Search

ekoshapu

Notes to Myself

Category

मराठी

स्वयं Talks – Youtube Channel

मला TED Talks ऐकायला आवडते. अर्थात खूप कमी Talks खरंच दर्जेदार असतात. बरेचदा Talks सुमार किंवा यथातथा असतात. पण एक उपक्रम म्हणून TED Talks किंवा Google Talks ही खूप चांगली कल्पना आहे.

उगाचच भव्य-दिव्य किंवा जीवनरहस्य सांगायचा आव न आणता साधे पण प्रभावी वक्ते आणि त्यांच्याशी गप्पा अशा प्रकारचे कार्यक्रम मला चांगले वाटतात.

मराठीत असं काही का नाही असं मला वाटायचं…वाटायचं अशा साठी म्हणालो की आता ABP माझा चा “कट्टा” किंवा इतर काही मराठी चॅनेल वरील कार्यक्रम, किंवा पूर्वी झालेले “ग्रेट भेट” असे कार्यक्रम Youtube वर बघता येतात. पण तरीही TED Talk सदृश काही नाहीये असं वाटायचं.

पण नुकताच मी Youtube वर “स्वयं Talks” हा चॅनेल पाहिला. त्याचा format हा TED Talks सारखाच आहे…पण मराठी मधून. २-३ Talks ऐकले ते चांगले वाटले, म्हणून इथे शेअर करावं असं वाटलं… असे अजून काही कार्यक्रम तुम्हाला माहिती असतील तर नक्की सांगा…

Advertisements

अशोक नायगावकर – कविता आणि बरंच काही

अशोक नायगावकर – कविता आणि बरंच काही

मराठी पाठयपुस्तके आणि “गोखल्यांचे रास्ते कसे बनले?

BaalBharati

नुकतेच आमच्याकडे “शालेय शिक्षण” या विषयावरून रसाळ वाद झाले. SSC बोर्ड पासून CBSE/ICSE बोर्ड पर्यंत आणि Home Schooling पासून Boarding School पर्यंत अनेक मुद्दे एकाच वेळेस चर्चेत होते. शिक्षणाचा दर्जा, अभ्यासक्रमाचा दर्जा, शिक्षकांचा दर्जा, शाळेचा/संस्थेचा दर्जा इत्यादीपासून सुरुवात होऊन मग हळू हळू हल्लीचा “ट्रेंड” काय, “पीअर ग्रुप” चं मत काय, “convenience over curriculum” अशा वाटेने चर्चा-cum-वाद झाला… अर्थात एका दिवशी किंवा एका बैठकीत नाही तर काही दिवस/आठवडे या कालावधीत.

शेवटी सध्याच्या अभ्यासक्रमात काय आहे हे बघण्यासाठी आम्ही SSC बोर्ड आणि CBSE बोर्ड यांची Science विषयाची १० वी ची पुस्तकं विकत आणली. ती ५-१० मिनिटे चाळल्यावर  SSC बोर्डकी CBSE बोर्ड हा प्रश्न निकालात निघाला. SSC बोर्डाच्या पुस्तकाचा दर्जा इतका इतका…इतका जास्त सुमार आहे की त्याबद्दल चर्चा करणेही निरुपयोगी आहे.
अर्थात माझ्या वेळी SSC ची पुस्तकं फार ग्रेट होती असं नाही…आणि माझ्या वेळची CBSE ची पुस्तकं पाहण्याचं तेव्हा आमच्या डोक्यातही आलं नव्हतं. मुळात शाळाच “घराजवळची, चालत जात येण्यासारखी आणि वडील आणि आजोबा जिथे शिकले ती” अशा साध्या विचारातून निवडलेली… त्यामुळे अभ्यासक्रम compare करणे वगैरे कोणी केलं असण्याची पुसटशीही शक्यता नाही.
पण एक चांगली गोष्ट म्हणजे, मी माझ्या वेळची बालभारतीची काही पुस्तकं अजूनही जपून ठेवली आहेत. सगळ्या विषयांची नाहीत, पण मराठी विषयाची ४-५ इयत्तांची, गणिताची, इतिहासाची, भूगोलाची २-३, Science ची १-२ अशी पुस्तके आहेत.

ह्या चर्चेच्या निमित्ताने मी ती पुस्तके पुन्हा उघडून बघितली… तितकी वाईट नव्हतं आमचं curriculum – विशेषतः मराठी, maths, science. आत्ताच्या SSC बोर्डाच्या पुस्तकांशी तुलना केली तर फारच चांगली!
गंमत म्हणजे मला मराठीचे काही धडे (गद्य) आणि कविता (पद्य)  अजूनही  आठवतात, पाठ आहेत. त्यांच्याशी संबंधित शाळेतले प्रसंग, शिक्षकांनी दिलेली उदाहरणे ही लक्षात आहेत – सगळी नाही, पण काही ठळक.
त्या नंतर सहज म्हणून मी इंटरनेटवर ही सगळी पुस्तके मिळतात का ते शोधत बसलो. बाकीच्या विषयांची नाहीत पण मराठी विषयाची सर्व पुस्तके (१ ली ते ८ वी) बालभारती च्या वेबसाइट वर Archive विभागात आता उपलब्ध आहेत. तुम्ही ती इथून डाउनलोड करू शकता. फक्त सध्याच्या अभ्यासक्रमाची नाही तर मागच्या ३-४ अभ्यासक्रमाची. म्हणजे सिरीज-१ ची पुस्तके बहुदा १९८०-१९८५ च्या काळातली असतील. त्यानंतर सिरीज-२ ची पुस्तके… असे.
ते सापडल्यावर मी अजून जुनी पाठ्यपुस्तके सापडतात का ते बघत होतो… माझ्या वडिलांच्या काळातली. आणि गंमत म्हणजे मला वडिलांच्या काळचे नाही परंतु त्याच्याही खूप आधीच्या काळाचे, म्हणजे माझ्या आजोबांच्या ही आधीच्या काळचे मराठी विषयाचे क्रमिक पुस्तक सापडले – त्यावर १९०६ सालाचा शिक्का आहे, आणि ते “मराठी तिसरी” चे मुंबई इलाख्याचे क्रमिक पुस्तक आहे असं दिसतंय…किंमत ६ आणे (४ आणे म्हणजे २५ पैसे).
मी एक गोष्ट खूप पूर्वी वाचली होती… “गोखल्यांचे रास्ते कसे बनले?” गोखल्यांच्या एका शाखेचे आडनाव बदलून रास्ते झाले… शिवाजी महाराज किंवा पेशव्यांच्या काळात… त्याबद्दलची ती गोष्ट होती.
बहुदा कुठल्या तरी दिवाळी अंकात किंवा मासिकात त्याबद्दल लिहिले होते. माझ्या वडिलांना ती गोष्ट चांगली माहिती होती. त्यांच्या पूर्वीच्या पाठ्यपुस्तकात ती गोष्ट धडा म्हणून होती. आणि नवल म्हणजे ह्या १९०६ सालच्या मराठी तिसरीच्या पुस्तकात तो धडा आहे (क्रमांक ११)!
एकूणच ते १९०६ सालचे पाठ्यपुस्तक खूप जास्त दर्जेदार आहे! आणि मुख्य म्हणजे प्रत्येक धड्याच्या शेवटी “गाळलेल्या जागा भरा”, “एका वाक्यात उत्तरे द्या” सारखे आचरट प्रश्न नव्हते. आपली शिक्षणपद्धती “मार्क्स-वादी” व्हायच्या पूर्वीचा काळ होता तो!

