यातूनही तिची चीडचीड आणि जळजळच होईल! हे परत विषयांतर झाले. असो. तर सत्यभामा त्यामुळे सारखी चिंताग्रस्त असायची, कि कृष्णाचं तिच्यावर सगळ्यात जास्त प्रेम आहे का नाही. म्हणून तिने कृष्णाला विचारले: "मी तुम्हाला किती प्रिय आहे?" ती आत्ताच्या काळात असती तर "On scale of 1 to 10, 1 being 'I don't hate you' and 10 being 'I am totally into you', how much do you love me?" असा पॉईंटेड प्रश्न विचारला असता. पण असा ओपन एंडेड प्रश्न विचारल्यामुळे पुन्हा कृष्णाला खोडकरपणा करायची संधी मिळाली. कृष्ण म्हणाला: तू मला मिठाइतकी प्रिय आहेस! सत्यभामा म्हणाली:... Continue Reading →
रामनवमी च्या हार्दीक शुभेच्छा…
रामनवमी च्या हार्दीक शुभेच्छा...
स्वयं Talks – Youtube Channel
मला TED Talks ऐकायला आवडते. अर्थात खूप कमी Talks खरंच दर्जेदार असतात. बरेचदा Talks सुमार किंवा यथातथा असतात. पण एक उपक्रम म्हणून TED Talks किंवा Google Talks ही खूप चांगली कल्पना आहे. उगाचच भव्य-दिव्य किंवा जीवनरहस्य सांगायचा आव न आणता साधे पण प्रभावी वक्ते आणि त्यांच्याशी गप्पा अशा प्रकारचे कार्यक्रम मला चांगले वाटतात. मराठीत असं काही का... Continue Reading →
अशोक नायगावकर – कविता आणि बरंच काही
अशोक नायगावकर - कविता आणि बरंच काही https://www.youtube.com/watch?v=p4VW7q0XpFk https://www.youtube.com/watch?v=TDo3b8RQJZA&t=176s https://www.youtube.com/watch?v=bn0_wbZAZmA&t=235s
मराठी पाठयपुस्तके आणि “गोखल्यांचे रास्ते कसे बनले?
नुकतेच आमच्याकडे "शालेय शिक्षण" या विषयावरून रसाळ वाद झाले. SSC बोर्ड पासून CBSE/ICSE बोर्ड पर्यंत आणि Home Schooling पासून Boarding School पर्यंत अनेक मुद्दे एकाच वेळेस चर्चेत होते. शिक्षणाचा दर्जा, अभ्यासक्रमाचा दर्जा, शिक्षकांचा दर्जा, शाळेचा/संस्थेचा दर्जा इत्यादीपासून सुरुवात होऊन मग हळू हळू हल्लीचा "ट्रेंड" काय, "पीअर ग्रुप" चं मत काय, "convenience over curriculum" अशा वाटेने चर्चा-cum-वाद झाला... अर्थात एका दिवशी किंवा एका बैठकीत नाही तर काही दिवस/आठवडे या कालावधीत. शेवटी सध्याच्या अभ्यासक्रमात काय आहे हे बघण्यासाठी आम्ही SSC बोर्ड आणि CBSE बोर्ड यांची Science विषयाची १० वी ची पुस्तकं विकत आणली. ती ५-१० मिनिटे चाळल्यावर SSC बोर्डकी CBSE बोर्ड हा प्रश्न निकालात निघाला. SSC बोर्डाच्या पुस्तकाचा दर्जा इतका इतका...इतका जास्त सुमार आहे की त्याबद्दल चर्चा करणेही निरुपयोगी आहे. अर्थात माझ्या वेळी SSC ची पुस्तकं फार ग्रेट होती असं नाही...