कारखानिसांची वारी…

परवा मी कारखानिसांची वारी हा मराठी चित्रपट बघितला. गेले अनेक महिने मला हा चित्रपट बघायचा होता, शेवटी परवा योग आला. मला हा साधा, कलात्मक चित्रपट खूप आवडला म्हणून त्याबद्दल लिहावेसे वाटले. चित्रपटाची कल्पना तशी unique नाहीये. एका एकत्रित कुटुंबातील सगळ्यात ज्येष्ठ भावाचे निधन होते. त्याच्या शेवटच्या इच्छेप्रमाणे त्याच्या अस्थी पंढरपूर ला विसर्जित करण्यासाठी त्यांचे ३... Continue Reading →

पुलं, संघ आणि “समजा, कुणी तुमच्या मुस्काटीत मारली तर…?”

मागच्या रविवारी लोकसत्तात रवींद्र पंढरीनाथ यांचा एक वाचनीय लेख आला होता. शीर्षक होते: "समजा, कोणी तुमच्या थोबाडीत मारली तर?" त्याची मध्यवर्ती कल्पना पु ल देशपांडे यांच्या "समजा, कुणी तुमच्या मुस्काटीत मारली तर...?" या एका पुस्तकातील लेखावरून घेतली आहे. मला वाटतं एका दिवाळी अंकात १९६९ मध्ये प्रसिद्ध झालेला हा लेख नंतर "एक शून्य मी" या त्यांच्या... Continue Reading →

अर्थतज्ञ डॉ. अनिल लांबा यांच्या मुलाखती…

डॉ. अनिल लांबा हे एक सुप्रसिद्ध अर्थतज्ज्ञ आहेत. त्यांचे Romancing The Balance Sheet हे पुस्तक मी खूप पूर्वी, म्हणजे साधारण २००२-२००४ या काळात वाचले होते. त्याच नावाचा त्यांचा एक workshop/seminar ही आहे, पण तो अतिशय महाग आहे (रुपये ५०,००० ते रुपये १ लाख). त्यामानाने रुपये ५००-७०० चे पुस्तक जास्त चांगले असे वाटेल. पण ते पूर्णपणे... Continue Reading →

भारतातल्या वैद्यकीय शिक्षणाचं नग्नसत्यः डॅा. श्रीराम गीत

Youtube वरील थिंक टॅंक या मुलाखतींच्या कार्यक्रमात नुकतीच डॅा. श्रीराम गीत यांची "भारतीतल्या वैद्यकीय शिक्षणाचं नग्नसत्य" अशी थोडीशी प्रक्षोभक शीर्षक असलेली मुलाखत पाहिली. डॅा. गीत यांचे Career Counselling बद्दलचे अनेक लेख मी वृत्तपत्रात वाचले आहेत. पण ते मेडिकल डॅाक्टर देखील आहेत हे मला माहिती नव्हते. उत्सुकतेनी मी पूर्ण मुलाखत ऐकली आणि मला ती फारच आवडली.... Continue Reading →

विनोदः मराठी राज्यभाषा विशेष

सकाळी चहा घेताना कप हातातुन निसटला,पण मी तो पडू दिला नाही,हसत बायकोकडे बघत म्हणालो... "वाचला"😄 बायको म्हणाली "वाचला" नाही… "वाचलात "…!☝️ एकाच शब्दा मधला "त" चा फरकपण दहशत जाणवून गेला !!! 😟 एक महत्वाची सुचनाकणीक मळण्या आधी हात स्वच्छ धुवावेत.......नाहीतर कणीक मळते!!!!🤪 मराठी राजभाषा दिनाच्या हार्दीक शुभेच्छा 🌹

मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने…

आज मराठीतील नामवंत साहित्यिक वि. वा शिरवाडकर (उर्फ कवी कुसुमाग्रज) यांचा जन्मदिवस. हा दिवस राज्य सरकारतर्फे मराठी भषा गौरव दिन अशा नावाने देखील साजरा केला जातो. दरवर्षी या दिवशी त्याच त्या ३-४ मुद्यांचा चावून चोथा केला जातो. पहिलाः मराठी भाषेला अजून अभिजात भाषेची दर्जा का मिळाला नाही, किंवा कधी मिळणार? अभिजात भाषेचा दर्जा (Classical Language)... Continue Reading →

लता मंगेशकर यांच्या काही दुर्मिळ आणि चांगल्या मुलाखती

लता मंगेशकर यांना जाऊन उद्या एक आठवडा होईल. गेल्या ६-७ दिवसात त्यांना श्रद्धांजली वाहणारे, आठवणी जागवणारे अनेक लेख मी वाचले. पण कशानेही समाधान झाले नाही. कारण ते लेख लिहिणारी मंडळी बेताची, सुमार किंवा आत्मप्रौढी मिरवणारी होती. बऱ्याचशा लेखांत स्वतःची टिमकी वाजवणे, किंवा भाराभर गाण्यांची यादी आणि सनावळी देणे किंवा उगाच आचरट उपमा, रूपक, कृत्रिम आणि तकलादू शब्दप्रयोग... Continue Reading →

लता मंगेशकर, पुलं आणि खोगीरभरती

आज सकाळी लोकसत्ता मध्ये नुकत्याच निधन झालेल्या अनिल अवचट यांच्यावरील दोन सुंदर लेख आहेत - एक त्यांचे लहान भाऊ आणि चित्रकार सुभाष अवचट यांचा तर दुसरा डॅा. आनंद नाडकर्णी यांचा. ते वाचून होत असतानाच गानकोकिळा भारतरत्न लता मंगेशकर यांचे निधन झाल्याची बातमी समजली. तशा त्या गेल्या १ महिन्यापासून आजारी होत्या, वयही ९२ वर्षे होते. काल... Continue Reading →

पंडित भीमसेन जोशी @ १००

आज भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांची जन्म शताब्दी. (जन्मः ४ फेब्रुवारी १९२२). भारतीय शास्त्रीय संगीतातील ज्येष्ठ आणि श्रेष्ठ गायक भीमसेन यांना प्रत्यक्ष पाहण्याचा आणि ऐकण्याचा योग मला लहानपणी अनेकदा आला. त्याकाळी (म्हणजे १९०-१९९५) आमच्या शाळेच्या मैदानावर सवाई गंधर्व महोत्सव होत असे. २ वर्ष माझ्या बाबांबरोबर मी गेल्याचं आठवतं. इतर वेळेस शाळेतल्या आतल्या बाजूला थांबून त्या... Continue Reading →

विनोदः कबड्डी

श्वास रोखून…तुझ्याकडे पाहत तिरपा कटाक्ष टाकत.. जप करीत…तुला स्पर्श करण्याचीअनिवार ओढ… आणि हलकासा जरी स्पर्शकेला तरी…जग जिंकल्याच्याधुंदीत, अत्यानंदाने जप करीतच…माघारी येणे…💞 यालाच "कबड्डी" हा खेळ म्हणतात!!😂😂😂😂😂😂

Create a free website or blog at WordPress.com.

Up ↑