असो. हे मराठी तिसरीचे पुस्तक Marathi-Third-Book नक्की वाचा. आणि अजून अशीच जुनी दुर्मिळ

पाठ्यपुस्तके मिळाली तर शेअर करा…

P.S.: For Alternate Link to Marathi Third Book Click Here.

Statistics is fun!

Statistics (सांख्यिकी) हा विषय बऱ्याच लोकांना त्रास देतो, कारण तो अतिशय रुक्ष आणि कठीण आहे असं बऱ्याच लोकांना वाटतं. दोष त्यांचा नसून तो शिकवणाऱ्या लोकांचा किंवा शिकवण्याच्या पद्धतीचा आहे. खरं तर स्टॅटिस्टिक्स हा application-oriented विषय आहे.

 

स्टॅटिस्टिक्स चा उद्देशच मुळात अनुमान काढणे आणि त्याप्रमाणे निर्णय घेणे / कृती करणे हा असतो.

 

statistics

stəˈtɪstɪks/

noun

  1. the practice or science of collecting and analysing numerical data in large quantities, especially for the purpose of inferring proportions in a whole from those in a representative sample.

 

​So statistics is an “applied” science​.

स्टॅटिस्टिक्स विषय रटाळ आणि दुर्बोध होण्याचं मुख्य कारण म्हणजे Big Picture समजावून न घेता, किंवा purpose लक्षात न घेता थेट calculations वर भर दिला जातो. Calculate केलेल्या स्टॅटिस्टिक्स चं interpretation (“भावार्थ”!) बऱ्याच लोकांना शिकवलं जातच नाही.

Statistics is a tool. If you want right result, use right tool and right metric. पण त्यासाठी स्टॅटिस्टिक्स calculate करता येणे महत्वाचे नसून स्टॅटिस्टिक्स चा अर्थ समजणे महत्वाचे आहे.

मी जेव्हा वेगवेगळ्या लोकांना स्टॅटिस्टिक्स basics शिकवायचा प्रयत्न करतो तेव्हा एक case study किंवा scenario घेऊन प्रत्येक स्टॅटिस्टिक ची गरज किंवा उपयोग सांगायचा प्रयत्न करतो. बऱ्याच लोकांना तसा approach हवा असतो असं जाणवतं.

एक उदाहरण घेऊ. Average हे मुख्यतः ३ प्रकारचे असते –

(१) Mean – usual meaning of average. For example, mean of 10 and 20 is 15.

(२) Mode – the number that occurs most frequently in a given data set

(३) Median – when data set is arranged in increasing order, the number at middle place is median. For example, median of 5,2,11,4 and 1 is 4 because it is the middle position number (after arranging in ascending order)

पण त्यांचा अर्थ किंवा फरक समजला नाही आणि तीनही “on average” अशा गुळमुळीत cover खाली वापरून वाट्टेल तसा अर्थ काढता येऊ शकतो.

पण ह्या averages चा उद्देश माहिती पुरवणे आणि inference (निष्कर्ष) काढायला मदत करणे हा असतो. आता हेच ३ average वापरून एक उदाहरण देतो. Story behind the numbers.

हे दोन data set दिले आणि average calculate करून निष्कर्ष काढा असे सांगितले तर?

(१) १३, ०,०,७,३१, २६९, ३०

(२) ३८, ५६, ४९, १५२, ५१, ४

दोन्ही data set ची बेरीज आणि mean सारखेच आहे. ३५०/७ = ५०. पण म्हणून असा निष्कर्ष काढणे चुकीचे ठरेल की दोन्हीचा performance सारखाच आहे.

आता असं समजा की हे दोन data set हे ७ innings मधले batting scores आहेत. दोन्ही बॅट्समन चे average सारखेच आहे, पण नुसते आकडे बघूनही समजेल की त्यांच्या performance मध्ये खूप फरक आहे.

Average सारखेच असले तरी consistency मध्ये खूपच फरक आहे. ह्या उदाहरणातला “प्लेयर १” हा बेधडक शैलीमध्ये खेळतो, आणि बरेचदा लवकर आउट होतो; पण क्वचित प्रसंगी इतक्या धावा काढतो की त्याचे average ५० होते.

ह्या उदाहरणातला “प्लेयर २” खूप consistent आहे. सातत्याने ४०-५० च्या आसपास धावा करतो. क्वचित प्रसंगी लवकर आउट होतो पण त्याप्रमाणे शतकही झळकावतो!

म्हणजेच पहिला “सेहवाग” आहे तर दुसरा “द्रविड”! हे आपण “infer” करू शकलो कारण data set छोटा होता आणि नुसतं पाहून अंदाज येऊ शकला. पण data set खूप मोठा असेल तर?

अशा वेळेस mean सोडून इतर दोन average उपयोगी येतात.

Data set (१) आणि (२) ascending order मध्ये arrange करू:.

(१) ०,०,७,१३, ३०, ३१, २६९

(२) ४, ३८, ४९, ५१, ५६, १५२

 

 

आता data set (१) चा median ४था data point आहे, म्हणजे “१३” आहे

तर data set (२) चा median “४९” आहे

 

किंवा data set (१) ची range (सगळ्यात मोठा data point आणि सगळ्यात लहान data point यातला फरक) –> (२६९ – ०) = २६९ आहे. पण data set (२) ची range –> (१५२-४) = १४८ आहे.

 

म्हणजेच data set (१) खूप मोठ्या प्रमाणात swing होतो, किंवा जास्त unpredictable आहे.

Data set (२) narrow range मध्ये swing होतो. किंवा कमी unpredictable आहे, म्हणजेच जास्त predictable/ reliable आहे.

 

पण दोन्ही चं mean सारखेच आहे.

 

आता याचा निष्कर्ष असा काढू शकतो:

१. दोघेही खूप दीर्घ काळ खेळले तर दोघेही सारख्याच एकूण धावा आणि average (mean) धावा करतील

२. सेहवाग काही सामन्यात तुफान फटकेबाजी करून सामना जिंकू देऊ शकतो. तर द्रविड नियमितपणे धावांचा रतीब घालून सामना वाचवू शकतो.

३. म्हणजेच सेहवाग “match winner” तर द्रविड “match saver” म्हणून योगदान देऊ शकतो.