आणि माझ्या वेळची CBSE ची पुस्तकं पाहण्याचं तेव्हा आमच्या डोक्यातही आलं नव्हतं. मुळात शाळाच "घराजवळची, चालत जात येण्यासारखी आणि वडील आणि आजोबा जिथे शिकले ती" अशा साध्या विचारातून निवडलेली... त्यामुळे अभ्यासक्रम compare करणे वगैरे कोणी केलं असण्याची पुसटशीही शक्यता नाही. पण एक चांगली गोष्ट म्हणजे, मी माझ्या वेळची बालभारतीची काही पुस्तकं अजूनही जपून ठेवली आहेत. सगळ्या विषयांची नाहीत, पण मराठी विषयाची ४-५ इयत्तांची, गणिताची, इतिहासाची, भूगोलाची २-३, Science ची १-२ अशी पुस्तके आहेत. ह्या चर्चेच्या निमित्ताने मी ती पुस्तके पुन्हा उघडून बघितली... तितकी वाईट नव्हतं आमचं curriculum - विशेषतः मराठी, maths, science. आत्ताच्या SSC बोर्डाच्या पुस्तकांशी तुलना केली तर फारच चांगली! गंमत म्हणजे मला मराठीचे काही धडे (गद्य) आणि कविता (पद्य) अजूनही आठवतात, पाठ आहेत. त्यांच्याशी संबंधित शाळेतले प्रसंग, शिक्षकांनी दिलेली उदाहरणे ही लक्षात आहेत - सगळी नाही, पण काही ठळक. त्या नंतर सहज म्हणून मी इंटरनेटवर ही सगळी पुस्तके मिळतात का ते शोधत बसलो. बाकीच्या विषयांची नाहीत पण मराठी विषयाची सर्व पुस्तके (१ ली ते ८ वी) बालभारती च्या वेबसाइट वर Archive विभागात आता उपलब्ध आहेत. तुम्ही ती इथून डाउनलोड करू शकता. फक्त सध्याच्या अभ्यासक्रमाची नाही तर मागच्या ३-४ अभ्यासक्रमाची. म्हणजे सिरीज-१ ची पुस्तके बहुदा १९८०-१९८५ च्या काळातली असतील. त्यानंतर सिरीज-२ ची पुस्तके... असे. ते सापडल्यावर मी अजून जुनी पाठ्यपुस्तके सापडतात का ते बघत होतो... माझ्या वडिलांच्या काळातली. आणि गंमत म्हणजे मला वडिलांच्या काळचे नाही परंतु त्याच्याही खूप आधीच्या काळाचे, म्हणजे माझ्या आजोबांच्या ही आधीच्या काळचे मराठी विषयाचे क्रमिक पुस्तक सापडले - त्यावर १९०६ सालाचा शिक्का आहे, आणि ते "मराठी तिसरी" चे मुंबई इलाख्याचे क्रमिक पुस्तक आहे असं दिसतंय...किंमत ६ आणे (४ आणे म्हणजे २५ पैसे). मी एक गोष्ट खूप पूर्वी वाचली होती... "गोखल्यांचे रास्ते कसे बनले?" गोखल्यांच्या एका शाखेचे आडनाव बदलून रास्ते झाले... शिवाजी महाराज किंवा पेशव्यांच्या काळात... त्याबद्दलची ती गोष्ट होती. बहुदा कुठल्या तरी दिवाळी अंकात किंवा मासिकात त्याबद्दल लिहिले होते. माझ्या वडिलांना ती गोष्ट चांगली माहिती होती. त्यांच्या पूर्वीच्या पाठ्यपुस्तकात ती गोष्ट धडा म्हणून होती. आणि नवल म्हणजे ह्या १९०६ सालच्या मराठी तिसरीच्या पुस्तकात तो धडा आहे (क्रमांक ११)! एकूणच ते १९०६ सालचे पाठ्यपुस्तक खूप जास्त दर्जेदार आहे! आणि मुख्य म्हणजे प्रत्येक धड्याच्या शेवटी "गाळलेल्या जागा भरा", "एका वाक्यात उत्तरे द्या" सारखे आचरट प्रश्न नव्हते. आपली शिक्षणपद्धती "मार्क्स-वादी" व्हायच्या पूर्वीचा काळ होता तो! असो. हे मराठी तिसरीचे पुस्तक Marathi-Third-Book नक्की वाचा. आणि अजून अशीच जुनी दुर्मिळ पाठ्यपुस्तके मिळाली तर शेअर करा... P.S.: For Alternate Link to Marathi Third... Continue Reading →
Statistics is fun!
