[Marathi] The Life and Legacy of Dr. R. G. Bhandarkar

Dr. R. G. भांडारकर यांच्या निधनाला नुकतीच म्हणजे २४ ऑगस्ट २०२५ ला १०० वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेच्या Dr. प्रदीप आपटे यांनी Dr. गौरी मोघे यांनी घेतलेली मुलाखत नक्की बघा.  https://www.youtube.com/watch?v=Mek_oIYHyjs

आयुष्यावर बोलू काही: २२ वर्षे

आयुष्यावर बोलू काही ला २२ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल अमुक तमुक या पॉडकास्टवर सलील कुलकर्णी आणि संदीप खरे यांचा २ तासांची मुलाखत नुकतीच प्रदर्शित झाली.  सलील कुलकर्णी हा आगाऊ असला तरी विचारी आणि ओरिजिनल आहे. संदीप खरे मला आवडतो.  त्यामुळे हा पॉडकास्ट मला बघायचा आहे. सुरु केलाय, आणि सुरुवात तरी चांगली वाटली  https://www.youtube.com/watch?v=Q8knkYb5lZA

“त्याच्यामध्येच मी शांत होते…”  संवाद : प्रतिभा रानडे, दीपाली दातार

प्रतिभा रानडे. वय 88. अद्याप तल्लख मन असलेली मराठीमधील अत्यंत महत्वाची लेखिका. आणि या अशा  'प्रतिभेचा पैस' संवादाच्या रूपात नेटकेपणे पुस्तकबद्ध करणाऱ्या दीपाली दातार. या दोघींशी लेखक, समीक्षक डॉ. आशुतोष जावडेकर यांनी साधलेला सहज संवाद म्हणजे बुक ब्रो एपिसोड 83 https://www.youtube.com/watch?v=EnLIHJ0DE9w

सा व नीः नवीन मराठी पॅाडकास्ट

गायिका सावनी रवींद्र हिने "सा व नी" नावाचा नवीन मराठी पॅाडकास्ट सुरू केला आहे. पहिलाच भाग राहुल देशपांडे बरोबर आहे. हा भाग तरी चांगला वाटला. आता पुढील भागात असेच दर्जेदार गेस्ट आले तर subscribe करेन. https://youtu.be/JEO3405QONU?si=-r0Pi1Nnl2Wsouhb

व्हायफळ वर वैदेही

मला लहानपणी (म्हणजे १९८०-९० च्या दशकात) मराठी चित्रपट सृष्टीतले हिरो/चरित्र कलाकार जास्त आवडायचे - अशोक सराफ सर्वात जास्त. तसेच दिलीप प्रभावळकर आणि श्रीराम लागू सुद्धा. सचिन, लक्ष्मीकांत बेर्डे वगैरे कधीकधी, सरसकट नाही. अभिनेत्री तशा कमी आवडायच्या...हिंदी चित्रपट सृष्टीमधल्याच जास्त आवडायच्या. पण तरीही मराठी मधल्या किशोरी शहाणे आणि थोड्या प्रमाणात वर्षा उसगांवकर आवडायच्या. त्यानंतरच्या काळात म्हणजे... Continue Reading →

भाडीपा पॉडकास्ट: “मुलांना जन्म द्यायचा का?”

​भाडीपा हा  मराठी मधल्या त्यातल्या त्यात चांगल्या पॉडकास्ट पैकी एक आहे. त्यांचे कॉमेडी चे विविध प्रकार चांगले असतातच परंतु इतर प्रकारचे contents, म्हणजे मुलाखती, चर्चा, शॉर्ट फिल्म वगैरे, पण चांगले असतात.  ह्या चॅनेलवर नुकतीच "ऐकावं जनाचं करावं मनाचं" ह्या चर्चेच्या सिरीजमध्ये "मुलांना जन्म द्यायचा का?" या शीर्षकाची एक चर्चा झाली. खूप वेग-वेगळ्या पैलूंबद्दल त्यात मते मांडण्यात आली. मते... Continue Reading →

राहुल देशपांडे ची “अमुक तमुक” वरील मुलाखत

नव्या पिढीतल्या, आजच्या मराठी संगीत कलाकारांमध्ये मला राहुल देशपांडे आवडतो. कधी कधी काही काही गोष्टी आवडत नाही...पण एकूण सध्या तरी आवडणाऱ्या गोष्टी खूप जास्त आहेत. सध्या तरी म्हणायचं कारण असं की हल्ली कोणाबद्दलही शाश्वती देता येत नाहीत. त्यामुळे कायम उदो उदो करावेत असे फार कमी लोक आहेत. असो.  अमुक तमुक ह्या पॉडकास्ट चा होस्ट मला आवडत... Continue Reading →

सेक्स एज्युकेशन या विषयावरचा मराठी पॉडकास्ट

मराठी पॉडकास्ट आता हळूहळू रुजत आहेत. गेल्या काही आठवड्यात मी २-३ पॉडकास्ट बद्दल लिहिलं आहे. अजूनही Spotify सारख्या ऍप्स वर मराठी पॉडकास्ट दिसत नाहीत. पण Youtube चॅनेल च्या माध्यमातून मुलाखत या स्वरूपात मराठी पॉडकास्ट सुरु झाले आहेत.  अनेक पॉडकास्ट अजूनही पाचकळ, उथळ, करमणूक स्वरूपाच्या गप्पा यावरच भर देत आहेत. त्यांना मी जमेत धरत नाही. पण... Continue Reading →

भानू काळे यांची थिंक-बँक वरील मुलाखत

भानू काळे हे एक प्रसिद्ध लेखक, संपादक, पत्रकार आणि विचारवंत आहेत. त्यांचे "बदलता भारत" हे पुस्तक मी १५-१६ वर्षांपूर्वी वाचले आणि मला ते खूपच आवडले. जागतिकीकरण आणि त्याचा भारतावर होत असलेला परिणाम यांवर मराठीत फारच कमी पुस्तके, लेखन आहे. भानू काळे यांनी स्वतः भारताच्या विविध भागात हिंडून ह्या विषयावर खूप छान पुस्तक लिहिले! त्यानंतर मी... Continue Reading →

Create a free website or blog at WordPress.com.

Up ↑