 

आता जर statistics अशा प्रकारे शिकवले तर ते रंजक होऊ शकेल आणि लक्षातही राहील. पण जर ते फक्त २ data set देऊन आणि त्याचा formula देऊन calculate करायला दिले आणि शिकवून झाले, आता अशीच २० उदाहरणं सोडवून practice करा… अशा प्रकारे शिकवले तर ते नक्कीच रुक्ष आणि अर्थशून्य वाटेल.

 

“जर तुम्ही जन्मभर केस वाढवले, तर ५० वर्षात त्या केसांची लांबी इतकी होईल की पृथ्वीला दोन वेढे घालता येईल” किंवा “एक मुंगी दिवस भरात ५६ किलोमीटर चालते” वगैरे छाप statistics हा त्या विषयाचा अपमान आहे. मुळात statistics चा उद्देश  अनुमान काढणे आणि त्याप्रमाणे निर्णय घेणे / कृती करणे हा असतो, असला पाहिजे. उगाच अर्थहीन माहिती “तुम्हाला माहिती आहे का?” या सदरात छापणे म्हणजे statistics नाही. पण अशी माहिती “रंजक” म्हणून छापणारे लोकं ही या जगात आहेत.

 

हेच मुख्य कारण आहे, statistics लोकांना न आवडण्याचे. पण योग्य उदाहरणातून ते समजावले तर खरंच रंजक आहे!

Grant Cardone said: “Average is a failing formula”. Now you would appreciate why “average”, without giving any insight into mean, median, mode, doesn’t convey much.

One more example which is often cited to stress on this notion is as follows:

“A statistician confidently tried to cross a river that was 1 meter deep on average. He drowned.”

Or, as Nassim Nicholas Taleb once explained: there was a person who put his one leg into 60 degree Celsius water bucket and other leg in 5 degree Celsius water bucket, hoping that “on average” his body temperature would be 32-33 degree Celsius. Unfortunately he died.

I have many more examples and anecdotes to explain many concepts in Statistics and make the study interesting. Hopefully I’ll write more on this topic with some advanced concepts and their link with other areas of life.

 

Strategy Diamond आणि Arena

मला (दोन) MBA करताना काही concepts, theories, models, frameworks विशेष आवडल्या किंवा relevant वाटल्या. (कदाचित बाकीच्या नीट समजल्या नसतील). त्यातले एक framework म्हणजे The Strategy Diamond.

The Strategy Diamond

कोणतेही मॉडेल/फ्रेमवर्क जर नुसतं theoretical / पुस्तकी राहिलं तर ते तितकंसं अपील होत नाही आणि लक्षात राहात नाही. पण जर आपल्या आजूबाजूच्या उदाहरणातून ते दिसले तर मात्र ते पक्कं लक्षात राहतं. म्हणूनच मला समजलं तसं आणि त्या उदाहरणातून The Strategy Diamond मॉडेल मधल्या “Arena” ह्या component बद्दल हा ब्लॉग लिहितोय.

Arena is – “the field where you / organization want to compete – it could be products, services, channels, market segments, geographies, technologies, value chain stages”. In some cases companies can “choose” the arena – especially when they are launching new product/service, entering new market or just starting up. In many cases you cannot choose arena, but still you have to understand the arena to position yourself vis-a-vis competitors.

Amazon आणि Flipkart यांचं Arena काय आहे? Product/Services ह्या दृष्टीने ते बऱ्यापैकी सेम आहे (खरं तर Amazon चा व्याप खूप मोठा आहे, पण तरी सर्वसामान्य लोकांना माहिती असलेला  Amazon चा व्यवसाय हा फ्लिपकार्ट सारखाच आहे). पण geography च्या दृष्टीने विचार केला तर Amazon चा Arena खूप मोठा आहे. जगभर त्यांचा पसारा आहे. एकाच वेळी ते भारतात Flipkart तर चीन मध्ये अलीबाबा शी स्पर्धा करतात, तसेच वॉल-मार्ट सारख्या brick and mortar retail chain शी पण स्पर्धा करतात.

Arena मोठा असण्याचे काही खास फायदे असतात. You can gain a lot more just by being part of a larger Arena. याची २-३ उदाहरणं मला जाणवली.

नुकताच मी फोर्ब्स इंडिया मॅगझीनचा “सेलिब्रिटी स्पेशल” अंक वाचला. गेली ५-६ वर्षे मी तसा अंक वाचतो आहे,ट्रॅक करतो आहे त्यातूनच मला ही २ उदाहरणे जाणवली.

पहिले उदाहरण – “द कपिल शर्मा शो” आणि त्याचा “poor Marathi cousin” “चला हवा येऊ द्या” यांचे.

हिंदी चॅनेल वरचा गेल्या काही वर्षातला लोकप्रिय कॉमेडी शो “द कपिल शर्मा शो” हा काही ओरिजिनल किंवा युनिक शो नाही. अमेरिकेतल्या तशाच फॉरमॅट च्या अनेक शोवरून तो कॉपी केला आहे. हिंदी मध्ये ही शेखर सुमन चे काही शो त्या फॉरमॅट वर आधारित होते आणि लोकप्रिय ही होते. पण आता मुख्य बदल काय घडला असेल तर तो म्हणजे “Arena” खूप बदललाय – हिंदी टीव्ही चा कॅनव्हास खूप मोठा आणि श्रीमंत झालाय. शेखर सुमन वगैरे लोकं जेव्हा शो करायचे तेव्हा फिल्म स्टार टीव्ही कडे वळले नव्हते. टीव्ही लोकप्रिय असला तरी “श्रीमंत” नव्हता. आता तसं राहिलं नाहीये. आणि त्यामुळे कपिल शर्मा ला तसाच शो करून अफाट पैसा मिळाला. अफाट म्हणजे किती? तर गेली पाच वर्षे तो फोर्ब्स इंडिया च्या सेलिब्रिटी १०० लिस्ट मध्ये आहे (#96 in 2012, #93 in 2013, #33 in 2014, #27 in 2015, #11 in 2016, #18 in 2017). फोर्ब्स इंडिया नुसार त्याचे नेट वर्थ १४५ कोटी रुपये आहे! मागच्या वर्षीची कमाई रू. ४०-५० कोटी!

मराठीत टीव्ही वर त्याच धर्तीवर “चला हवा येऊ द्या” हा शो होतो. जे लोकं दोन्ही शो बघायचे त्यांना जाणवले असेल की दर्जाच्या बाबतीत (creativity, quality of humor decency etc) मराठी शो खूपच चांगला होता, “द कपिल शर्मा शो पेक्षा”. त्या शो ची लोकप्रियता इतकी होती की शाहरुख, आमीर, अक्षय सारखे अनेक हिंदी स्टार त्यांच्या हिंदी चित्रपटाच्या प्रमोशन करता “चला हवा येऊ द्या” ला येऊन गेले.