Statistics (सांख्यिकी) हा विषय बऱ्याच लोकांना त्रास देतो, कारण तो अतिशय रुक्ष आणि कठीण आहे असं बऱ्याच लोकांना वाटतं. दोष त्यांचा नसून तो शिकवणाऱ्या लोकांचा किंवा शिकवण्याच्या पद्धतीचा आहे. खरं तर स्टॅटिस्टिक्स हा application-oriented विषय आहे. स्टॅटिस्टिक्स चा उद्देशच मुळात अनुमान काढणे आणि त्याप्रमाणे निर्णय घेणे / कृती करणे हा असतो. statistics stəˈtɪstɪks/ noun... Continue Reading →
Strategy Diamond आणि Arena
मला (दोन) MBA करताना काही concepts, theories, models, frameworks विशेष आवडल्या किंवा relevant वाटल्या. (कदाचित बाकीच्या नीट समजल्या नसतील). त्यातले एक framework म्हणजे The Strategy Diamond. कोणतेही मॉडेल/फ्रेमवर्क जर नुसतं theoretical / पुस्तकी राहिलं तर ते तितकंसं अपील होत नाही आणि लक्षात राहात नाही. पण जर आपल्या आजूबाजूच्या उदाहरणातून ते दिसले तर मात्र ते पक्कं... Continue Reading →
बोधकथा…
मला आयुष्यात मिळालेले वक्त्रुत्व स्पर्धेतले एकमेव बक्षीस ह्या गोष्टीमुळे मिळाले. (इयत्ता ६ वी मधे. तेही ३ रे बक्षीस). तेही वक्त्रुत्व गुणांपेक्षा ह्या गोष्तीतील भाबडेपणाला मिळाले असावे. ६ वी चे वर्ष माझ्यासाठी विशेष संस्मरणीय होते कारण मला हस्ताक्षर स्पर्धेत पहिले, चित्रकलेत दुसरे तर कथाकथनात तिसरे बक्षीस मिळाले होते. असो. स्वतःचे कौतुक पुष्कळ झाले. आता गोष्ट सांगतो... ------------------------------------------------------------------------------------------------------------ आटपाट नगर होते. तिथे एक राजा राज्य करत होता. त्याने आजूबाजूची लहान मोठी राज्ये जिंकून आपल्या राज्याचा विस्तार केला होता. राज्याच्या तिजोरीत भरपूर खजिना आणि धान्यकोठारात भरपूर धान्य होते. एकूणच राज्यकारभार चांगला चालला होता. पण तरीही राजाला मन:स्वास्थ्य नव्हते. आपण कुठे तरी अपुरे पडत आहोत असे त्याला वाटायचे. एके रात्री तो असाच वेष बदलून राज्यात फेरफटका मारायला निघाला. जाता जाता त्याला एक झोपडी दिसली. त्या झोपडीतून त्याला गाणे गुणगुणण्याचा आणि काम करत असल्याचा आवाज ऐकु आला. इतक्या रात्री कोणी तरी तरी काम करत आहे हे पाहून राजाची उत्सुकता चाळवली गेली. तो झोपडीपाशी गेला आणि आत डोकावून पाहू लागला. आत एक लोहार आपले काम करत होता. राजाला बघताच तो काम करायचे थांबला. त्याने राजाला ओळखले नाही पण तरीही कोणी एक वाटसरु आपल्या दाराशी आला हे पाहून त्याने राजाला बसायला पाट पुढे केला आणि प्यायला पाणी दिले. तो काम करुन दमल्याचे त्याचा चेहरा स्पष्टपणे दाखवत होता पण तरीही तो आनंदी आणि समाधानी वाटत होता. इकडचे तिकडचे प्रश्न न विचारता राजाने त्याला थेट प्रश्न विचारला, "तुम्ही खूप आनंदी दिसता. ह्याचे कारण काय?" लोहार म्हणाला, "असेलही कदाचीत. ह्याच्याबद्दल विचार करायला मला कधी वेळच मिळाला नाही." त्याच्या इतक्या बेफ़िकिर आणि निर्विकार पणाचे राजाला खूप वैषम्य वाटले. तो म्हणाला, "नक्कीच तुम्ही खूप पैसे मिळवत असणार, खूप नावलौकीक कमावत असणार. अगदीच काही नाही तर