पण तसे असूनही त्या शो च्या कलाकारांना आणि मुख्यतः “डॉ निलेश साबळे” यांना (शो चे अँकर – “कपिल शर्मा” चे equivalent) त्यांना इतका मोठा आर्थिक फायदा नक्कीच मिळाला नाही.  ह्याचं मुख्य कारण म्हणजे मराठी टीव्ही माध्यम अजूनही हिंदी च्या तुलनेत फार छोटं आहे. एकूण उलाढाल आणि प्रेक्षकसंख्या इ. हिंदी टीव्ही च्या जवळपासही नाहीये. त्यामुळे मराठीतला “तुफान लोकप्रिय” सुद्धा कमाईच्या बाबतीत किंवा बजेटच्या बाबतीत हिंदीशी बरोबरी करू शकत नाही.

तीच गोष्ट बॉलिवूड आणि हॉलिवूड च्या बाबतीत. ह्या वर्षीची फोर्ब्स इंडिया ची लिस्ट बघा.

img_6903

अक्षयकुमार, विराट कोहली यांची कमाई साधारण रु. १०० कोटी च्या आसपास आहे.

त्याच मॅगझीन मध्ये काही इंटरनॅशनल यंग सेलिब्रिटी बद्दल पण माहिती आहे. त्यातलेच एक नाव “प्लेबॉय कार्टी”, वय २१ 🙂

img_6902

त्या “कार्टी” ची (किंवा कार्ट्याची!) मागच्या वर्षीची कमाई होती $14.5 million, म्हणजे सुमारे रु. ९६ कोटी! आणि तो Top 200 सेलिब्रिटी लिस्ट मध्ये पण नाहीये. म्हणजेच हॉलिवूड चा “Arena” हिंदी/भारतीय “Arena” च्या कित्येक पट आहे, त्यामुळे तिथल्या दुय्यम/ तिय्यम दर्जाच्या कलाकाराची कमाईदेखील हिंदीमधल्या टॉप कलाकारांच्या तोडीची किंवा जास्तच असते.

So just by being part of a huge “Arena” you can possibly make far more money, create far bigger impact.

ह्याचं दुसरं आणि खूप बोलकं उदाहरण म्हणजे आमीर खानच्या “दंगल” ह्या चित्रपटाचं. हिंदी मधील प्रचंड गाजलेल्या आणि यशस्वी चित्रपटांची झेप तोवर रु. २००-३०० कोटी इतकीच होती (आणि ते सगळे आमीर किंवा सलमान खान यांचेच चित्रपट होते). रु. २००-३०० ही भारतातली कमाई. परदेशातली साधारण रु. १००-१२५ कोटी. कारण परदेशात भारतीय चित्रपटांचं मार्केट कमी आहे… किंवा तसा समज होता…

दंगलनी ह्या पलीकडे झेप घेऊन भारतात रु. ५११ कोटी आणि परदेशात रु. २०५ कोटी इतकी कमाई केली! पण खरी गंमत (“Arena” ची) पुढेच आहे. आजपर्यंत परदेशातले भारतीय चित्रपटांचे मार्केट म्हणजे “परदेशी स्थायिक असलेले भारतीय” असाच समज होता. भारतीय sensibility चे चित्रपट संपूर्ण जगाला मोठ्या प्रमाणात आवडू शकतील असं कोणालाही वाटत नव्हतं. थोड्या फार प्रमाणात परदेशी लोकांना काही प्रकारचे भारतीय चित्रपट आवडायचे (आवरा रशिया मध्ये प्रचंड लोकप्रिय होता. मिथुन चा डान्स डान्स आणि भप्पी लाहिरीची गाणी सोव्हिएट रशिया प्रांतात प्रचंड लोकप्रिय होती. माझा MBA चा एक क्लासमेट Georgia मधला होता आणि एक Azerbaijan मधला. दोघांनाही “कोई यहा नाचे नाचे” आणि “I am a Disco Dancer” छाप गाणी पाठ होती!). पण परदेशात मोठ्या प्रमाणावर भारतीय चित्रपट अजूनही पाहिले जात नाहीत.

आणि याच पार्श्वभूमीवर “दंगल” चीन मध्ये प्रदर्शित झाला आणि प्रचंड लोकप्रिय झाला. इतका की फक्त चीनमधील कमाई रु. १००० कोटी पेक्षा जास्त झाली (काही रिपोर्टनुसार रु. १४०० कोटी) !

dangal-chinese-images-photos-poster.jpg

याला म्हणतात “Arena” चा impact. The same film could barely cross Rs. 500 Crore in Indian market (at home). And it managed twice that in a completely new and unexplored market, mainly because of currency difference and equally big market (population).

दंगल ची कथा, त्याची सेन्सिबिलिटी युनिव्हर्सल (वैश्विक) आहे हे मुख्य कारण आहेच, पण तशा प्रकारचे चित्रपट आधीही होते. किंवा भारतात ना चाललेला चित्रपट कदाचित चीन किंवा इतर unexplored मार्केटमध्ये खूप चालला असता. पण तसा कोणी प्रयत्नच केला नव्हता. सर्व भारतीय फिल्ममेकर हे आपल्याच छोट्या “Arena” मध्ये खेळत होते.

दंगल च्या चीनमधील यशाचा परिणाम किती होता याचा अंदाज यासंदर्भातली एक बातमी नुकतीच वाचली तेव्हा आला.

“दंगल”वाल्या आमीर खानचा “सिक्रेट सुपरस्टार” हा चित्रपट चीनमध्ये नुकताच प्रदर्शित झाला. भारतात यथातथाच चाललेला हा चित्रपट (म्हणजे साधारण रु. ५०-७० कोटी), चीन मध्ये पहिल्या क्रमांकावर गेला. पहिल्या तीन दिवसातली त्याची कमाई रु. १७५ कोटी झाली!

1516371632-Secret_Superstar_China_BO

ह्या यशानंतर आमीर खान त्याचे पूर्वीचे काही चित्रपट “लगान” आणि “तारे जमीन पर” हे चीनमध्ये प्रदर्शित करणार असे वाचले. चीनच्या लोकांना आवडतील असे जुने चित्रपट तिथे पोचले तर अजूनही ते प्रचंड कमाई करू शकतात.

म्हणजे ह्या यशामुळे भारतीय चित्रपटांना एक नवीन (आणि प्रचंड) मार्केट मिळाले आहे. Arena has just got bigger and richer!

मला strategy या विषयाच्या दृष्टीकोनातून हा धडा खूप महत्वाचा वाटतो. बर्गर हे आपल्या वाडा-पाव सारखं फास्ट-फूड. पण ते त्यांनी World Arena मध्ये नेलं. आणि तो इतका मोठा व्यवसाय झाला की एकट्या McDonald’s ची जगभरात ३६,००० outlets आहेत आणि तिथे रोज ७ कोटी लोकं जातात. एकट्या McDonald’s चा वर्षाचा रेव्हेन्यू $२५ बिलियन (सुमारे रु. १,६५,००० कोटी , किंवा इन्फोसिस च्या २-२.२५ पट आहे). बाकी बर्गर किंग वगैरे वेगळेच.

मग आपण वाडा-पाव किंवा पुणेरी मिसळ World Arena मध्ये नेऊ शकतो का? कुणी सांगावं एखाद्या चीन, रशिया, आफ्रिका सारख्या देशात मिसळ इतकी लोकप्रिय होईल की मराठी मिसळवाले अब्जाधीश होतील!

नम्र सूचना वजा आदेश: हा ब्लॉग वाचून कोणी तसे अब्जाधीश झालेच तर निदान मला कल्पना सुचवल्याबद्दल रु. ११ दक्षिणा (आणि जन्मभर मिसळीचा रतीब) द्या!

 

 

 

 

बोधकथा…

मला आयुष्यात मिळालेले वक्त्रुत्व स्पर्धेतले एकमेव बक्षीस ह्या गोष्टीमुळे मिळाले. (इयत्ता ६ वी मधे. तेही ३ रे बक्षीस). तेही वक्त्रुत्व गुणांपेक्षा ह्या गोष्तीतील भाबडेपणाला मिळाले असावे.

६ वी चे वर्ष माझ्यासाठी विशेष संस्मरणीय होते कारण मला हस्ताक्षर स्पर्धेत पहिले, चित्रकलेत दुसरे तर कथाकथनात तिसरे बक्षीस मिळाले होते.

असो. स्वतःचे कौतुक पुष्कळ झाले. आता गोष्ट सांगतो…
————————————————————————————————————
आटपाट नगर होते. तिथे एक राजा राज्य करत होता. त्याने आजूबाजूची लहान मोठी राज्ये जिंकून आपल्या राज्याचा विस्तार केला होता.

राज्याच्या तिजोरीत भरपूर खजिना आणि धान्यकोठारात भरपूर धान्य होते. एकूणच राज्यकारभार चांगला चालला होता. पण तरीही राजाला मन:स्वास्थ्य नव्हते.

आपण कुठे तरी अपुरे पडत आहोत असे त्याला वाटायचे.

एके रात्री तो असाच वेष बदलून राज्यात फेरफटका मारायला निघाला. जाता जाता त्याला एक झोपडी दिसली. त्या झोपडीतून त्याला गाणे गुणगुणण्याचा आणि काम करत असल्याचा आवाज ऐकु आला. इतक्या रात्री कोणी तरी तरी काम करत आहे हे पाहून राजाची उत्सुकता चाळवली गेली. तो झोपडीपाशी गेला आणि आत डोकावून पाहू लागला.

आत एक लोहार आपले काम करत होता. राजाला बघताच तो काम करायचे थांबला. त्याने राजाला ओळखले नाही पण तरीही कोणी एक वाटसरु आपल्या दाराशी आला हे पाहून त्याने राजाला बसायला पाट पुढे केला आणि प्यायला पाणी दिले. तो काम करुन दमल्याचे त्याचा चेहरा स्पष्टपणे दाखवत होता पण तरीही तो आनंदी आणि समाधानी वाटत होता.

इकडचे तिकडचे प्रश्न न विचारता राजाने त्याला थेट प्रश्न विचारला, “तुम्ही खूप आनंदी दिसता. ह्याचे कारण काय?” लोहार म्हणाला, “असेलही कदाचीत. ह्याच्याबद्दल विचार करायला मला कधी वेळच मिळाला नाही.” त्याच्या इतक्या बेफ़िकिर आणि निर्विकार पणाचे राजाला खूप वैषम्य वाटले. तो म्हणाला, “नक्कीच तुम्ही खूप पैसे मिळवत असणार, खूप नावलौकीक कमावत असणार. अगदीच काही नाही तर निदान देवपूजा आणि दानधर्म तरी भरपूर करत असणार.” लोहार उत्तरला, “भल्या माणसा, तू आत्ता जाणीव करून दिलीस तेव्हा मला जाणवले की मी ह्यातले काहीच करत नाही. खर सांगायचे तर हे सगळे करण्यासाठी माझ्याकडे वेळ आणि पैसा दोन्ही नाही. पूर्ण दिवस मी राब-राब राबतो आणि मिळेल तो सगळा पैसा खर्च करतो. मग मी हे सर्व कधी आणि कुठल्या पैशानी करणार?”

राजा चक्रावला. त्याने विचारले, “म्हणजे. तू मिळवतोस किती आणि त्या पैशाचे तू करतोस तरी काय?”

लोहार म्हणाला, “मी जे काही मिळवतो त्याचे ४ भाग करतो. एक भाग स्वत: खातो, एक भाग कर्ज फेडतो, एक भाग उधार देतो आणि एक भाग नदीत फेकतो. बस्स.”

राजा उतावळे पणाने म्हणला, “अरे बाबा असे कोड्यात बोलू नकोस. नीट स्पष्टपणे सांग याचा अर्थ.”

लोहार म्हणला, “मी एक भाग खातो म्हणजे एक भाग स्वत: वर, माझ्या पत्नीवर खर्च करतो.

एक भाग कर्ज फेडतो म्हणजे तो भाग माझ्या आई-वडिलांवर खर्च करतो आणि त्यांचे उपकार माझ्या परीने फेडण्याचा प्रयत्न करतो.

एक भाग उधार देतो म्हणजे माझ्या मुलावर खर्च करतो. म्हातारपणी तो माझी काळजी घेईल हीच त्या मागची स्वार्थी भावना आहे.

आणि राहिलेला शेवटचा भाग मी नदीत फेकतो. म्हणजे माझ्या मुलीवर खर्च करतो. आज ना उद्या ती सासरी जाणार. तोवर तिला सांभाळणे हे माझे कर्तव्य आहे. त्यानंतर माझ्या तिच्याकडून कसल्याही अपेक्षा नाहीत. हे सगळे करता करता आपण म्हणालात त्या गोष्टींचा विचार करायला मला वेळच मिळत नाही”

राजा काय समजायचे ते समजला. तो तिथून उठला आणि निमूटपणे निघून गेला.

मन:शांती मिळावी म्हणून काय करावे असा प्रश्न आता त्याला पडला नव्हता.

Currency आणि Cryptocurrency

सध्या बिटकॉइन खूप गाजत आहे. त्यावरून बिटकॉइन सारख्या Cryptocurrency बद्दल माझी अनेकांशी बरेचदा चर्चा होते. काही लोकांनी त्यात थोडे फार पैसे कमावले आहेत, किंवा कमवायची इच्छा आहे. तर काहींना ती खूप दूरगामी परिणाम करणारी गोष्ट वाटते. उदा: २०४० पर्यंत सगळे व्यवहार फक्त बिटकॉइन नी च होणार, नाही झाले तर नाव बदलेन… (स्वतःचे का बिटकॉइन चे ते सांगायचं सोयीस्करपणे टाळतात)

माझं अगदी स्पष्ट आणि थोडक्यात सांगायचं तर बिटकॉइन (or any cryptocurrency) हा at best एक bubble (फुगा) आहे, आणि at worst खूप मोठी फसवणूक (like a Ponzi scheme) आहे.