निदान देवपूजा आणि दानधर्म तरी भरपूर करत असणार." लोहार उत्तरला, "भल्या माणसा, तू आत्ता जाणीव करून दिलीस तेव्हा मला जाणवले की मी ह्यातले काहीच करत नाही. खर सांगायचे तर हे सगळे करण्यासाठी माझ्याकडे वेळ आणि पैसा दोन्ही नाही. पूर्ण दिवस मी राब-राब राबतो आणि मिळेल तो सगळा पैसा खर्च करतो. मग मी हे सर्व कधी आणि कुठल्या पैशानी करणार?" राजा चक्रावला. त्याने विचारले, "म्हणजे. तू मिळवतोस किती आणि त्या पैशाचे तू करतोस तरी काय?" लोहार म्हणाला, "मी जे काही मिळवतो त्याचे ४ भाग करतो. एक भाग स्वत: खातो, एक भाग कर्ज फेडतो, एक भाग उधार देतो आणि एक भाग नदीत फेकतो. बस्स." राजा उतावळे पणाने म्हणला, "अरे बाबा असे कोड्यात बोलू नकोस. नीट स्पष्टपणे सांग याचा अर्थ." लोहार म्हणला, "मी एक भाग खातो म्हणजे एक भाग स्वत: वर, माझ्या पत्नीवर खर्च करतो. एक भाग कर्ज फेडतो म्हणजे तो भाग माझ्या आई-वडिलांवर खर्च करतो आणि त्यांचे उपकार माझ्या परीने फेडण्याचा प्रयत्न करतो. एक भाग उधार देतो म्हणजे माझ्या मुलावर खर्च करतो. म्हातारपणी तो माझी काळजी घेईल हीच त्या मागची स्वार्थी भावना आहे. आणि राहिलेला शेवटचा भाग मी नदीत फेकतो. म्हणजे माझ्या मुलीवर खर्च करतो. आज ना उद्या ती सासरी जाणार. तोवर तिला सांभाळणे हे माझे कर्तव्य आहे. त्यानंतर माझ्या तिच्याकडून कसल्याही अपेक्षा नाहीत. हे सगळे करता करता आपण म्हणालात त्या गोष्टींचा विचार करायला मला वेळच मिळत नाही" राजा काय समजायचे ते समजला. तो तिथून उठला आणि निमूटपणे निघून गेला. मन:शांती मिळावी म्हणून काय करावे असा प्रश्न आता त्याला पडला नव्हता.
Currency आणि Cryptocurrency
सध्या बिटकॉइन खूप गाजत आहे. त्यावरून बिटकॉइन सारख्या Cryptocurrency बद्दल माझी अनेकांशी बरेचदा चर्चा होते. काही लोकांनी त्यात थोडे फार पैसे कमावले आहेत, किंवा कमवायची इच्छा आहे. तर काहींना ती खूप दूरगामी परिणाम करणारी गोष्ट वाटते. उदा: २०४० पर्यंत सगळे व्यवहार फक्त बिटकॉइन नी च होणार, नाही झाले तर नाव बदलेन... (स्वतःचे का बिटकॉइन चे ते सांगायचं सोयीस्करपणे टाळतात) माझं अगदी स्पष्ट आणि थोडक्यात सांगायचं तर बिटकॉइन (or any cryptocurrency) हा at best एक bubble (फुगा) आहे, आणि at worst खूप मोठी फसवणूक (like a Ponzi scheme) आहे. का ते सांगतो. पण त्याआधी Currency आणि Cryptocurrency याबद्दल थोडंसं... प्रथम पैसा या संकल्पनेबद्दल. There are three basic functions of money. Money serves as a medium of exchange, as a store of value, and as a unit of account. Medium of exchange: Money can be used for buying and selling goods and services. पैशाचा उपयोग खरेदी-विक्री साठी केला जातो. पूर्वी barter system होती तेव्हा (उदाहरणार्थ) काही लोकं एक डझन चिक्कू देऊन त्याबदल्यात एक किलो तांदूळ घेत असतील, तेच काही लोक त्याबदल्यात ३ किलो तांदूळ मागत असतील. म्हणून common base/denominator या अर्थानी पैशाचा वापर उपयुक्त ठरला. "Price"... Continue Reading →

Recent Comments