का ते सांगतो. पण त्याआधी Currency आणि Cryptocurrency याबद्दल थोडंसं…

प्रथम पैसा या संकल्पनेबद्दल.

There are three basic functions of money. Money serves as a medium of exchange, as a store of value, and as a unit of account.

Medium of exchange: Money can be used for buying and selling goods and services.

पैशाचा उपयोग खरेदी-विक्री साठी केला जातो. पूर्वी barter system होती तेव्हा (उदाहरणार्थ) काही लोकं एक डझन चिक्कू देऊन त्याबदल्यात एक किलो तांदूळ घेत असतील, तेच काही लोक त्याबदल्यात ३ किलो तांदूळ मागत असतील. म्हणून common base/denominator या अर्थानी पैशाचा वापर उपयुक्त ठरला. “Price” of everything could be expressed in a common base called Money.

Unit of account: Money is the common standard for measuring relative worth of goods and service.

पैसा ही कल्पना वस्तू आणि सेवांचे “मूल्य” मोजायला उपयोगी पडते. Unit of account म्हणजे जसे किलोग्रॅम, किंवा लिटर, डिग्री सेल्सिअस हे वस्तूंचे  भौतिक गुणधर्म “मोजायला” वापरतात, तसं पैसा हे मूल्य “मोजायला” वापरतात.

Store of value: Money’s value can be retained over time. It is a convenient way to store wealth.

१९७५ मधील रु. १०० याची “किंमत” आज किती आहे? तर रु. १००. त्या अर्थाने पैसा हा किंमत साठवतो. आता आज त्या १०० रुपयात काय विकत घेता येईल आणि १९७५ मध्ये काय विकत घेता येत होते यात जमीन-अस्मानाचा फरक आहे! पण याचा अर्थ बाकीच्या वस्तूंच्या किंमतीत फरक पडला आहे (त्यांचे “मूल्य” बदलले आहे), पण १०० रु. हे आजही १०० रु. च आहेत (जर का ती currency note चलनात असेल तर).

ह्यात एक गमतीदार मुद्दा समजावून घेतला पाहिजे. कोणत्याही नोटेवर “मै धारक को XXX रुपये अदा करने का वचन देता हूं” असं लिहिलेलं असतं. त्याचा अर्थ काय?

त्याचा अर्थ इतकाच आहे, की तुम्हाला ती नोट बदलून त्याच किमतीची दूसरी नोट दिली  जाईल (उदा: १०० च्या एका नोटेऐवजी १०० ची दुसरी नोट), किंवा त्याच “मूल्याच्या” रकमेइतक्या दुसऱ्या नोटा दिल्या जातील. (उदा: १०० च्या एका नोटेऐवजी १० च्या १० नोटा, किंवा २० च्या ५ नोटा). जर तुम्ही म्हणालात की मला १०० च्या नोटेऐवजी २ किलो बटाटे पाहिजेत किंवा १ किलो तांदूळ पाहिजे तर ते रिझर्व्ह बँक करणार नाही. इतकंच काय तर १०० रु. च्या नोटेऐवजी १ अमेरिकन डॉलर द्यायचे “वचन” ही रिझर्व्ह बँक देत नाही. म्हणजे रिझर्व्ह बँक फक्त इतकेच “वचन” देते की ह्या नोटा बाजारात खेळत राहतील (Currency in circulation).

आणि ही साधी गोष्ट नाही कारण त्यामागे रिझर्व्ह बँक आणि त्या प्रदेशाचे सरकार यांच्यावरील बाजाराची निष्ठा असते, म्हणून तो कागदाचा तुकडा “चलन” म्हणून वापरला जातो. पूर्वी हि “निष्ठा” खऱ्या सोन्याच्या साठ्यांच्या स्वरूपात असायची. (म्हणजे जेवढे सोने त्या प्रमाणातच चलन). आता सगळ्यांनीच “Gold standard” सोडून दिले आहे त्यामुळे खरोखरीच “नोटा छापणारे सरकार” यांच्या निष्ठेवर हा खेळ चालू असतो.

खेळ अशासाठी म्हणालो की “व्यापार” या खेळाचे किंवा माझ्या आवडत्या बुद्धिबळाचे आणि कॅरॅमचे उदाहरण देऊन तो मुद्दा सांगता येईल.

व्यापार ह्या खेळात खोट्या नोटा आणि नाणी असतात, आणि खेळणारे सगळे जण ती खरी आहेत असं मानून खेळतात. समजा त्यातली एखादी नोट फाटली, तर काय करता येईल? एका कागदाच्या तुकड्यावर नोटेची किंमत लिहून ती खेळात “खरी” नोट म्हणून वापरायची. हे केंव्हा जमून जाईल? जेव्हा खेळातल्या सगळ्यांनी ती “खोटी” नोट स्वीकारली तर… पण एखाद्याने ती स्वीकारायला नकार दिला तर? म्हणजे त्याची “paper currency” वरची निष्ठा संपली तर? तर ती नोट चलनातून बाद होईल, कवडीमोलाची ठरेल.

अजून एक उदाहरण, बुद्धिबळाचे. बुद्धिबळातील एखादा पीस (सोंगटी म्हणणे अगदीच जीवावर येते), समजा हत्ती हरवला, तर आम्ही त्या जागी एखादे खोडरबर किंवा तशी वस्तू ठेवायचो. जोपर्यंत खेळणाऱ्या दोघांना ती वस्तू हत्ती आहे, आणि हत्ती सारखी चालेल हे मान्य असेल (Rules of the game are acceptable to both players), तोपर्यंत खोडरबर वापरूनही खेळ पुढे चालू शकेल. तसंच Currency चं आहे. ती वापरणाऱ्या बाजारातल्या घटकांची (market participants) नोटा छापणाऱ्या संस्थेवर (Central Bank backed by Sovereign Government) विश्वास पाहिजे.

Currency ही त्या अर्थाने “fungible” आहे असं म्हणतात. म्हणजे mutually interchangeable.

आता असा विचार करा. की कॅरॅम खेळताना एखादी सोंगटी हरवली. तर आपण त्या जागी एखादे खोडरबर घेऊन – “ह्यालाच सोंगटी मानू” असा म्हणून खेळ पुढे चालू करू शकतो का? तर नाही. फक्त खेळणाऱ्या लोकांची चलनावर “निष्ठा” असून उपयोग नाही तर खेळासाठी त्या गोष्टीची उपयुक्तता पण असली पाहिजे. बुद्धिबळात खोडरबर चा हत्ती वापरून खेळ पुढे चालू करता येईल, पण कॅरॅम मध्ये ते शक्य नाही.

आता Cryptocurrency कडे वळूया. उदाहरणार्थ – बिटकॉइन. Cryptocurrency ही कोणाच्या “निष्ठे”वर आधारीत आहे? (जसे रुपया ही रिझर्व्ह बँक / भारत सरकार यांच्या निष्ठेवर अवलंबून आहे) तर माहिती नाही. Cryptocurrency ही बाजारातल्या सगळ्या लोकांना खरेदी विक्री साठी मान्य आहे का? तर अजिबात नाही. एकाही देशाच्या सरकारनी ती पूर्णपणे मान्य केलेली नाही.

अजून एक मुद्दा speculative asset चा. समजा मी भारतीय आहे आणि मी कधीही जपान मध्ये जाणार नाही किंवा जापनीज येन या त्यांच्या चलनात काही खरेदी करणार नाही, तर मला रुपये देऊन जापनीज येन घ्यायची गरज आहे का? तर नाही. पण तरीही मी ते speculation म्हणून करू शकतो. का? कारण कोणी तरी इतर लोकं जापनीज येन हे प्रत्यक्ष वापरत आहेत.

बिटकॉइन हे त्या अर्थाने प्रत्यक्ष चलन म्हणून तेवढ्या सर्रास वापरले जात नाही. आणि ते पुरवणारी व्यक्ती, संस्था याबद्दल ही कोणाला फारशी माहिती नाही.

थोडक्यात, सध्याच्या परिस्थितीत बिटकॉइन हा एक सट्टा आहे, जुगार…

त्यातला technology हा भाग काढून टाकला तर ते “Sodexo coupon” किंवा “Travelers’ cheques” किंवा इतर अनेक खाद्यपदार्थांच्या जागी वापरले जाणारे “टोकन” असेच त्याचे स्वरूप आहे. आणि तीच त्याची उपयुक्तता (utility) पण आहे. मग किती जण “Sodexocoupon” मध्ये trading करतात? किती जण १०० रु. चे “sodexo coupon” ३०० रु. ला घेतील आणि म्हणतील की कोणीतरी हेच कूपन माझ्याकडून ६०० रु. ला घेईल.

शेवटचा मुद्दा (मघाशी काढून टाकलेल्या) Technology या भागाचा. बिटकॉइन Blockchain या technology वर आधारीत आहे. त्या technology चे बरेच फायदे, उपयोग असू शकतात. आहेतच. अगदी finance मध्ये सुद्धा खूप ठिकाणी वापरता येईल. कदाचित त्या दिशेने याचा प्रवास होईल. पण बिटकॉइन हे “sophisticated Sodexo coupon” या अर्थाने जसे आत्ता आहे त्या अर्थाने निरुपयोगी आहे. सध्या बिटकॉइन किंवा इतर क्रिप्टो-करन्सी जोरात आहेत त्याचं कारण तेच – जे financial market history मधल्या बहुतेक scams आणि bubble चे कारण होते/असते – Greed and Stupidity.

जीडीपी, विकासदर आणि “विकास-निर्देशांक”

भारताचे जीडीपी (Gross domestic product or GDP) वाढीचा चा अंदाज नुकताच प्रसिद्ध झाला. आर्थिक वर्ष २०१७-१८ साठी तो कमी करून ६.५% इतका असेल. हा आकडा नवीन मोजणीपद्धती प्रमाणे  आहे, जी २०११-१२ च्या सुमारास लागू झाली. जुन्या पद्धतीप्रमाणे हाच आकडा अजून कमी असता – कदाचित ४.५-५%.
जीडीपी बद्दल एक सुंदर लेख नुकताच वाचनात आला. जीडीपी हा निकष बदलण्याची का गरज आहे याबद्दलचा हा लेख फायनान्शिअल टाईम्स वृत्तपत्रात ५-जानेवारी-२०१८ ला प्रसिद्ध झाला, जो आपण  इथे वाचू शकता. (“Why it is time to change the way we measure the wealth of nations”)
GDP is a measure of activity. जीडीपी हा कृतिशीलता मोजतो. GDP doesn’t focus on utility/effectiveness of what is being produced. जे उत्पादन झाले आहे त्याची उपयुक्तता विचारात घेतली जात नाही. तर फक्त ते उत्पादन करण्यात जे श्रम खर्च झाले, त्याच्या किमतीनुसार जीडीपी मोजले जाते.
पण १९३० मध्ये जेव्हा जीडीपी हे प्रमाण म्हणून वापरले जाऊ लागले तेव्हा त्याचा उद्देश हा महामंदीच्या काळात प्रत्यक्ष मोजता येण्यासारख्या गोष्टींची उलाढाल किती कमी झाली आहे हे मोजणे हा होता. म्हणजेच जीडीपी हे “उत्पादन” (Manufacturing) केंद्रीत होते. “सेवा” (Services) हा त्या काळी अर्थव्यवस्थेचा महत्वाचा  घटक नसल्याने त्याला फारसे महत्व दिले गेले नव्हते. आणि त्यानंतरही जीडीपी मध्ये “सेवा” घटक योग्य प्रकारे मोजण्याची शास्त्रीय पद्धती आली नाही.
भारतासारखे आज असे अनेक देश आहेत की ज्यांच्या अर्थव्यवस्थेत “सेवा” हा “उत्पादन” पेक्षा मोठा घटक आहे. त्यामुळे जीडीपी मोजणी पद्धतीत सुधार करून “सेवा” योग्य प्रकारे मोजता याव्यात याबद्दल अनेक वर्षे चर्चा चालू आहे.
परंतु यात एक  महत्वाचा मुद्दा लक्षात घेतला पाहिजे –  तो म्हणजे “पायाभूत” सुविधा निर्माण करण्याचा. जीडीपी फक्त activity मोजत असल्यामुळे त्याचा उपयोग “पायाभूत” सुविधा निर्माण होण्यात केला जातोय का याकडे दुर्लक्ष होते. आणि त्याचे दूरगामी परिणाम फार भयानक असू शकतात.
म्हणजे एक अतिशयोक्तीपूर्ण उदाहरण द्यायचे तर…
समजा एक प्रांत आहे जिथे दोनच माणसे आहेत. एक जण पूजापाठ सांगणे (सत्यनारायण वगैरे), कीर्तन-प्रवचन करणे असे काम करतो. आणि दुसरा माणूस तेलमालीश करणे, पाय/अंग चेपून देणे वगैरे करतो. थोडक्यात दोघेही फक्त “सेवा” पुरवतात, “उत्पादन” काही नाही. त्यांच्या खाण्यापिण्याची, राहण्याची सोय निसर्गांत असलेल्या साधनसंपत्ती मध्ये होते असे समजा.
आता त्या दोघांनी एकमेकांना आपापल्या सेवा पुरवल्या आणि त्याला काही तरी मूल्य लावले तर त्यातून जीडीपी निर्माण होईल. समाज एकाने एका दिवशी रु. २०० चे प्रवचन केले. आणि दुसर्याने रु. २०० ची मालिश केली तर जीडीपी मोजण्याच्या पद्धतीप्रमाणे त्या प्रांताचे जीडीपी रस. ४०० इतके झाले. पण यात पायाभूत असे काय निर्माण झाले? उदाहरणार्थ घर, पूल, शाळा, धरणे असे काही बांधले गेले का? तर नाही. सेवा या “गिळंकृत” होतात. हे “Services are consumed” चे शब्दशः भाषांतर वाटेल पण खरोखरीच सेवा या पुरवल्या की संपतात. नवनिर्मिती होत नाही.
जीडीपी मधून लांबपल्ल्याचं आणि देश उभारणी करणारं काहीतरी हवं असेल तर फक्त सेवा पुरवून उपयोग नाही.
आता याच प्रांतात अजून दोन लोकं  आली. एक शेती करणारा, आणि एक वास्तू-निर्मिती करणारा. आणि त्या चौघात आपापल्या सेवा आणि उत्पादन यांचे देवाणघेवाण होऊन जे होईल त्यामुळे जीडीपी तर वाढेलच पण त्याबरोबर दूरगामी अश्या पायाभूत सुविधा देखील निर्माण होतील.
त्या अर्थाने जीडीपी हे “सेवा” प्रकारांना तेवढे महत्व देत नाही हे एका अर्थी बरोबर आहे.
भारताचा विचार केला तर आपली अर्थव्यवस्था “सेवा”केंद्रीत आहे हे खरंय. पण उत्पादनाच्या बाबतीतही आपण केवळ जोडणी (Assembly) किंवा दुसऱ्या देशांसाठी उत्पादन पुरवठा (Manufacturing Export) किती करतो आणि आपल्या देशात पायाभूत सुविधा निर्माण करायला (Public or Private Infrastructure development) किती करतो हे महत्वाचं आहे.
परंतु लोकं जीडीपी किंवा तत्सम अर्थकारणातल्या कल्पना समजावून ना घेता केवळ विकासदर ५% चा ८%-१०% झाला किंवा ८-१०% चा ६.५% झाला यावरच भर देतात आणि वायफळ टीका, राजकारण करत बसतात.
अजून एक महत्वाचा फरक हा “विकासदर” आणि “विकास-निर्देशांक” हा आहे. विकास-निर्देशांक म्हणजे साधारणपणे तुम्ही “विकसित” (Developed) आहात, का “विकसनशील” (“Developing” आहात का “अविकसित” (“Underdeveloped” – पण आजकाल असा शब्द कोणी वापरात नाही. “Emerging” किंवा “resource rich” वगैरे गोंडस नाव देतात).
“विकासदर” आणि “विकास-निर्देशांक” यातला फरक साध्या उदाहरणातून द्यायचा तर एक वडील (५२-५५ वर्षांचे) आणि मुलगा (२३-२५ वर्षांचा) यांचे उदाहरण घेऊ. समजा दोघंही सध्या नोकरी करतात –
वडिलांचा पगार मुलांपेक्षा बराच जास्त असणार, पण मुलाची पगारवाढ (% मध्ये) वडिलांपेक्षा खूप जास्त असणार. त्याचे कारण मुलाचा कमी पगार (Low base effect) आणि त्याचा Growth Period. वडिलांचा पगार stagnant असेल परंतु केवळ मूल्याचा विचार केला तर मुलापेक्षा खूप जास्त असेल.
हा एक भाग झाला. पण “संपत्ती” या दृष्टीने विचार केला तर? वडिलांकडे असलेली २५-३० वर्षे नोकरी करून साठवलेली संपत्ती ही मुलाच्या २-३ वर्षे नोकरी करून साठवलेल्या संपत्तीपेक्षा खूप जास्त असणार, किंवा असली पाहिजे.
जीडीपी चे पण असेच आहे. इथे वडील हे अमेरिका आहे, आणि मुलगा हा भारत आहे असे समजा. मुलाचा विकासदर जास्त असेल (८-९%), आणि वडिलांचा विकासदर कमी (१-२%). पण मुळात वडिलांचा पगार (Absolute value of US GDP = $15-16 Trillion) ही मुलाच्या पगारापेक्षा (Absolute value of India GDP = $2 Trillion) खूप जास्त आहे. हा एक भाग.
पण त्याहून महत्वाचे म्हणजे वडिलांनी जी पायाभूत गुंतवणूक गेल्या २००-२५० वर्षात करून ठेवली आहे – रस्ते, धरणे, लोहमार्ग, विमानमार्ग, हॉस्पिटल्स, शाळा, विद्यापीठे इत्यादी. चे विस्तृत जाळे – ते (आणि त्या दर्जाचे) तयार करणे ह्या बाबतीत मुलगा फारच मागे आहे याची जाणीव हवी.
दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे मुलगा फक्त मागे आहे (कारण त्याची सुरुवातच खूप उशिरा झाली) परंतु आता त्या वाटेवर भरधाव वेगाने  (High growth rate) जातोय अशी परिस्थिती आहे, का मुलगा भरधाव वेगाने धावतोय (Growth rate is high) पण तो पायाभूत क्षेत्रात नाही तर केवळ “गिळंकृत” करायच्या सेवा क्षेत्रात ते समजले पाहिजे. म्हणजे वेग आहे, पण दिशा चुकली आहे?
आणि म्हणूनच “मेक इन इंडिया”, किंवा इतर Public Infrastructure initiatives राबवणे ही खूप चांगली गोष्ट आहे.
पण शेवटचा प्रश्न हा आहे, की आपली शिक्षण पद्धती त्याप्रकारचे शिक्षण देते आहे का? का अजूनही आपले शिक्षण क्षेत्र हे “सेवा” पुरवणारे कळप निर्माण करतंय?

Good Youtube Channel for Indian Classical Music Enthusiasts

अनुजा कामत ही झी सारेगमप मध्ये एक स्पर्धक होती. त्यानंतर तिने संगीत शिक्षण चालू ठेवून नंतर युट्युब चॅनेल चालू केला.
तिचा “एकच गाणे पण वेगवेगळ्या रागात” हा व्हिडिओ मी नुकताच योगायोगानेच पाहिला.
त्यापूर्वी बरीच वर्षे माझा गाण्यातला रस कमी झाला होता (३-४ वर्षे तरी). पण ह्या व्हिडिओ नंतर मी तिथले बाकीचे व्हिडिओ पण पाहीले आणि मला तिचा उपक्रम आवडला!
भारतीय शास्रीय संगीताबद्दल माहिती देणारा एक उपक्रम तिने  केला आहे.
माझ्यासारख्या संगीत न शिकलेल्या पण संगीताची खूप आवड असलेल्या व्यक्तीसाठी खूपच उपयुक्त आहे.
त्यामुळे मी परत संगीताकडे वळलो असे म्हणायला हरकत नाही…

Anuja Kamat was a participant in Zee TV’s SaReGaMaPa. She later continued her musical training and went on to create a Youtube channel.

I recently discovered the channel when I stumbled upon a video by her reciting the same song in many different Ragas! That got me very interested. Before I watched this my interest in music had faded for few years (don’t ask why…very personal). But after this video I watched another initiative on her channel about Basics of Indian Classical Music.

For someone like me who is not trained in music but is a music lover, this initiative means a lot!

My love for music was rekindled!


Create a free website or blog at WordPress.com.

Up ↑